Breaking News

Tag Archives: uday samant

उदय सामंत यांची घोषणा, वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणी नि. न्यायाधीशामार्फत चौकशी

नुकतीच शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीच्या काळात एमआयडीसीने अनिल अग्रवाल यांना पत्र पाठविल्याचा पुरावाच जाहिर केला. मात्र राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर वेदांताच्या अधिकाऱ्यांशी देवेंद्र फडणवीस यांनी कशासाठी बैठक घेतली आणि का घेतली असा सवाल करत या बैठकीची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …

Read More »

विश्वासात घेऊनच बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्प होणार

बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या भूसंपादनाचे काम स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन करत असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज सांगितले. रत्नागिरी येथील बारसू या गावात सुरु होत असलेल्या तेल शुद्धीकरण प्रकल्पासंदर्भात आज महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यासंदर्भातील माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत उद्योगमंत्री उदय सामंत बोलत होते. या तेल शुद्धीकरण प्रकल्पाबाबत उद्योगमंत्री …

Read More »

ठाकरे गटात पुन्हा दोन तट

कोकणातील नियोजित रिफायनरी प्रकल्प नाणार येथे होणार होता. मात्र स्थानिक नागरीकांच्या रेट्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी त्यास विरोध करत फडणवीस सरकारला नाणार येथून तो प्रकल्प रद्द करायला लावला. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारकडून रिफायनरी प्रकल्प बारसू येथे करण्याचे प्रयत्न राज्य सरकारकडून सुरु झाल्यानंतर उध्दव ठाकरे गटात पुन्हा दोन तट …

Read More »

राज्यपालांच्या वक्तव्यावर शिंदे गटही नाराज

‘छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातले आदर्श झाले आहे’, असं विधान केल्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याविरोधात राज्यभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे प्रत्येक व्यक्तींना त्यांच्याबद्दल आदर असला पाहिजे’ असं म्हणत शिंदे गटाचे नेते राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त केली. …

Read More »

अजित पवार म्हणाले, या सरकारच्या काळात पोलिस आणि मंत्रालय प्रशासनावर दबाव

काल ठाण्यात गेलो होतो तिथे अनेक लोकांनी भेटून सांगितले इथे पोलीस ऐकून घेत नाही. पोलिसांना वरिष्ठ पातळीवरून फोन येतात आणि तसे पोलीस बोलून दाखवत आहेत आमच्यावर दबाव आहे. हे महाराष्ट्राला भूषणावह अजिबात नाही असे सांगतानाच अशा तणावाखाली पोलीस यंत्रणा काम करत राहिली किंवा मंत्रालयातील सचिव दर्जाचे अधिकारी तणावाखाली काम करतात …

Read More »

विकास योजना आणि प्रकल्पांची माहिती मुख्यमंत्री डॅशबोर्डद्वारे मिळणार

राज्य शासनाच्या महत्वाच्या विकास योजना आणि महत्वाच्या विकास प्रकल्पांची सद्यस्थिती नेमकी काय आहे, त्यात काय अडचणी आहेत याची माहिती मुख्यमंत्री (सीएम) डॅशबोर्डद्वारे तत्काळ मिळणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. मुख्यमंत्री डॅशबोर्डची रचना वापरकर्त्यांसाठी सुलभ आणि सहज असण्यावर भर देण्यात येणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. …

Read More »

उदय सामंताच्या पत्रकार परिषदेसाठी एमआयडीसीची अशीही तत्परता? माहितीच्या अर्जावर काही तासात उत्तर

राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयात आणि राज्यातील कोणत्याही शासकिय कार्यालयात माहिती अधिकार कायद्याखाली अर्ज केला तर किमान १५ ते ३० दिवसात कधी उत्तर मिळाल्याचा अनुभव कदाचीत विरळाच असेल. मात्र राज्याचे उद्योग मंत्री असलेल्या उदय सामंत यांना घ्यावयाच्या पत्रकार परिषदेसाठी तात्काळ माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने एमआयडीसी विभागाने माहिती अधिकारात तात्काळ माहिती …

Read More »

आदित्य ठाकरे म्हणाले, भयंकर महत्वकांक्षा आणि ढासळती… शिंदे-फडणवीस सरकारवर सोडले टीकास्त्र

वेदांत फॉक्सकॉन, टाटा-एअरबस आणि सॅफ्रन सारखे प्रकल्प महाराष्ट्रातून इतर राज्यात गेल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण आणखी चांगलेच तापले आहे. तसेच यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका़ सुरू असताना आमदार आदित्य ठाकरे यांनी या तिन्ही प्रकल्पांवरून शिंदे सरकारवर टीका केली आहे. यावेळी आपल्या ट्विटर हॅडलवरून आदित्य ठाकरे म्हणाले की, भयंकर महत्वकांक्षा …

Read More »

उदय सामंत यांचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर, वेदांतबद्दल समजू शकतो पण एअर बस.. तुमच्यापासून दूर गेलो म्हणून इतका वाईट झालो का?

वेदांत-फॉक्सकॉन पाठोपाठ टाटा एअरबस सारखा मोठा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले. यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात येत आहेत. आज शनिवारी दुपारी आदित्य ठाकरे आणि माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे सरकारवर टीका केली. राज्यातील प्रकल्प बाहेर जात असताना मुख्यमंत्री उद्योगमंत्र्यांचा राजीनामा …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल, नेत्यांची सिक्युरिटी काढा पण तरूणांना रोजगाराची द्या

शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रकल्प महाराष्ट्र बाहेर गेल्यानंतर पत्रकार परिषद घेत उद्योग मंत्री आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली. घटनाबाह्य सरकारवर उद्योजकांचा विश्वास नाही हे सरकार अस्थिर आहे. नेत्यांची सिक्युरिटी काढा पण तरुणांना रोजगाराची सिक्युरिटी द्या, असं आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी राज्यात परतीच्या पावसामुळे …

Read More »