Breaking News

Tag Archives: uday samant

छगन भुजबळ म्हणाले, एअरबस प्रकल्पासाठी रतन टाटांना पत्र लिहिले…

सुमारे २२ हजार कोटींहून अधिक गुंतवणूक असलेला एअरबस प्रकल्प महाराष्ट्रात होणे अपेक्षित असतांना सदरचा प्रकल्प गुजरातला होत आहे. महाराष्ट्रात येणारे अनेक महत्वाचे प्रकल्प हे इतर राज्यात पळविले जात आहे, ही बाब महाराष्ट्रातील नागरिकांसाठी अतिशय चिंताजनक असून सदरचा प्रकल्प हा नाशिकच्या एचएएल कंपनीत राबविण्यात यावा अशी मागणी टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा …

Read More »

उदय सामंत यांचा पलटवार, एअरबस प्रकल्प बाहेर जाण्यास महाविकास आघाडी जबाबदार

एअर बस प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या टीकेला राज्याचे शिंदे गटाचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पलटवार करत हा प्रकल्प जाण्यास महाविकास आघाडी सरकारलाच जबाबदार धरले असून महाविकास आघाडी सरकार सत्तेत असतानाच हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार नव्हता असा गौप्यस्फोट केला. विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर …

Read More »

सुप्रिया सुळे म्हणाल्या, एकच मंत्री तीन वेळा वेगवेगळी वक्तव्य करतो याचा अर्थ काय?

सरकारमधील एकच मंत्री तीन वेळा प्रकल्पाबाबत वेगवेगळे वक्तव्य करतात याचा अर्थ सरकारमध्ये ताळमेळ नाही किंवा हे मंत्री लोकांची दिशाभूल करत आहेत. मेरीटवर प्रकल्प येत असताना असं काय घडलं की तिन्ही प्रकल्प दुसर्‍या राज्यात जाण्याचं कारण काय हे सत्य नागरीक म्हणून जाणून घेण्याची गरज आहे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया …

Read More »

आदित्य ठाकरे म्हणाले, त्यांना वेदांताबाबत आणि या प्रकल्पाबाबतही माहिती नाही

परतीच्या पावसामुळे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून राजकारण चालूच राहील मात्र शेतकऱ्यांच्या नुकसानीवर लक्ष देणे गरजेचे आहे. चार प्रकल्प महाराष्ट्रातून निघून गेले. घटनाबाह्य सरकारमधील मंत्र्यांनी वेदांता प्रकल्प परत आणू सांगितले तसेच एअर बस प्रकल्प आणूच. परंतु वेंदांता बद्दल जस माहिती नव्हतं तसचं एअर बस बद्दल त्यांना माहिती नाही …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, स्थगिती देणे म्हणजे ही राज्याची अधोगती

विद्यमान सरकारने पुढची कामे पूर्ण करायची असतात मात्र मागची कामे थांबवणे किंवा स्थगिती देणे म्हणजे ही राज्याची अधोगती आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना स्थगिती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मागच्या वर्ष – दीड वर्षात जे निर्णय वेगवेगळ्या ग्रामपंचायतीसाठी किंवा महाराष्ट्रातील …

Read More »

कोकणात होणार ४ हजार २०० कोटींची गुंतवणूक पेण येथे होणार ९६० मेगावॅटचा पीएसपी प्रकल्प- उद्योगमंत्री उदय सामंत

जेएसडब्ल्यू आणि महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभाग यांच्यामध्ये पेण (रायगड) येथील निओ एनर्जी प्रकल्पासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या माध्यमातून कोकणात सुमारे ४ हजार २०० कोटींची गुंतवणूक आहे. पेण येथे ९६० मेगावॅटचा पीएसपी प्रकल्प उभा राहणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृह येथे उद्योग मंत्री सामंत …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, उद्योग कसे पाठवायचे यासाठी दोन मंत्री गुजरातमध्ये गेले का? सहा जिल्ह्याला एक पालकमंत्री म्हणजे ते काय ‘स्पायडरमॅन’ आहेत का ?

शाहु, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री स्वतःच मोदी-शाह यांचे हस्तक असल्याचे जाहीरपणे सांगतात. महाराष्ट्रातील उद्योगधंदे व गुंतवणूक गुजरातमध्ये पाठवली जात आहे. आता तर महाराष्ट्राचे दोन मंत्री गुजरातमध्ये जाऊन आले. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये कसे पाठवायचे याचा अभ्यास करायला ते गेले होते काय ? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला. …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार मुनगंटीवार, सामंत यांचा गुजरात दौरा गुजरातच्‍या सि.एम. डॅशबोर्ड चा अभ्‍यास करण्‍यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या नेतृत्‍वात अहमदाबाद दौरा

राज्यात स्थानापन्न झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारचा कारभार प्रत्यक्ष कोण चालवतो यावरून सातत्याने विरोधकांकडून आरोप करण्यात येतात. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याऐवजी राज्याचा गाडा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच चालवित असल्याचा आरोपही करण्यात येतात. आता या आरोपांना पुष्टी देणारी एक घटना नुकतीच पुढे आली आहे. राज्याचे वनमंत्री आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी …

Read More »

रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ? राज्य सरकारकडून अधिकृत माहिती नाही पण प्रवास महागणार रिक्षा, टॅक्सी युनियनच्या प्रतिनिधींसोबत उद्योगमंत्र्याची सकारात्मक चर्चा

रिक्षा आणि टॅक्सी युनियनच्या प्रश्नांसाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात बैठक घेतली. रिक्षा स्टॅन्ड, पार्कींगची समस्या, चालकांचा विमा, कल्याणकारी मंडळ, महिला रिक्षा चालकांच्या समस्या, कोविड कालावधीतील दंड, वाहन कर्ज यासारख्या अनेक विषयांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली. यावेळी परिवहन विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, परिवहन आयुक्त शेखर चन्ने, अतिरिक्त पोलीस महासंचालक कुलवंतकुमार सरंगल, वाहतूक पोलीस सहआयुक्त राजवर्धन तसेच विविध रिक्षा, टॅक्सी …

Read More »

‘जालना मल्टिमॉडेल लॉजिस्टिक पार्क’ उभारण्यासाठी सामंजस्य करार

मराठवाड्याच्या उद्योग ‍क्षेत्राला पायाभूत चालना देणाऱ्या जालना येथे ‘मल्टिमॉडेल लॉजिस्टिक पार्क’ उभारण्यासाठी केंद्रीय मंत्री व राज्यमंत्री, महाराष्ट्राचे मंत्री व खासदार यांच्या उपस्थितीत नॅशनल हायवेज लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. ‘जालना मल्टिमॉडेल लॉजिस्टिक पार्क’ प्रकल्प मराठवाडा आणि विदर्भाच्या विकासाची गती वाढण्यास महत्वाचा ठरेल, …

Read More »