Breaking News

Tag Archives: pm narendra modi

राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्राने तात्काळ ४ हजार कोटीं द्यावे पूरग्रस्त भागात मदत व बचावकार्यासाठी लष्कराला पाचारण करण्याची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील पूरग्रस्त भागातील परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. प्रशासन व एनडीआरएफ हे बचावकार्य करण्यात अपुरे पडत आहेत. त्यामुळे सरकारने पूरग्रस्त भागात मदत बचावकार्यासाठी लष्कराला पाचारण करावे व केंद्र सरकारने तातडीची मदत म्हणून महाराष्ट्राला चार हजार कोटी रूपये द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात …

Read More »

सुषमा स्वराज अंनतात विलीन वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास

नवी दिल्लीः प्रतिनिधी माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्या पार्थिवावर दिल्लीतील लोधी रोड येथील स्मशानभूमीत अंत्यंसस्कार करण्यात आले. त्याआधी त्यांना शासकीय इतमामाप्रमाणे सलामीही देण्यात आली. सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाला अखेरचा सलाम करताना त्यांच्या पतीचे आणि मुलीचे डोळे पाणावले होते. एवढंच नाही तर स्मशानभूमीत हजर असलेल्या प्रत्येकाचेच डोळे पाणावले. सुषमा स्वराज …

Read More »

जम्मू आणि काश्मीरचा स्वायततेचा दर्जा व वास्तव ३७० कलमाच्या माध्यमातून भाजपाचा जम्मू आणि काश्मीर राज्याकडे पाह्यण्याचा दृष्टीकोन

जम्मू आणि काश्मीर राज्याविषयीची चर्चा नेहमीच संपूर्ण देशभरात कधी जिहादी कारवायांमुळे, कधी दहशतवाद्यांनी लष्करी, निमलष्करी दलांवर केलेल्या हल्ल्यामुळे, तर कधी स्थानिकांकडून करण्यात येत असलेल्या दगडफेकीच्या घटनांमुळे होत असते. याशिवाय जम्मू आणि काश्मीर राज्याचा मुद्दा पाकिस्तानने आंतरराष्ट्रीयस्तरावर उपस्थित केल्यानंतर. ७०-८० च्या दशकात जम्मू आणि काश्मीरला भारताचा मुकूट (काटेरी) आणि दुसरे स्विझरलँड …

Read More »

पंतप्रधान मोदी यांनी कौतुक करूनही शेतकऱ्याने केली आत्महत्या अकोल्यातील घटनेवरून अशोक चव्हाण यांची भाजप सरकारवर टीका

मुंबई: प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात मधून जाहीर कौतुक केलेले शेतकरी मुरलीधर राऊत यांच्यावर राज्यातील फडणवीस सरकारच्या अनास्थेमुळे आत्महत्येची वेळ यावी, हा प्रकार भाजप सरकारसाठी लज्जास्पद असल्याची संतप्त टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली. यातून सरकारची शेतकऱ्यांप्रती निष्क्रियता आणि उदासीनता चव्हाट्यावर आल्याचा आरोपही त्यांनी केला. राष्ट्रीय महामार्गात …

Read More »

घटनेतील ३७० वे कलम रद्द करण्याची तयारी दाखविल्याने मोदींची पोलादी छाती सिद्ध शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून कौतुक

मुंबईः प्रतिनिधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत ऐतिहासिक घोषणा करत जम्मू काश्मीरला स्वतंत्र दर्जा देणारं वादग्रस्त ३७० कलम अंशत: हटवण्याचा प्रस्ताव राज्यसभेत सादर केला. या प्रस्तावामुळे एकीकडे विरोधक या निर्णयाला विरोध करत असले तरी आज आपला देश पूर्णपणे स्वतंत्र झाला असल्याची प्रतिक्रिया देत हे कलम रद्द करण्याचे धाडस दाखवित …

Read More »

४५ वर्षातील उच्चांकी बेरोजगारी आणि ढासळती अर्थव्यवस्था चिंताजनक! केंद्र सरकारने युद्ध पातळीवर प्रयत्न करण्याची काँग्रेसची मागणी

मुंबई : प्रतिनिधी देशातील बेरोजगारीचे प्रमाण सध्या मागील ४५ वर्षात सर्वाधिक उच्चांकी ६.१ टक्के असल्याचे केंद्र सरकारच्या सांख्यिकी विभागाने जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे मागील ५ वर्षातील सर्वात कमी आर्थिक विकास दर नोंदला गेल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. हे दोन्ही आकडे संपूर्ण देशाला चिंताग्रस्त करणारे असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते …

Read More »

पराभवाच्या नैराश्याने ग्रासल्यामुळे भाजपकडून बेछूट विधाने माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्याविषयीच्या आक्षेपार्ह विधानाचा प्रदेश काँग्रेसकडून निषेध

मुंबई : प्रतिनिधी माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले विधान आक्षेपार्ह व निंदनीय आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभव स्पष्टपणे दिसू लागल्याने भाजपला नैराश्याने ग्रासले असून, त्यामुळे त्यांची प्रचाराची पातळी खालावून बेछूट, बेताल विधाने केली जात असल्याचे टीकास्त्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी …

Read More »

सर्व प्रवर्गातील पदोन्नत्या जैसे थे ठेवा सुट्टीकालीन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली- मुंबईः प्रतिनिधी शासकिय नोकऱ्यांमधील एससी,एसटी प्रवर्गातील नोकरदारांना पदोन्नतीत आरक्षण देण्यासंदर्भातचा निर्णय राज्य सरकारच्या अखत्यारीत सोपविण्यात आलेला आहे. तरीही यासंदर्भात नव्याने दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर एससी, एसटी, ओबीसीसह सर्व प्रवर्गातील पदोन्नती आरक्षण देण्यासंदर्भात जैसे थे चे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. यासंदर्भातील एक याचिका न्यायमूर्ती एस.ए.बोबडे आणि न्यायमूर्ती …

Read More »

राष्ट्रपतींना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला तेव्हा मोदींनी काय केले ? काँग्रेसवर जातीवादाचा आरोप करणाऱ्या मोदींना महाजन यांचा सवाल

मुंबई: प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या प्रचारार्थ अकलूजमध्ये झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःला मागासवर्गीय असल्यानेच काँग्रेस टीका करत असल्याचा आरोप केला. पण याच भाजपने देशाचे राष्ट्रपती असलेल्या रामनाथ कोविंद यांना मंदीरांना भेटी देताना पुजाऱ्यांकडून गाभाऱ्यात प्रवेश देण्यास नकार देत होते. त्यावेळी पंतप्रधान काय करत होते असा खोचक सवाल काँग्रेसचे …

Read More »

पंतप्रधान मोदीच्या देशातंर्गत प्रवासावर किती खर्च झाला ? आमच्या कक्षेत नाही पंतप्रधान कार्यालयाचे माहिती अधिकारात उत्तर

मुंबईः प्रतिनिधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या देशातंर्गत प्रवास दौऱ्याची माहिती ही अभिलेखाचा भाग नाही. त्यामुळे या दौऱ्यावर झालेल्या खर्चाची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडे उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारात उघडकीस आली. असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवडणूक संबधातील दौरे हे बिगर आधिकारीक दौऱ्याचा भाग असल्याचे उत्तर आरटीआय कार्यकर्ते अनिल …

Read More »