Breaking News

Tag Archives: uday samant

नाना पटोलेंचा आरोप, कुर्ल्यातील भारत कोल कंपाऊड मधील उद्योग बंद करुन जागा बिल्डरच्या घशात उद्योग व कामगार वाचवा व भ्रष्ट बीएमसी अधिकारी, पोलीस आणि बिल्डरवर कारवाई करा

कुर्ला भागातील भारत कोल कंपाऊंड, काळे मार्ग, कमानी येथे १९६० पासून १०० पेक्षा जास्त लघु उद्योग करणारे गाळे असून कंपाऊंडच्या आसपासच्या परिसरात राहणारे अंदाजे ४५०० पेक्षा जास्त कामगार काम करत असून यावर २० हजार लोकांचा उदरनिर्वाह चालतो. परंतु ही मोक्याची जागा बिल्डरच्या घशात घालण्यासाठी बीएमसीच्या एल विभागातील अधिकारी व स्थानिक …

Read More »

शिंदेच्या शिवसेना राष्ट्रीय कार्यकारणीत एक ठराव राष्ट्रवादीचा, दुसरा ठाकरेंचा आणि तिसरा भाजपाचा जूनेच ठराव नव्या शिवसेनेच्या कार्यकारणीत मंजूर

उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या विरोधात उठाव करत भाजपाच्या मदतीने शिवसेना पक्षावर दावा केलेल्या एकनाथ शिंदे यांच्या ४० आमदार आणि १३ खासदारांच्या गटाला शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्य बाणचिन्ह देण्याचा निर्णय नुकताच केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहिर केला. त्यानंतर शिंदे गटाच्या शिवसेनेची आज पहिल्यांदाच राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक झाली. मात्र या बैठकीत …

Read More »

शिंदे-फडणवीस सरकारचे पहिले “मॅग्नेटिक महाराष्ट्र” ऑक्टोंबरमध्ये मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे ‘फेव्हरेट डेस्ट‍िनेशन’

केंद्र आणि राज्य शासन समन्वयाने काम करीत आहे. राज्य शासन उद्योग वाढीसाठी योग्य आणि सकारात्मक निर्णय घेत आहे. उद्योजकांना विश्वास प्राप्त झाल्यामुळे महाराष्ट्र राज्यात गुंतवणूक वाढायला सुरूवात झाली आहे. परदेशातील गुंतवणूक आणण्यासाठी महाराष्ट्र हे ‘फेव्हरेट डेस्ट‍िनेशन’ झाले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. तसेच येत्या ऑक्टोंबरमध्ये “मॅग्नेटिक महाराष्ट्र” …

Read More »

संजय राऊत यांच्या ट्विटवर उदय सामंतानी खुलासा करत दिले आव्हान, तर मी राजकारण सोडेन एक इंचही जागा खरेदी केल्याचे सिध्द झाल्यास

राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या झाल्यानंतर संबधित गुन्हेगारास पोलिसांनी अटक करण्यात आली. मात्र या गुन्हेगाराचा आणि शिंदे गटाचे मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांचा एक फोटो शिवसेना (ठाकरे गटा)चे खासदार संजय राऊत यांनी फोटो ट्विट केला. तसेच अंगणेवाडीच्या जत्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा झाल्यानंतर २४ …

Read More »

पत्रकार वारिशे हत्याप्रकरण: संजय राऊतांनी केला शिंदे गटाच्या त्या मंत्र्यासोबतचा आरोपीचा फोटो राजकिय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना उधाण

कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात बातमी लिहिली म्हणून पत्रकार शशिकांत वारिशे हत्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण गरम झाल्याचे दिसत आहे. तसेच विरोधकांकडून या मुद्यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला जात असतानाच शिवेसना(ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या हत्या प्रकरणावरून पत्रही लिहिले आहे. …

Read More »

आंबा बागायतदारांच्या मागण्यांसाठी ‘आंबा बोर्ड’ स्थापन करणार पालकमंत्री उदय सामंत यांची घोषणा

आंब्याला हमीभाव मिळावा आणि आंबा बागायतदारांच्या मागण्या, समस्या सोडविण्यासाठी काजू बोर्डाच्या धर्तीवर स्वतंत्र ‘आंबा बोर्ड’ स्थापन करण्याचा निर्णय आज उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. आंबा उत्पादकांना हमीभाव देण्याबरोबरच विविध मागण्या या बोर्डाच्या माध्यमातून सोडविण्यासाठी समिती नेमून या समितीवर दोन बागायतदार प्रतिनिधी नेमण्याचाही निर्णय …

Read More »

उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, महाराष्ट्रातील गुंतवणूकीत जर्मनीचा ४० ते ५० टक्के वाटा परकीय गुंतवणुकीसाठी उद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य करणार

सध्या भारतात १७०० पेक्षा जास्त जर्मन कंपन्या कार्यरत असून यातील ५०% कंपन्या महाराष्ट्रात आहेत. तसेच भारताच्या २१३ कंपन्या जर्मनीमध्ये कार्यरत आहेत. पुणे हे राज्यातील व्यापाराचे प्रमुख केंद्रांपैकी एक असून जर्मन कंपन्यांचा प्राधान्यक्रम पुणे शहराला असल्याची आहे. तसेच भारत ही जगातील वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था असून महाराष्ट्र हे परकीय गुंतवणूक आकर्षित …

Read More »

दावोसमध्ये मुख्यमंत्री शिंदे नेमके ७६ की २८ तास उपस्थित? केसरकर-सामंताच्या दाव्यात विसंगती आदित्य ठाकरेंच्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यातील उपस्थितीबाबत मंत्र्यांच्या दाव्यात विसंगती

दोन वर्षाच्या कोरोना कालावधीनंतर स्वित्झर्लंडमधील दावोस येथे भरलेल्या जागतिक आर्थिक परिषदेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत हे गेले होते. दावोस येथून परतल्यानतर मुख्यमंत्री शिंदेंनी १ लाख ४० हजार कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार केल्याची माहिती दिली. मात्र या गुंतवणूकीबाबत आणि मुख्यमंत्र्यांनी तेथे जावून नेमके किती तास काम …

Read More »

अतुल लोंढेचा आरोप, दावोसमध्ये करार केलेल्या कंपन्यामध्ये महाराष्ट्रातीलच तीन कंपन्या दावोसमधून मोठी गुंतवणूक आणल्याची शिंदे सरकारची ‘बनवाबनवी’ उघड

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दावोस येथून महाराष्ट्रात तब्बल १ लाख ३७ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाल्याचा दावा केला. परंतु यातील काही कंपन्या या महाराष्ट्रातीलच असून महाराष्ट्रात गुंतवतणूक करण्यासाठी दावोसला जाण्याची काय गरज होती असा सवाल विचारला जात आहे. महाराष्ट्रातील तीन कंपन्यांशी करार केलेला असून …

Read More »

दावोसमध्ये पहिल्याच दिवशी राज्यात ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

स्वित्झर्लंड येथील दावोस मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे ४५ हजार ९०० कोटींच्या गुंतवणूक करारावर स्वाक्षरी करण्यात आल्याची माहिती, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. मंत्री सामंत म्हणाले, आज दावोस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आगमन झाले असून …

Read More »