Breaking News

शरद पवार म्हणाले, सोडून गेले आणि पराभूत झाले माझी सभा झाल्यावर कळलं लोकांना कोणता बदल हवा

मुंबई: प्रतिनिधी

१९८० साली माझ्यासोबतचे ५६ पैकी ५० आमदार मला सोडून गेले. पण त्यातील ४८ आमदार पराभूत झाल्याची आठवण सांगत विधानसभा निवडणूकीतही काही जूने सहकारी मला सोडून गेले. लोकांना बदल हवा होता. मात्र माझी सभा झाल्यावर कळलं कोणता बदल हवा आणि लोकांनी बदल करून दाखविला असल्याचे सांगत माझ्या अनेक सहकाऱ्यांच्या अंगात यायला लागल्याची उपरोधिक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी करत जूने सहकारी असलेल्या मधुकर पिचड यांच्यासह अनेक जून्या सहकाऱ्यांचा नामोल्लेख टाळत लगावला.

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील अगस्ती साखर कारखान्याच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पवारांच्या हस्ते माजी आमदार स्व.यशवंत भांगरे यांच्या पुतळ्याचे अनावरणही करण्यात आले.

राज्यातील जनतेला पक्ष बदलाची भूमिका आवडत नाही. विधानसभेला मी अकोल्यात सभा घेतली, त्याचवेळी जनतेच्या मनातल कळालं होतं. जनतेला परिवर्तन हवं होतं, ते झालं आहे. यशवंत भांगरे माझ्या अगोदर ५ वर्ष अगोदर विधानसभेत होते. ते मला ज्येष्ठ होते. अकोले तालुक्यात अनेक महत्वाच्या संस्था उभारणीत भांगरे याचा मोठा सहभाग होता. अकोले तालुक्यातील जनतेनं परिवर्तन करत आम्हाला साथ दिली आणि ती अशीच पुढेही द्यावी. या भागातील सर्व नेते एकजुटीने सोबत आले. मी सर्व गोष्टी केल्या, मात्र एक दीड वर्षापासून आमच्या‌ अनेक सहकाऱ्यांच्या अंगात यायला लागलं असा टोलाही त्यांनी यावेळी सोडून गेलेल्यांना लगावला.

राज्यातील जनतेला पक्ष बदलाची भूमिका आवडत नाही. विधानसभेला मी अकोल्यात सभा घेतली. त्यावेळी जनतेच्या मनातल कळलं होतं. जनतेला परिवर्तन हवं होतं, ते झालं. अकोले येथील अगस्ती सहकारी साखर कारखाना कर्जाच्या बोजाखाली असल्याची माहिती मिळाली. कारखान्यावर २०० कोटींचं कर्ज झालं. जे या‌ कर्जाला जबाबदार आहेत ते शुक्राचार्य बाजुला करा. शुक्राचार्यांना बाजूला केल्यास कारखाना चालवण्यासाठी‌ सर्व ती मदत मी करतो अस आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *