Breaking News

Tag Archives: rajesh tope

कोरोना : ४ आठवड्यानंतर राज्याची रूग्णसंख्या ६ हजारावर तर मुंबईची ३७३ नवे बाधित ६ हजार ७५३, ५ हजार ९७९ बरे झाले तर १६७ मृत्यूची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यात जवळपास ४ आठवड्यानंतर पुन्हा ६ हजार ७५३ वर रूग्णसंख्या आली आहे. एक महिन्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणावर ही घट झाल्याचे दिसून येत आहे. मात्र ही संख्या ६ हजाराहून खाली आलेली नाही. तसेच मुंबईतील रूग्णसंख्येतही मोठ्या प्रमाणावर घट झाली असून ३७३ इतकी रूग्ण संख्या आज नोंदविण्यात आली आहे. …

Read More »

अंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांचेही होणार लसीकरण फक्त नाव मेल करा आरोग्य विभागामार्फत लसीकरणाची सुविधा

मुंबई : प्रतिनिधी राज्यात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर अंथरूणाला खिळून असलेल्या रूग्णांचे लसीकरण कसे करायचे, त्यांना लसीकरणासाठी कसे न्यायचे असा प्रश्न अनेक कुटुंबियांना पडला होता. मात्र आरोग्य विभागानेच यावर मार्ग काढत अंथरूणावर खिळून असलेल्या रूग्णांसाठी घरपोच लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आरोग्य विभागाकडून एक ई-मेल प्रसिध्द करण्यात आला असून …

Read More »

आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, कोरोनामुळे सर्व निर्बंध जैसे थे नियमात शिथिलता नाहीच

मुंबईः प्रतिनिधी देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच तिसऱ्या लाटेचा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशनने दिला. देशाच्या तुलनेत राज्यात रुग्णवाढीचा दर कमी असला तरी करोनाचा धोका पाहता राज्यात कोरोना रोखण्यासाठीच्या नियमांमध्ये कोणतीही सूट दिली जाणार नसून सध्या लागून असलेले निर्बंध यापुढेही कायम लागू राहतील अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. …

Read More »

न्युमोनियापासून बचावासाठी दरवर्षी १९ लाख बालकांना देणार पीव्हीसी लस राज्याच्या नियमित लसीकरण कार्यक्रमात पीसीव्ही लसीचा समावेश

मुंबई : प्रतिनिधी बालकांना विविध आजारांपासून संरक्षण मिळावे यासाठी राज्यात नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत विविध लसी दिल्या जातात. त्यामध्ये आता न्युमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन (पीसीव्ही) या नवीन लसीचा नियमित लसीकरण कार्यक्रमात समावेश करण्यात  आला असून दरवर्षी सुमारे १९ लाख बालकांना ही लस दिली जाणार आहे, असे आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले आहे. बालकांना बीसीजी, पोलिओ, रोटाव्हायरस, पेंटाव्हेलेंट, गोवर रुबेला, जेई, डीपीटी …

Read More »

मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमातंर्गत २० हजार जणांना प्रशिक्षण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : प्रतिनिधी कोरोना परिस्थितीत आवश्यक असलेल्या हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडिकल यांसारख्या क्षेत्रामध्ये विविध ३६ अभ्यासक्रमांमधून येत्या तीन महिन्यात २० हजार इतके प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्राचे महत्व …

Read More »

लसीकरणात महाराष्ट्राची पुन्हा विक्रमी कामगिरी दिवसभरात सुमारे आठ लाख नागरिकांचे लसीकरण

मुंबई : प्रतिनिधी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने पुन्हा एकदा आतापर्यंतची विक्रमी उच्चांकी कामगिरी आज नोंदविली. रात्री आठपर्यंत दिवसभरात ७ लाख ९६ हजार ७३८ नागरिकांचे लसीकरण करून नवा विक्रम केला. अंतीम आकडेवारी येईपर्यंत लसीकरणाची संख्या ८ लाखावर जाईल. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणावर लस देण्याची आतापर्यंतची ही सर्वोच्च आकडेवारी आहे. …

Read More »

कोरोना: बाधित रूग्णांच्या संख्येत विक्रमी घट अवघे ६ हजार ७०० ६ हजार ७२७ नवे बाधित, १० हजार ८१२ बरे तर १०१ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी मागील १० ते १५ दिवसापासून राज्यात १० हजाराच्या मागे पुढे नवे बाधित आढळून येत होते. तर जवळपास महिनाभर सातत्याने नव्या बाधितांच्या संख्येत सातत्याने घट येत असल्याचे दिसून आहे. मात्र आज दिवसभरात ६ हजार ७२७ नवे बाधित आढळून आले असून मागील चार ते सहा महिन्यातील सगळ्यात कमी संख्या नोंदविली …

Read More »

तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता घाईघाईने निर्बंध शिथिल करू नका, धोका पत्करू नका ऑक्सिजन,आयसीयू बेड्स ,फिल्ड रुग्णालयांच्या सुविधांचे नियोजन करून देण्याचे आरोग्य विभागाला निर्देश

मुंबई : प्रतिनिधी दुसरी लाट अजून गेलेली नाही आणि त्यातून सावरून आपल्याला तिसऱ्या संभाव्य लाटेचा मुकाबला करायचा आहे, डेल्टा प्लेस या उत्परिवर्तित विषाणूचा देखील धोका आहे, हे सगळे लक्षात ठेवून संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन पुढील काळात किती जास्तीचे ऑक्सिजन व आयसीयू बेड्स लागतील तसेच फिल्ड रुग्णालयासारख्या किती सुविधा उभाराव्या …

Read More »

आशा वर्करना १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ आणि स्मार्टफोन मिळणार : संप मागे कृती समिती आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या चर्चेनंतर माहिती

मुंबई : प्रतिनिधी मागील आठवड्यापासून आशा स्वंयसेविकांनी आपल्या विविध प्रश्नांसंबधी सुरु केलेले आंदोलन आजपासून मागे घेण्यात आले असून ५००० ऐवजी आशा स्वंयसेविकांना १५०० तर गटप्रवर्तकांना १७०० रूपये मानधन वाढ १ जुलैपासून देण्याची तयारी आणि विशेष भेट म्हणून स्मार्ट फोन देण्याचे आश्वासन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले. त्यामुळे आशा स्वयंसेविकांचे हे …

Read More »

ग्रामीण भागात नव्या आरोग्य केंद्रांबरोबर पद भरतीसही मान्यता द्या ग्रामीण आरोग्य केंद्रांच्या पायाभूत सुविधांची कामे करताना प्राधान्यक्रम ठरवा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य केंद्राच्या पायाभूत सुविधांची जी बांधकामे प्रगतीपथावर आहेत, ती आधी पूर्णत्वाला नेली जावीत. त्यानंतर नवीन आरोग्य संस्थाना मान्यता देताना त्याचा प्राधान्यक्रम निश्चित केला जावा. त्याचबरोबर नव्या आरोग्य केंद्रांना मान्यता देताना पदांनाही मान्यता द्या अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिल्या. राज्यात कोवीड 19 च्या संभाव्य …

Read More »