Breaking News

बालमृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न करणार आरोग्यमंत्री डॉ.दिपक सावंत यांचे आश्वासन

नागपुर : प्रतिनिधी

नाशिक व गोरखपुर या दोन्ही धटना परस्पर विरोधी आहेत. गोरखपुरची घटना ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झाली. तर नाशिक मधील घटना काही त्या शहरातली नाही. ठाणे, पालघर, धुळे या आदीवासी पट्ट्य़ातील कुपोषित बालके उपचारार्थ नाशिकमध्ये येतात. यामध्ये जन्मता मृत्यू किंवा जन्मा अगोदर मृत्यू दरामध्येही फरक आहे. वातावरणातील फरक याला कारणीभूत असू शकतो. तसेच १००० ते २५०० ग्रॅम वजनाची बालकंही दगावली जातात. परंतु बाल मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी शासनाचा प्रयत्न असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत यांनी सांगितले.

विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत टकले यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून राज्यातील शासकीय रूग्णालयात गेल्या वर्षभरात १४ हजार ३६८ बालमृत्यू केवळ गैरसोईमुळे झाल्याचा आरोप करत याची तुलना गोरखपुरच्या घटनेशी करू नका असे धक्कादायक विधान आरोग्य मंत्र्यांनी केल्याने जनतेत असंतोषाची भावना पसरल्याचे मुद्दा उपस्थित केला. त्यास उत्तर देताना आरोग्यमंत्री सावंत बोलत होते.

आदीवासी पट्ट्यात बालकाचे संगोपण कसे करता येईल, त्याच्या आहाराकडे कसे लक्ष देता येईल यासंबधी जागृती करण्यासंबधी कार्यक्रम हाती घेण्यात येतील. तसेच पोषण आहारात वाटपात झालेल्या भ्रष्टाचारासंबधी नियुक्त केलेल्या विशेष दक्षता समितीच्या अहवाला संबधी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

बालमृत्यू किंवा कुपोषणास फक्त आरोग्य विभाग जबाबदार नाही, तर आदिवासी विभाग, महिला व बाल कल्याण विभागही तितकाच जबाबदार असल्याचे आरोप राष्ट्रवादीचे किरण पावस्कर यावेळी चर्चेत भाग घेताना केला. तसेच आरोग्य विभागात ४ हजार पदे रिक्त आहेत. पोषण आहार पुरवठा करणाऱ्या ठेकेदारीत भ्रष्टाचार आहे. त्यामुळे पोषण आहार लाभार्थ्यां पर्यंत पोहोचत नाही. तेव्हा तुमच्या आधिकाऱ्यांना चांगला पोषण आहार ज्या म्हणजे ते सुदृढ होतील.मग ते भष्टाचाराचं शेण खाणार नाहीत अशी बोचरी टिकाही त्यांनी यावेळी केली.

त्यास उत्तर देताना आरोग्यमंत्री डॉ.सावंत म्हणाले की, आदीवासी पट्ट्यात बालकाचे संगोपण कसे करता येईल, त्याच्या आहाराकडे कसे लक्ष देता येईल यासंबधी जागृती करण्यासंबधी कार्यक्रम हाती घेण्यात येतील. तसेच पोषण आहारात वाटपात झालेल्या भ्रष्टाचारासंबधी नियुक्त केलेल्या विशेष दक्षता समितीच्या अहवाला संबधी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

 

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *