Breaking News

Tag Archives: ncp

सुषमा अंधारे म्हणाले,…अजित पवार एकटेच विरोधी पक्षातील नेते आहेत का? मी तर अजित पवारांचे नावंही घेतले नाही

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर ढसाढसा रडत विरोधी पक्षनेत्यांनी विधिमंडळात त्यांच्यावरील अश्लाघ्य वक्तव्यावर प्रश्न विचारला नाही, अशी तक्रार केली. यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सुषमा अंधारेंनी शरद पवारांसमोर रडण्यापेक्षा उद्धव ठाकरेंसमोर रडा, असं म्हटलं. यावर आता सुषमा अंधारेंनी प्रतिक्रिया दिली. सुषमा अंधारे म्हणाल्या, तो …

Read More »

अजित पवार म्हणाले, ….कुणी मनातही आणू नका हे राजीनामा देतील अटलबिहारी वाजपेयींची उंची आणि आताच्या लोकांची उंची यामध्ये जमिन आस्मानचा फरक

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल दिला. सरकार स्थापन करण्यासाठीचे मार्ग, राज्यपालांची भूमिका या सगळ्यावर सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यानंतर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याबाबत अजित पवारांना विचारलं असता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस स्वप्नातही राजीनामा देणार नाहीत …

Read More »

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, चेहऱ्याचे नंतर पाहू आधी एकत्रित येणे महत्वाचे.. राज्यपालांची निवड किती चुकीची केली जाते याचे उत्तम उदाहरण महाराष्ट्राने पाहिले...

देशात लोकशाही वाचवण्यासाठी एकत्रित येण्याची आवश्यकता आहे. विरोधकांनी एकत्र राहणे गरजेचे आहे. सध्या मिळून काम करणे हे जास्त महत्वाचे असून आम्ही एकत्र काम करू, तसेच आघाडीचा चेहरा नंतर ठरवला जाईल अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना मांडली. आज बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव …

Read More »

जयंत पाटील न्यायालयाच्या निर्णयावर म्हणाले, शिवसेनेच्या सदस्यांनी जी कृती केली ती अवैध ठरणार शिंदे सरकार जरी वाचले तरी सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही

शिंदेसरकार जरी वाचले तरी त्यांना सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केले. जयंत पाटील म्हणाले, राज्यपालांनी घेतलेले सर्व निर्णय कसे चुकीचे आहेत हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. भरत गोगावले यांचा व्हीप अमान्य केला …

Read More »

शरद पवार म्हणाले, भाजपात आदेश देण्याची संस्कृती; बिच्चारे शिंदे कर्नाटक निवडणूकीसाठी मुख्यमंत्री शिंदे दौऱ्यावर गेले त्यावर शरद पवारांची उपरोधिक टीका

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी १० मे रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत महाराष्ट्रातील नेत्यांनीही प्रचार केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा सोमवारी ८ मे कर्नाटकात प्रचाराला गेले होते. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे. केंद्रातून जो आदेश येतो, तो बिचाऱ्या शिंदेंना पाळावा लागतो, …

Read More »

बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार ११ मे रोजी पहिल्यांदाच मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेणार

बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल (यूनाइटेड) चे राष्ट्रीय नेते नीतीश कुमार ११ मे रोजी मुंबईत येत आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची ते भेट घेतील, अशी माहिती जद(यू.) चे राष्ट्रीय महासचिव आमदार कपिल पाटील यांनी दिली. नीतीश कुमार यांच्या सोबत बिहार विधान …

Read More »

शरद पवार यांचा सवाल, त्यांची कॅटेगरी कोणती? , तर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ते मोठे नेते ते बोलले… काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात रंगला कलगीतुरा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यानंतर पक्षांतर्गत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आग्रही भूमिका घेतल्यामुळे त्यांनी राजीनामा मागे घेण्याचा निर्णय घेतला. या सर्व घडामोडींवर राजकीय प्रतिक्रिया उमटत असतानाच त्यावरून खुद्द शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यात कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. आज …

Read More »

आणि सुषमा अंधारे यांनी शरद पवारांच्या मदतीचा किस्सा सांगत भर कार्यक्रमातच रडल्या शरद पवारांनी एक फोन केला आणि पाच तासात मी दिल्लीत त्यांच्यासमोर हजर होते

शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर पुरोगामी चळवळीतील महिला नेत्या सुषमा अंधारे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला. त्यानंतर ठाकरे गटानेही त्यांची उपनेत्या आणि प्रवक्त्या म्हणून नियुक्ती केली. परंतु बंडखोरीवरून शिंदे गटाच्या आमदार आणि मंत्री यांना आपल्या वकृत्वाने सुषमा अंधारे यांनी चांगलेच घायकुतीला आणले. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडून अश्वाघ्य पध्दतीने सुषमा अंधारे यांच्यावर …

Read More »

फडणवीसांच्या टीकेला जयंत पाटील यांचे प्रत्युत्तर, त्यांचा भाजपाने फौजदाराचा हवालदार केला…. अन् आमची माप काढवीत का?

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी १० मे रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील नेतेही कर्नाटकात प्रचार करत आहेत. रविवारी ७ मे रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निपाणीतील एका प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य करताना म्हणाले, राष्ट्रवादी हा महाराष्ट्रातील साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष आहे. कर्नाटकात काय करणार, …

Read More »

अजित पवार यांची खोचक टीका, मुख्यमंत्री काय बोलतात त्यांच त्यांनाच कळत की नाही… तुमचा अपमान तो आमचा अपमान, काही तारतम्यच नाही

मागील काही दिवसांपासून पत्रकार परिषदांमध्ये किंवा एखाद्या भाषणा दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बोलत असताना त्यांना मध्येच कोणी तरी चिठ्ठी पाठवून देत मुद्दा सुचवितात. तर काही वेळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारून मुख्यमंत्री शिंदे तेच वाचतात किंवा त्यांनी इशारा की संबधित विषयावरून बोलण्याचे थांबवतात. यावरून अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या या …

Read More »