Breaking News

Tag Archives: prime minister

असदुद्दीन ओवेसी म्हणाले, हिजाब घातलेली महिला भारताची पंतप्रधान बनेल

भारतातील लोकशाही आणि इंग्लडच्या लोकशाही पध्दतीत मोठ्या प्रमाणावर साम्य आहे. या लोकशाहीमुळेच ब्रिटनमध्ये बहुसंख्य श्वेतवर्णिय आणि ख्रिश्चन धर्मिय नागरिक असतानाही भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे अल्पसंख्याक असलेले हिंदू पंतप्रधान बनले. यापार्श्वभूमीवर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी भारतात अल्पसंख्याक समजला जाणाऱ्या मुस्लिम समुदायातील हिसाब घातलेली महिला भारताची पंतप्रधान बनेल असे वक्तव्य …

Read More »

साखरेवरून मुख्यमंत्री शिंदेनी लिहिले पंतप्रधान मोदींना पत्र साखर निर्यातीसाठी कोटा पद्धतीऐवजी खुले धोरणच सुरु ठेवावे

साखरेच्या बाबतीत सध्याचे खुले निर्यात धोरणच सुरु ठेवावे. कोटा पद्धतीने साखर निर्यात करण्यास महाराष्ट्रातील साखर कारखानदारांचा विरोध असून यामुळे कारखान्यांना मर्यादा येतील, यासंदर्भात आपण हस्तक्षेप करून वाणिज्य तसेच ग्राहक संरक्षण आणि अन्न व सार्वजनिक मंत्रालयाला योग्य तो निर्णय घेण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली. आपल्या …

Read More »

अर्थमंत्री सीतारामन यांचे अजब तर्कट, रूपया घसरत नाही तर डॉलर मजबूत होतोय

२०१४ सालच्या लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराच्या दरम्यान गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘जब देश का रूपया गिरता है, तो वो देश भी गिरता है, डॉलर का रेट पंतप्रधान (मनमोहन सिंग) जी की उम्र को भी पिछे छोड देगा’ अशी वक्तव्य करत डॉलरच्या तुलनेत रूपयाच्या घसरत्या मुल्यावरून त्यावेळी मनमोहन सिंग सरकारवर निशाणा …

Read More »

‘धन्यवाद मोदीजी’ अभियानाचा शुभारंभ पंतप्रधान मोदी यांना राज्यातून पंधरा लाख लाभार्थ्यांची आभाराची पत्रे पाठविणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य लोकांसाठी केलेल्या योजनांचा लाभ झालेल्या राज्यातील लाभार्थ्यांशी संपर्क साधून त्यांच्या हस्ताक्षरात लिहिलेली पंधरा लाख पत्रे पंतप्रधानांपर्यंत पोहचविण्याचे भारतीय जनता पार्टीचे ‘धन्यवाद, मोदीजी’ अभियान रविवारी सुरू झाले. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या अभियानात मुंबईत गोरेगाव मतदारसंघात पन्नास लाभार्थ्यांशी संपर्क साधला. बावनकुळे यांनी पत्रकारांना अभियानाची माहिती दिली. …

Read More »

बीएसएनएलची ४ जीची तयारी, मग मोदींनी ५ जीचा शुमारंभ नेमका कोणासाठी? खाजगी कंपन्यासाठी तर नाही ना?

केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या भारत संचार निगम लिमिटेड कंपनीच्या लाखो कर्मचाऱ्यांना व्हीआरएस घ्यायला लावून काही तात्पुरत्या लोकांच्या मनुष्यबळावर सध्या ही कंपनी चालविण्यात येत आहे. त्यातच बीएसएनएलकडून ५ जी सेवा पुढील वर्षी १५ रोजीपासून देशभरात जाहीर करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. मग जवळपास ८ ते ९ महिने आधीच ५ जी सेवेचा …

Read More »

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास होणार केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मंजुरी

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसएमटी) पुनर्विकास कार्याला आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. सीएसएमटी रेल्वे स्थानकासह एकूण तीन रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासकार्यासाठी १० हजार कोटींच्या निधीस मंजुरी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससहित नवी दिल्ली आणि अहमदाबाद रेल्वे …

Read More »

काँग्रेस म्हणते, शिंदे-फडणवीसांना मोदींचा वाढदिवस लक्षात पण स्वातंत्र्यसैनिकांचा विसर मराठवाड्यासह कुठेच दिसली नसल्याचे सचिन सावंत यांचे ट्विट

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाला आजच ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. प्रथेप्रमाणे या दिवशी मुख्यमंत्री पदावर असलेल्या नेत्याकडून औरंगबाद किंवा मराठवाड्यात दिवसभर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर जायचे असल्याने त्यांनी अवघे १५ मिनिटे औरंगाबादेत हजेरी लावत तेलंगणा राज्यात निघून गेले. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाचा सेवा पंधरवडा प्रदेशाध्यक्ष चंद्रेशखर बावनकुळे यांची माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस भारतीय जनता पार्टी सेवा करून साजरा करणार असून त्या निमित्ताने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर भाजपाचा सेवा पंधरवडा हा उपक्रम असेल, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी नागपूर येथे दिली. या कालावधीत स्वच्छता, आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, दिव्यांगांना मदत, मोदी सरकारच्या कामाची माहिती देणारी प्रदर्शने, वैचारिक चर्चा असे विविध उपक्रम …

Read More »

एकनाथ शिंदेही बनतायत इव्हेंट मुख्यमंत्री, आता शिक्षकांशी साधणार संवादअ शिक्षकदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साधणार शिक्षकांशी संवाद, समाजमाध्यमांवरून होणार थेट प्रसारण

देशात कोणत्याही गोष्टीचा इव्हेंट करण्यात मागे नसलेल्या भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात सध्या तरी कोणत्याही राजकिय पक्षाकडून धरला जात नाही. मात्र महाराष्ट्रातही कोणत्याही गोष्टीचे इव्हेंटमध्ये रूपांतर करण्याचा नवा पायंडा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाडण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. त्यामुळे यापुढे कोणतेही सण-उत्सव असो किंवा जयंती उस्तव असो किंवा …

Read More »

राहुल गांधी यांचे मोदींना खुले आव्हान, ५५ तास नाहीतर ५ वर्षे ईडीत बसवलंत तरी… रामलीला मैदानावरून राहुल गांधीने फुंकले रणशिंग

कोरोना नंतरच्या काळात देशातील सातत्याने वाढती महागाई, जीवनावश्यक वस्तूंवर लावण्यात आलेली जीएसटी आणि वाढती बेरोजगारी आदी प्रश्नावरून आज नवी दिल्लीतील रामलीला मैगानावर मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेसकडून हल्लाबोल रॅली काढण्यात आली. त्यावेळी झालेल्या जाहीर सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडत आपल्या ईडी चौकशीवरून आव्हान दिले. पंतप्रधान मोदी …

Read More »