Breaking News

Tag Archives: pm narendra modi

गांधीजींची सत्य व अहिंसा ही तत्वे मोदी पाळतात का? राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा सवाल

मुंबईः प्रतिनिधी महात्मा गांधीजींच्या सत्य व अहिंसा या दोन तत्त्वाने मोदी वागत नाही तोपर्यंत तुम्हाला महात्मा गांधीजींच्या नावाने राजकारण करण्याचा अधिकार नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दांडी यात्रेच्या स्मरण दिनानिमित्त महात्मा गांधीजींवर ब्लॉग …

Read More »

हुकुमशाही सरकारविरोधात काँग्रेस सेवादलाची तिंरगा पदयात्रा ९ मार्च रोजी रोजी निघणार

मुंबईः प्रतिनिधी केंद्रातील व राज्यातील भाजप सरकार हुकुमशाही पद्धतीने कारभार करत आहे. संविधानिक संस्थांची गळचेपी सुरु असून देशाचे संविधान आणि लोकशाही धोक्यात आली आहे. संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी शनिवारी ९ मार्च रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष विलास औताडे यांच्या नेतृत्वाखाली टिळक भवन दादर येथून तिरंगा पदयात्रा काढण्यात येणार आहे. …

Read More »

मोदींच्या कृपेने देशाची अर्थव्यवस्था संकटात राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी मोदीसाहेबांच्या कृपेने देशाची अर्थव्यवस्था संकटात आली आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केला. देशावर ८४ लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर मोदी सरकारने उभा केला आहे. आणि देशातील सव्वाशे कोटी जनतेच्या डोक्यावर ६५ हजाराचे कर्ज करुन ठेवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. नोटाबंदी, जीएसटी चुकीच्या अंमलबजावणीमुळे …

Read More »

राफेल प्रकरणी बुडत्या मोदी सरकारचा पाय अधिक खोलात काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयात राफेल संबंधित पुनर्विचार याचिकेवर सुरु असलेल्या सुनावणी दरम्यान अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी याचिकाकर्ते प्रशांत भूषण यांच्यावर संरक्षण खात्यातील गुप्त कागदपत्रे चोरल्याचा आरोप करून त्या कागदपत्रांचा विचार करू नये अशी विनंती न्यायालयाला केली. प्रत्यक्षात ही कागदपत्रे माहिती अधिकारातून उपलब्ध झाली आहेत असे प्रशांत भूषण यांनी …

Read More »

राफेल कराराची कागदपत्रे चोरीला केंद्राची सर्वोच्च न्यायालयात माहिती

नवी दिल्लीः प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून राफेल विमान खरेदीतील घोटाळ्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर टीकेची झोड उठविण्यात आली. त्यातच या घोटाळ्याप्रकरणी खोटी कागदपत्रे सर्वोच्च न्यायालयात सादर करून न्यायालयाची दिसाभूल केल्याप्रकरणाचे वादळ शांत होत नाही तोच राफेल विमान कराराची कागदपत्रे चोरीला गेल्याची माहिती केंद्र सरकारचे महाधिवक्ता के.के. वेणूगोपाळ यांनी आज मंगळवारी …

Read More »

चुनाव जितने का हम पे छोडो, बाकी हम जो बोलते है उतनाही करो भाजप खासदाराची माहीती

मुंबईः प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आणि त्यांच्या खासदारांकडून जय्यत तयारी करण्यात येत असतानाच भाजपचे बरेच खासदार सध्या संभ्रमावस्थेत आणि भेदरलेल्या अवस्थेत आहेत. पुलवामा येथील दहशतवादी हल्ला, पाकिस्तानातील सर्जिकल स्ट्राईक यावरून भाजपच्या खासदारांमध्ये चलबिचल असतानाच भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शाह हे चुनाव जितने का हम पे छोडो, बाकी हम …

Read More »

१५ दिवसात २ लाखाहून अधिक असंघटीत कामगारांची श्रमयोगी योजनेत नोंद अग्रक्रम पुढेही ठेवण्याचे केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी केंद्र शासनाच्या अंतरिम अर्थसंकल्पात पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना आणली गेली. या योजनेची १५ फेब्रुवारीपासून अंमलबजावणी सुरु करण्यात आली. आणि अवघ्या १८ दिवसात महाराष्ट्राने सव्वा दोन लाखांहून असंघटित कामगारांची नोंद पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत केली असून आता महाराष्ट्राने हा अग्रक्रम येणाऱ्या काळात टिकवून ठेवत अधिकाधिक असंघटित कामगारांची नोंद …

Read More »

दिल्लीतून होणार भाजपच्या खासदारांचा प्रचार प्रत्येक राज्यातील राजकिय, जातनिहाय आणि प्रश्नांची माहिती मुख्यालयात जमा

मुंबई: प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकिय पक्षांनी तयारी सुरु केलेली आहे. मात्र सत्ताधारी भाजपने मोठ्या प्रमाणावर तयारी सुरु केल्याचे दिसून येत असून यंदाच्या निवडणूकीत संख्याबळ वाढविण्यासाठी प्रत्येक राज्यातील स्थानिक पातळीवरील खासदाराच्या प्रचारासाठी दिल्लीतून यंत्रणा हालविण्यात येणार असल्याची माहिती भाजपमधील विश्वसनीय सूत्रांनी दिली. सद्यपरिस्थितीत प्रत्येक राज्यातील भाजपची मूळ असलेली …

Read More »

शेतकरी सन्मान योजनेतंर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील १४ लाख शेतकऱ्यांना लाभ

तर देशातील १ कोटी १ लाख शेतकऱ्यांना होणार लाभ  मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज  गोरखपूर, उत्तर प्रदेश येथून करण्यात आला. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून देशातील १ कोटी १ लाख ६ हजार ८८० शेतकऱ्यांना यांचा  लाभ होणार आहे. यासाठी २ हजार २१ करोड रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात …

Read More »

पुलवामा घटनेचा सोशल मिडीयासह सर्वस्तरात निषेध

नालासोपारा, घाटकोपर, ठाणेसह अनेक ठिकाणी मोर्चे, रेल रोको, निदर्शने  मुंबंईः प्रतिनिधी जम्मू व काश्मीर येथील पुलवामा येथे जैश ए-मुहम्मद या अतिरेकी संघटनेच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात देशाच्या ४४ सैनिकांना प्राण गमावावे लागले. त्याचे पडसाद राजकिय क्षेत्राबरोबरच सर्वसामान्य नागरीकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उमटले असून सोशल मिडीयावरील व्हॉट्सअँप, फेसबुक, ट्टिटरवर पाकिस्तान निषेधाच्या पोस्ट झळकत …

Read More »