Breaking News

संजय राऊत यांच्या ट्विटवर उदय सामंतानी खुलासा करत दिले आव्हान, तर मी राजकारण सोडेन एक इंचही जागा खरेदी केल्याचे सिध्द झाल्यास

राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या झाल्यानंतर संबधित गुन्हेगारास पोलिसांनी अटक करण्यात आली. मात्र या गुन्हेगाराचा आणि शिंदे गटाचे मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांचा एक फोटो शिवसेना (ठाकरे गटा)चे खासदार संजय राऊत यांनी फोटो ट्विट केला. तसेच अंगणेवाडीच्या जत्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा झाल्यानंतर २४ तासात पत्रकार वारिशे यांची हत्या झालीचा आरोप करत राऊत यांनी केला. या पार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत यांनी संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या फोटोबाबत खुलासा करताना म्हणाले, संजय राऊतांना जो फोटो ट्वीट केला आहे तो जुना आहे. हा फोटो नाकारण्याचे काही कारण नाही. कारण मी मंत्री होऊन रत्नागिरीला गेलो होतो. अनेक लोक आजूबाजूला येऊन फोटो काढतात. तसाच तोही एक फोटो होता. तो फोटो काढला याचा अर्थ मी त्याला पाठबळ दिले असा त्याचा अर्थ होत नाही.

कारण त्या व्यक्तीचे राज्यातील अनेक नेत्यांसोबत फोटो आहेत. महाराष्ट्राच्या जनतेही ते पाहिलेले आहे. जो कोणी नेता त्याच्यासोबत आहे, तो यामध्ये सामील आहे, असे घाणेरडे राजकारण करणे योग्य नाही असे मला वाटत, असा खुलासा केला.
तसेच संजय राऊत यांनी पत्रकाराच्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. या मागणीचे मी पूर्ण समर्थन करतो. माझी, माझ्या नातेवाईकांची त्या ठिकाणी एक इंचही जमीन असेल तर मी राजकारण सोडायला तयार आहे. मात्र जमीन नसेल तर ज्यांनी तसे आरोप केले आहेत, त्यांनी राजकारण सोडायला हवे असे आव्हानही दिले.

मृत्यू झालेल्या पत्रकाराच्या कुटुंबाची राजन साळवी, विनायक राऊत यांनी भेट घेतली.

यावेळी बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले, पत्रकाराच्या मृत्यूची घटना ही दुर्दैवी आहे. पत्रकाराच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी यासाठी पालकमंत्री या नात्याने मी स्वत: पुढाकार घेणार आहे. संजय राऊत यांनी नाणार प्रकल्पाच्या भागात जमिनी कोणाच्या आहेत. कोण दलाल आहेत? याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. मी संपूर्ण महाराष्ट्राला सांगतो की त्या ठिकाणी माझी तसेच माझ्या नातेवाईकांची एक इंचही जमीन असेल तर मी राजकारण सोडायला तयार आहे. मात्र हे सिद्ध झाले नाही तर ज्यांनी माझ्यावर आरोप केले, त्यांनी राजकारण सोडायला हवे, असे खुले आव्हान संजय राऊत यांना उदय सामंत यांनी त्यांचे नाव न घेता दिले.

तसेच उदय सामंत म्हणाले, लोकशाहीमध्ये पत्रकाराने विरोधात लिहिले तर याकडे आपण खिलाडू वृत्तीने पाहिले पाहिजे. संजय राऊत यांना धमक्या येत असतील तर त्याची चौकशी झाली पाहिजे. कोणत्याही नेत्याच्या सुरक्षेच्या बाबतीत तडजोड होता कामा नये, ही आमची इच्छा आहे. मात्र आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी दुसऱ्यांना बदनाम करणे हे तत्वाला धरून नाही, असे माझे मत आहे असल्याचेही स्पष्ट केले.

Check Also

मेहबूबा मुफ्ती यांचे निवडणूक आयोगाला पत्रः कार्यकर्त्यांना अटक करण्याचे थांबवा

जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *