Breaking News

SBI ने ठेवींवरील व्याजदर वाढवले आता ०.१० टक्के अधिक व्याज मिळणार

मराठी ई-बातम्या टीम
देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. आता ग्राहकांना ०.१० टक्के जास्त व्याजदराचा लाभ घेता येणार आहे. नवीन दर १५ डिसेंबरपासून लागू झाले आहेत.
एसबीआयने आपल्या वेबसाइटवर ही माहिती दिली आहे. वास्तविक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) सर्व बँकांसाठी किमान दर निश्चित करण्याचे निर्देश दिले होते. या अंतर्गत सर्व बँकांना त्यांचे प्रमाणित दर वापरण्यास सांगितले होते. रिझर्व्ह बँकेच्या या नवीन आदेशानुसार, कोणतीही बँक कर्जासाठी किंवा ठेवींसाठी त्यापेक्षा कमी दर लागू करू शकत नाही.
मूळ दर ७.४५ टक्के
SBI ने आपल्या कर्जाचा बेस रेट ७.४५ टक्के ठेवला आहे. म्हणजेच यापेक्षा कमी व्याजदराने बँक कर्ज देऊ शकत नाही. बँकेने २ कोटींवरील ठेवींवर व्याजदरही वाढवले आहेत. हे नवीन दर नवीन आणि नूतनीकरण ठेवींवर लागू होतील. नवीन दरांनुसार, ७ ते ४५ दिवसांच्या ठेवींवर ३ टक्के व्याज मिळेल. आधी हा दर २.९० टक्के होता.
ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिक व्याज
ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर ३.४० टकक्यांवरून ३.५० टक्के केला आहे. २११ दिवसांपेक्षा जास्त आणि एक वर्षापेक्षा कमी ठेवींवर ३.१० टक्के व्याज मिळेल. पूर्वी हा दर ३ टक्के होते. २ वर्षे ते १० वर्षांच्या ठेवींवरही ग्राहकांना केवळ ३.१० टक्के व्याज मिळेल. SBI बँकिंग उद्योगातील ठेवींवर सर्वात कमी व्याजदर देते. रिझव्‍‌र्ह बँकेने ८ डिसेंबर रोजी झालेल्या पतधोरण बैठकीत दर बदलले नाहीत. त्यापूर्वी अनेक बँकांनी त्यांच्या ठेवींवरील व्याजदरात वाढ केली होती.
बजाज फायनान्सनेही दर वाढवले
बजाज फायनान्सच्या २ वर्षांच्या ठेवींवर आता ६.४ टक्के व्याज मिळेल. आधी हा दर ६.१ टक्के होता. ३ आणि ५ वर्षांच्या ठेवींवर ६.८ टक्के व्याज मिळेल. पूर्वी ६.५ टक्के व्याजदर होता. HDFC लिमिटेड २ वर्षांच्या ठेवींवर ५.८५ टक्के, ३ वर्षांच्या ठेवींवर ६.१ आणि ५ वर्षांच्या ठेवींवर ६.५ टक्के व्याज देत आहे. यामध्ये आतापर्यंत ३ वर्षे आणि ५ वर्षांच्या ठेवींवर ६.५ टक्के व्याज मिळत होते. HDFC ग्रीन डिपॉझिटवर ३ वर्षात ६ टक्के आणि ५ वर्षात ६.४ टक्के व्याज मिळेल. हे सर्व व्याजदर १ डिसेंबरपासून लागू करण्यात आले आहेत. बँकेच्या व्याजदरात यंदा प्रथमच वाढ करण्यात आली आहे.
व्याजदर वाढतील
खरे तर जगभरातील केंद्रीय बँकांना आता व्याजदर वाढवायचे आहेत. त्यामुळे आगामी काळात बँका आणि इतर ठेवींवरील व्याजदर वाढणार आहेत. पुढील वर्षी ठेवींवरील व्याजदर वाढल्यास तुमचे कर्जही महाग होईल.
काही बँका आताही ठेवींवर जास्त व्याज देत आहेत. यामध्ये RBL बँक ३ वर्षांच्या FD वर ६.३० टक्के व्याज देत आहे. खाजगी बँकांमध्ये RBL सर्वाधिक व्याज देत आहे. याचा अर्थ जर तुम्ही तीन वर्षांसाठी १ लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला १.२१ लाख रुपये मिळतील.

Check Also

आता विमा विस्तार १५०० रुपयात, आयआरडिएआयचा विचार एजंटाना १० टक्के कमिशन देण्याची योजना

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अर्थात आयआरडिएआय IRDAI ने शुक्रवारी येथे संपन्न झालेल्या दोन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *