Breaking News

Tag Archives: school education minister

शिर्डीत आलो अन कोल्हापूरात…केसरकरांच्या वक्तव्यावर भुजबळ म्हणाले, या आमच्याकडे… शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या वक्तव्यावर छगन भुजबळ यांचा मिश्किल टोला

राज्यातील शिंदे गटातील आमदार मंत्र्यांना काय झालेय कळायला मार्ग नाही. शिंदे गटाचा एक आमदार सकाळी म्हणाला त्या स्त्रीचे सौंदर्य पाहून खासदारकी दिली. तर मंत्री म्हणतो शिर्डीत आलो अन् कोल्हापूरात पूराच्या पाण्यात एका फुटानेही वाढ झाली नाही. शिंदे गटाच्या या मंत्र्याचा मात्र अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी मिश्किल टोला …

Read More »

मंत्री दीपक केसरकर यांचे आश्वासन, अनधिकृत शाळेतील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही शाळांवर कारवाई कऱण्याची प्रक्रिया सुरु

राज्यात शिक्षण विभागामार्फत विविध शाळांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये खाजगी व्यवस्थापनाद्वारे ६६१ शाळा या अनधिकृतपणे सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. या शाळांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असून या शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले जाणार नाही, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत सांगितले. राज्यातील अनधिकृत शाळांवर कारवाई …

Read More »

मंत्री दिपक केसरकर यांची माहिती, ‘कायम’ शब्द वगळलेल्या पात्र शाळांना अनुदानाचा पुढील टप्पा लागू शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची विधान परिषदेत माहित

‘कायम’ शब्द वगळलेल्या पात्र अघोषित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यामधील पात्र तुकड्या व त्यावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यानुसार अनुदान पात्र अघोषित शाळांना २० टक्के व यापूर्वी २० अथवा ४० टक्के अनुदान घेत असलेल्या शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर करण्यात आला असून ६१ हजार शिक्षकांना …

Read More »

अजित पवारांना अर्थ खाते दिल्यानंतर शिंदे गटाच्या या मंत्र्याने व्यक्त केली प्रतिक्रिया दीपक केसरकर म्हणाले, हे युतीचे सरकार

महाविकास आघाडीचे सरकारमधील तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार हे शिवसेनेच्या आमदारांना विकासनिधी देण्यात दुजाभाव करत असल्याचा आरोप करत तेव्हाच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर पुन्हा भाजपाप्रणित शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांना शिंदे गटाचा विरोध पत्करून पुन्हा अर्थ खाते दिले. यापार्श्वभूमीवर शिंदे गटातील मंत्री आणि आमदारांची काय प्रतिक्रिया …

Read More »

सरकारची मोठी घोषणाः सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये लवकरच ‘ज्युनिअर आणि सीनियर केजी’चे वर्ग

शिशूवर्गापासूनच मुलांचा बौद्धिक आणि शैक्षणिक विकास व्हावा यासाठी लवकरच राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये कनिष्ठ आणि वरिष्ठ शिशूवर्गाचे (सिनियर केजी, ज्युनियर केजी) शिक्षण दिले जाणार आहे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दहिसर (पश्चिम) येथील सखाराम तरे मुंबई पब्लिक स्कूल इमारतीचे …

Read More »

दहावी निकालात कोकण पुन्हा अव्वलः तर मुलींची टक्केवारी अधिक शालेय शिक्षण मंत्र्यांकडून अभिनंदन- दीपक केसरकर

दहावीची परीक्षा हा विद्यार्थ्यांची शैक्षणिक दिशा ठरविणारा महत्त्वाचा टप्पा असतो. या टप्प्यावर यश मिळविलेले विद्यार्थी कौतुकास पात्र आहेत, अशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी परीक्षेत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांनी भविष्यातही यशाची शिखरे पादाक्रांत करावीत, अशा शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण …

Read More »

१२ वीचा निकाल जाहिरः कोकणचा सर्वाधिक तर मुंबईचा सर्वात कमी टक्क्याचा बारावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले अभिनंदन

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १२ वीच्या परीक्षांचे निकाल आज जाहीर झाले आहेत. राज्यात एकूण ९१.२५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून परीक्षेतील सर्व उत्तीर्ण विद्यार्थी, त्यांचे पालक व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी अभिनंदन केले आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी …

Read More »

मंत्री दीपक केसरकर यांचा निर्णयः हे तीन दिवस शाळेचा गणवेश तर बाकीचे दिवस सरकारचे एक राज्य एक गणवेश संकल्पना

राज्यात आगामी शैक्षणिक वर्षापासून एक राज्य एक गणवेश योजना अंमलबजावणी करण्याच्या तयारीत आहे. यावर्षीपासून राज्यातील प्रत्येक सरकारी शाळेतले विद्यार्थी एकाच गणवेशात दिसतील. सर्व सरकारी शाळांसाठी आता एकच गणवेश लागू होईल अशी जाहिर घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले. मात्र सरकारच्या निर्णयापूर्वीच कपड्यांच्या ऑर्डर काही शाळांनी दिल्या आहेत. त्यामुळे …

Read More »

शालेय शिक्षण अभ्यासक्रमात लवकरच कृषी विषयाचा समावेश होणार शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्यासोबतच्या बैठकीनंतर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती

कृषी विषयाचा समावेश शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात करण्याबाबतचा प्राथमिक अहवाल आज शिक्षण विभागाने स्वीकारला आहे. याबाबत तज्ज्ञांची समिती नेमून अभ्यासक्रमाचा आराखडा निश्चित केला जाणार असल्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. यासंदर्भातील अहवाल आज मंत्री सत्तार यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे सुपूर्द केला. कृषी केंद्रीत आशयामुळे शेतीचे अध्ययन होईल. …

Read More »

१५ लाख मुलांच्या पूर्वतयारीसाठी ६५ हजारहून अधिक शाळांमध्ये मेळावे राज्यातील ६५ हजार शासकीय शाळांमध्ये येत्या जूनमध्ये

शिक्षणाचा खरा पाया बालवयातच मजबूत केला गेला पाहिजे. यामुळे पुढच्या शिक्षणाची प्रक्रिया सहज आणि सोपी होते. शाळेत पहिल्यांदाच येणाऱ्या मुलांमध्ये शिकण्याची आवड निर्माण व्हावी, या विचाराने महाराष्ट्रात ‘पहिले पाऊल- शाळापूर्व तयारी अभियान’ हाती घेतले आहे. या अंतर्गत राज्यातील ६५ हजार शासकीय शाळांमध्ये येत्या जूनमध्ये पहिलीच्या वर्गात पहिले पाऊल टाकणाऱ्या सुमारे …

Read More »