Breaking News

Tag Archives: shivsena (UBT)

अखेरचा युक्तीवाद करताना कपिल सिबल यांचे आवाहन, जर मध्यस्थी केली नाही तर एकही सरकार… राज्यपालांचा तो निर्णय रद्द करण्याची केली मागणी

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आणि अपात्रतेच्या निर्णयावर ठाकरे गटाची बाजू मांडण्यास कपिल सिबल यांनी काल सकाळपासून सुरुवात केली. मात्र काल राहिलेला अर्धवट युक्तीवाद कपिल सिबल यांनी आज पूर्ण केला. यावेळी बोलताना कपिल सिबल यांनी न्यायालयाच्या जाज्वल्य इतिहासाची आठवण करून देत म्हणाले, राज्यपालांनी एकनाथ शिंदेंना सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण करण्याचा घेतलेला निर्णय रद्द …

Read More »

उध्दव ठाकरेंचा खोचक टोला, खायचं तर मोकळंच होतं ना रान कल्याण डोंबिवलीच्या महापालिकेच्या सभेमध्ये याच माणसाने नाटक केलं

महाविकास आघाडीचा मुंबईत मेळावा पार पडला. या मेळाव्यात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात चांगलीच फटकेबाजी केली. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी भ्रष्टाचारा विषयीची खदखद आपल्या भाषणात व्यक्त करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जोरदार टोला लगावला. खायचं तर मोकळंच होतं ना रान, मी त्याबद्दल कधीच विचारलं नाही, …

Read More »

राजन विचारेंनी आनंद दिघेंचा संदर्भ देत एकनाथ शिंदेंवर टीका, कर्तृत्व सिध्द करावं लागतं आणि… शाखा बळकाविल्यावरून साधला निशाणा

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गट हाच अधिकृत शिवसेना पक्ष असल्याचा निकाल दिला. ‘शिवसेना’ पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटाकडून शाखा ताब्यात घेण्यात येत आहेत. होळीच्या दिवशी ठाण्यात शिंदे गटाकडून शिवसेनेची शाखा ताब्यात घेण्यात आली होती. तेव्हा ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. यावरून ठाण्याचे खासदार राजन …

Read More »

शिंदे-फडणवीसांच्या विरोधात ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख करणार विधिमंडळात उपोषण ठाकरे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघातील कामांना स्थगिती देण्याचे गलिच्छ राजकारण

सध्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु असून या अधिवेशात ठाकरे गटाच्या आमदारांना शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी त्यांच्या मतदारसंघातील विकास कामांवर घालण्यात स्थगिती उठविण्याचे आमिष दाखविण्यात येत असल्याची चर्चा विधिमंडळ परिसरात सुरु आहे. मात्र ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी या चर्चेच्या अनुषंगाने मोठे विधान केल्याने भाजपा आणि शिंदे गटाकडून वापरण्यात …

Read More »

गुलाबराव पाटील म्हणाले, मंत्री पदाचा सट्टा लावत,… मी ३३ नंबरला गेलो मी एकटाच राहिलो असतो मग विकास करू शकलो असतो का?

राज्यात उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार उलथवून टाकत शिवसेनेतील ४० आमदारांनी बंडखोरी करत भाजपाच्या मदतीने राज्यात शिंदे-भाजपा सरकार स्थापन केले. या घटनेला आता जवळपास ९ महिने पूर्ण होत आले आहेत. तरीही शिंदे गटाचे मंत्र्यांकडून आपले बंड कसे योग्य होते याचेच दाखले देत असून यापार्श्वभूमीवर जळगांवातील भोरखेडा येथील एका …

Read More »

सुषमा अंधारेंचा सोमय्यांना सवाल: ज्यांच्यासाठी ५० वेळा, २० वेळा ट्विट करत पत्रकार परिषदा घेतल्या, काय झाले त्यांचे? शिवसेनेतून बाहेर पडल्यावर त्यांच्यावरील गुन्ह्यांचे काय झाले

दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेताना मुंबई उच्च न्यायालयाने किरीट सोमय्यांचीच न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले. त्या आदेशास २४ तासांचा कालावधीही उलटत नाही तोच ईडीने दिड महिन्यात दुसऱ्यांदा मुश्रीफ यांच्या कोल्हापूरातील निवासस्थानावर धाड टाकत उद्या सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले. तत्पूर्वी ठाकरे …

Read More »

साई रिसॉर्टप्रकरणी रामदास कदमांचे भाऊ सदानंद कदम यांना ईडीकडून १५ मार्चपर्यंत कोठडी किरीट सोमय्या यांचे अनिल परबांना बॅग भरून राहण्याचे आव्हान

कोकणातील साई रिसॉर्टप्रकरणी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी माजी मंत्री तथा ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले. तसेच याप्रकरणात शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे बंधु सदानंद कदम यांनी परब यांना मदत केल्याचा आरोपही करण्यात आला. अखेर ईडीने शुक्रवारी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचे भाऊ सदानंद …

Read More »

अर्थसंकल्पावर उध्दव ठाकरेंची खोचक टीका, गरजेल तो बरसेल काय यापेक्षा महाविकास आघाडीने मांडलेला अर्थसंकल्प चांगला

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पहिलाच अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पावर खोचक टीका करत गरजेल तो बरसेल काय अशी टीका करत महाविकास आघाडी सरकारने यापूर्वीचे दोन-तीन अर्थसंकल्प मांडले होते ते अभ्यासपूर्ण होते. आजचा अर्थसंकल्प म्हणजे गाजर का हलवा आहे …

Read More »

संजय राऊतांच्या विनंतीला मान देत विधानसभेने दिली मुदतवाढ, पण तारीख नाही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची सभागृहात मुदतवाढीची घोषणा

राज्याच्या विधिमंडळाला ’चोरमंडळ’ असे संबोधल्याप्रकरणी हक्कभंगाची नोटीस बजावण्यात आलेले शिवसेना (ठाकरे गट) नेते, खासदार संजय राऊत यांनी आज पत्र पाठवित सविस्तर खुलासा देण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली. त्यावर सविस्तर खुलासा सादर करण्यास विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज मुदतवाढ देण्यास मान्यता दिली. मुदतवाढीनुसार पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात …

Read More »

उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील बैठकीत मविआने घेतला “हा” निर्णय संयुक्त सभांच्या माध्यमातून मिंधे सरकारला सळो की पळो करणार

राज्याचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु होऊन दुसरा आठवडा सुरू झाला. यापार्श्वभूमीवर आज पहिल्यांदाच माजी मुख्यमंत्री तथा ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे हे विधान भवनात आले. यावेळी विधान भवनातच महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. त्यावेळी येत्या काळात महाविकास आघाडीच्या संयुक्त सभांच्या माध्यमातून मिंधे सरकारला सळो की पळो करून सोडणार असल्याचा निर्णय …

Read More »