Breaking News

Tag Archives: shivsena (UBT)

नाना पटोले यांचा आरोप, तिजोरी लुटण्यासाठी दिल्लीत अदानी तर मुंबईत अजय आशर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा कारभार ‘हम करेसो कायदा’

राज्यात भाजपाप्रणित सरकार आल्यापासून जनतेच्या पैशाची लूट सुरु आहे. मागील ९-१० महिन्यात शिंदे फडणवीस सरकारने तिजोरी लुटण्याचे काम केले आहे. जी-२० परिषदेच्या बैठकांवर वारेमाप पैशांची उधळपट्टी करण्यासाठी सरकारकडे पैसा आहे पण शेतकऱ्यांना देण्यासाठी नाही. दिल्लीत अदानीच्या रुपाने तर राज्यात अजय अशरच्या रुपाने सरकारी तिजोरी लुटण्यासाठी बसवले आहे, असा घणाघाती आरोप …

Read More »

सत्तांतरानंतर उध्दव ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकत्रित? राजकिय वर्तुळात भुवया उंचावल्या ठाकरे-फ़डणवीस एकत्रितच विधानभवनात आल्याने चर्चेला उधाण

आमच्या सोबत निवडणूका लढवित कट्टर विरोधक असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊन धोका दिल्याचा मनात राग होता. त्यामुळे उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार पाडलं असा जाहिर गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यानंतर उध्दव ठाकरे यांच्या गटानेही त्यास तोडीस तोड फडणवीस यांना दिले. त्यामुळे भविष्यात उध्दव ठाकरे आणि भाजपा नेते देवेंद्र …

Read More »

उध्दव ठाकरेंचा राजला टोला, जशी स्क्रिप्ट तशे वाचन… मी तर त्या बाबत पूर्वीच एका चित्रपटाचा संदर्भ देत स्पष्ट केले होते...

गुढी पाडव्या निमित्त आयोजित मनसैनिकांच्या मेळाव्यात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी १८ वर्षापूर्वीचा किस्सा सांगताना शिवसेना सोडण्यामागे उध्दव ठाकरे हेच कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत नारायण राणे यांच्याबाबतही तेच कारणीभूत असल्याचा आरोप केला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा या मुद्यावरून चर्चेला सुरुवात झाली. अर्थसंकल्पिय अधिवेशनात मराठी भाषा भवन इमारतीच्या अनुषंगाने उध्दव ठाकरे …

Read More »

विषय कामगारांच्या लग्न तुटण्याचा पण देवेंद्र फडणवीसांनी जोडला आदित्य ठाकरेंच्या लग्नाशी आदित्य ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांना हजरजबाबी उत्तर

राज्याचे अधिवेशन सुरु होऊन शेवटच्या आठवड्याला कालपासून सुरुवात झाली. मात्र यावेळी पहिल्यांदाच सत्ताधारी आणि विरोधी बाकावरून एकमेकांना चिमटे आणि टोप्या उडविण्याचे प्रकार तसे कमीच पाह्यला मिळाले. परंतु दर अधिवेशनात विरोधी बाकावरील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सत्ताधारी बाकावरील भाजपा-शिवसेनेच्या नेत्यांच्या टोप्या उडविण्यात येतात. परंतु आज चक्क उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे …

Read More »

ट्विट राऊतांचे पण नाव घेतले शरद पवारांचे यावरून मंत्री भुसे आणि अजित पवारांमध्ये रंगली खडाजंगी राष्ट्रवादीच्या आमदारांचे वेलमध्ये उतरत आंदोलन...

विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर मंत्री शासकिय कागदपत्रे सभागृहात सादर केल्यानंतर मंत्री दादाजी भुसे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटचा उल्लेख करत ४८ अन्वये निवेदन करण्यास सुरवात केली. पण संजय राऊत यांच्या आरोपांना आव्हान देण्याच्या नादात मंत्री दादाजी भुसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वसर्वा शरद पवार यांचे नाव घेतल्याने …

Read More »

राहुल गांधीच्या माफीप्रकरणी संजय राऊत म्हणाले, माफी मागायची असेल तर आधी… गांधींच्या विधानावर संसदेत सध्या सुरु भाजपाकडून करण्यात येत असलेल्या आक्रमक भूमिकेवर राऊत यांचे वक्तव्य

काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी हे लंडनच्या तीन दिवसीय दौऱ्यावर होते. त्यावेळी तेथील भारतीय पत्रकारांच्या संघटनेच्यावतीने घेण्यात आलेल्या मुलाखती दरम्यान आणि तेथील थिंक टँक या संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी देशातील एकूण राजकिय घडामोडींवर भाष्य केले. त्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार खळबळ उडाली असून, संसदेतही भाजपाकडून राहुल …

Read More »

अखेरचा युक्तीवाद करताना कपिल सिबल यांचे आवाहन, जर मध्यस्थी केली नाही तर एकही सरकार… राज्यपालांचा तो निर्णय रद्द करण्याची केली मागणी

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आणि अपात्रतेच्या निर्णयावर ठाकरे गटाची बाजू मांडण्यास कपिल सिबल यांनी काल सकाळपासून सुरुवात केली. मात्र काल राहिलेला अर्धवट युक्तीवाद कपिल सिबल यांनी आज पूर्ण केला. यावेळी बोलताना कपिल सिबल यांनी न्यायालयाच्या जाज्वल्य इतिहासाची आठवण करून देत म्हणाले, राज्यपालांनी एकनाथ शिंदेंना सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण करण्याचा घेतलेला निर्णय रद्द …

Read More »

उध्दव ठाकरेंचा खोचक टोला, खायचं तर मोकळंच होतं ना रान कल्याण डोंबिवलीच्या महापालिकेच्या सभेमध्ये याच माणसाने नाटक केलं

महाविकास आघाडीचा मुंबईत मेळावा पार पडला. या मेळाव्यात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात चांगलीच फटकेबाजी केली. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी भ्रष्टाचारा विषयीची खदखद आपल्या भाषणात व्यक्त करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जोरदार टोला लगावला. खायचं तर मोकळंच होतं ना रान, मी त्याबद्दल कधीच विचारलं नाही, …

Read More »

राजन विचारेंनी आनंद दिघेंचा संदर्भ देत एकनाथ शिंदेंवर टीका, कर्तृत्व सिध्द करावं लागतं आणि… शाखा बळकाविल्यावरून साधला निशाणा

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गट हाच अधिकृत शिवसेना पक्ष असल्याचा निकाल दिला. ‘शिवसेना’ पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटाकडून शाखा ताब्यात घेण्यात येत आहेत. होळीच्या दिवशी ठाण्यात शिंदे गटाकडून शिवसेनेची शाखा ताब्यात घेण्यात आली होती. तेव्हा ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. यावरून ठाण्याचे खासदार राजन …

Read More »

शिंदे-फडणवीसांच्या विरोधात ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख करणार विधिमंडळात उपोषण ठाकरे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघातील कामांना स्थगिती देण्याचे गलिच्छ राजकारण

सध्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु असून या अधिवेशात ठाकरे गटाच्या आमदारांना शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी त्यांच्या मतदारसंघातील विकास कामांवर घालण्यात स्थगिती उठविण्याचे आमिष दाखविण्यात येत असल्याची चर्चा विधिमंडळ परिसरात सुरु आहे. मात्र ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी या चर्चेच्या अनुषंगाने मोठे विधान केल्याने भाजपा आणि शिंदे गटाकडून वापरण्यात …

Read More »