Breaking News

पत्रकारीतेतील तारा (ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ) निखळला वयाच्या 67 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मराठी ई-बातम्या टीम

हिंदी भाषेतील अनोख्या पत्रकारीतेमुळे संबध देशातील घराघरात पोहोचलेले ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे वयाच्या 67 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मागील काही महिन्यांपासून ते आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वी त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना नवी दिल्लीतील अपोलो रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची तब्येत खालावल्याने नुकतेच त्यांना आयसीयुमध्ये हलविण्यात आले होते. परंतु त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात त्यांच्या कन्या मलिका आणि बकुल दुआ राहिल्या आहेत.

विनोद दुआ यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यातून ते बरे ही झाले होते. मात्र त्याना या संसर्गामुळे इन्फेक्शन झाले होते. तसेच या इन्फेक्शनमुळे त्यांची तब्येत बरी नव्हती. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते.

दूरदुर्शनवर २४ तास प्रेक्षपण सुरु झाल्यानंतर त्यांचा डीडी दूरचित्रवाहीनीवर रोज सकाळी सुबह सवेरे हा बातम्या कम माहिती देणारा कार्यक्रम सुरु होता. त्यानंतर त्यांनी एनडीटीव्ही या दूरचित्रवाहीनीवरही काही काळ काम केले. त्यानंतर बदलत्या प्रवाहानुसार त्यांनी द वायर या संकेतस्थळाचे संस्थापक संपादक होते. त्यांनी नंतर एच डब्लू या संकेतस्थळासाठी भारतीय राजकारणावर भाष्य करणारे जन गण मन हा कार्यक्रम सुरू केला. त्यांच्या अनोख्या विश्लेषणामुळे हा कार्यक्रम अल्पावधीतच संपूर्ण भारतात लोकप्रिय ठरला.

पत्रकारीतेचे शिक्षण घेणारे आणि त्याचे धडे गिरवू पाहणारे अनेक नवोदीत पत्रकार विनोद दुआ यांच्या पत्रकारतेला आदर्श मानत असत. तसेच त्यांच्याप्रमाणे बेधडक पत्रकारीता करण्याचा प्रयत्नही केला जात होता.

विनोद दुआ यांचे निधन झाल्याची माहिती त्यांची कन्या मलिका दुआ यांनी त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून दिली. दिल्लीतील रिफ्युजी वसाहतीत लहानाचे मोठे झालेले विनोद दुआ यांनी नेहमीच सत्याचा आधार घेत आपली पत्रकारीता केली. आणि नेहमीच त्यांनी सत्याची बाजू घेतली. त्यांची पत्नी आणि माझी आई चिन्ना यांचे काही महिन्यापूर्वी निधन झाले. आता ते त्यांच्या सोबतीला गेले आहेत. तेथेही ते दोघे मिळून एकत्रित गाणे गातील, स्वयंपाक करतील, प्रवास करतील या शब्दात आपल्या वडीलांच्या आठवणींना मलिका दुआ यांनी उजाळा दिला.

Check Also

राज्यात सर्वाधिक मतदार पुण्यात; तर या चार जिल्ह्यांमध्ये महिला मतदार

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील सुमारे सव्वा नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *