Breaking News

लसीकरणात महाराष्ट्राची पुन्हा विक्रमी कामगिरी दिवसभरात सुमारे आठ लाख नागरिकांचे लसीकरण

मुंबई : प्रतिनिधी

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने पुन्हा एकदा आतापर्यंतची विक्रमी उच्चांकी कामगिरी आज नोंदविली. रात्री आठपर्यंत दिवसभरात ७ लाख ९६ हजार ७३८ नागरिकांचे लसीकरण करून नवा विक्रम केला. अंतीम आकडेवारी येईपर्यंत लसीकरणाची संख्या ८ लाखावर जाईल. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणावर लस देण्याची आतापर्यंतची ही सर्वोच्च आकडेवारी आहे. राज्यात आतापर्यंत ३ कोटी ३८ लाख ५७ हजार ३७२ लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

लसीकरणामध्ये राज्याने केलेल्या विक्रमी कामगिरीची नोंद घेत लक्षणीय कामगिरी करणाऱ्या आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

गेल्या तीन महिन्यात लसीकरण मोहिमेमध्ये देशात महाराष्ट्राची कामगिरी विक्रमी राहीली आहे. प्रत्येक दिवशी आधीच्या विक्रमी कामगिरीपेक्षा सरस कामाची नोंद होत आहे. रात्री उशीरापर्यंतची आकडेवारी येईपर्यंत दिवसभरात ८ लाख नागरीकांचे लसीकरणाची विक्रमी नोंद महाराष्ट्राच्या नावाने नोंदविली जाईल, असे डॉ. व्यास यांनी सांगितले. यापूर्वी २६ जून रोजी ७ लाख ३८ हजार ७०४ नागरिकांचे एकाच दिवशी लसीकरण करण्यात आले होते.

देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची साधारणत: ४ थी विक्रमी कामगिरी आहे. यापूर्वी काही भाजपाशासित राज्यांमध्ये एका दिवसात ६ लाख आणि ८ लाख नागरीकांना लसीकरण करण्यात येणार असल्याच्या घोषणा करण्यात आल्या होत्या. त्यानुसार दावेही करण्यात आले. मात्र केंद्र सरकारने जाहिर केलेल्या आकडेवारीत मात्र मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील लसीकरण मोहिमेची पोलखोल झाली. त्या उलट महाराष्ट्राने वेळोवेळी जाहीर केलेली लसीकरणाची आकडेवारी अद्याप पर्यंत फोल झाल्याचे दिसून आले नाही.

दरम्यान, वारंवार लसीकरणासाठी अनेक केंद्रांवर लसी उपलब्ध होत नसल्याने दोन दिवस तीन दिवस लसीकरण केंद्रे बंद ठेवण्याची पाळी येते. मात्र लस उपलब्ध झाल्याबरोबर सर्वांना लस देण्यात येते.

Check Also

महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये होणार ‘नऊ’ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी

कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *