Breaking News

Tag Archives: mallikarjun kharge

‘इंडिया’ नाव हटवण्याचा अधिकार कुणालाही नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार

जळगाव जिल्हा दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जालन्यातील मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जसह राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरही भाष्य केले. तर यावेळी उपस्थित पत्रकारांनी त्यांना केंद्र सरकारने बोलावलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनात विरोधकांच्या इंडिया आघाडीचे नाव बदलले जाणार असल्याची चर्चा आहे. यावर मत …

Read More »

काँग्रेसची वॉर रुम भाजपाच्या फेक न्यूजला सडेतोड उत्तर देणार राहुल गांधींच्या हस्ते राजीव गांधी सोशल मीडिया सेंटरचे उद्घाटन

सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय विरोधकांवर चिखलफेक करणे, विरोधी पक्षांच्या नेत्यांची बदनामी करणे तसेच खोटी, चुकीची माहिती पसरवून समाजाची दिशाभूल करण्याचे काम भारतीय जनता पक्ष सातत्याने करत आहे. भाजपा सोशल मीडीयाचा दुरुपयोग करत फेक न्यूजही ससरवत असतो. भाजपाचा हा प्रपोगंडा हाणून पडण्यासाठी व भाजपाकडून होत असलेला अपप्रचार खोडून काढण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश …

Read More »

राहुल गांधी म्हणाले, नफरत की बाजार मे मोहब्बत की दुकान…. जगातील सर्वात शक्तीशाली ब्रिटीश सत्ता काँग्रेसमुक्त भारत करु शकली नाही, नरेंद्र मोदी काय करणार?

काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांचा शुक्रवारी महाराष्ट्र काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या टिळक भवनात सत्कार करण्यात आला. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, द्वेषाच्या बाजारात आम्ही प्रेमाचे दुकान उघडू असा निर्धार व्यक्त करत काँग्रेस हा बब्बर शेर आणि शेरनिंयोका पक्ष आहे. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी फुटली, पण काँग्रेसमध्ये फूट पडली नाही. आम्ही …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांनी वर्तविली शक्यता,… छापे- अटकेसाठी तयार रहा इंडिया बैठकीत काँग्रेसचा आवाहन

मुंबईत सुरु असलेल्या प्रमुख विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीत बोलताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना सत्ताधारी पक्षाच्या विरोधात इशारा देताना म्हणाले, आमच्या दोन्ही सभांचे यश, पहिली पाटणा आणि दुसरी बंगळुरू, यावरून मोजता येईल की, पंतप्रधानांनी त्यांच्या त्यानंतरच्या भाषणात केवळ इंडिया आघाडीवर हल्लाच केला नाही तर आपल्या …

Read More »

मोठा प्रश्न, इंडियाचे संयोजक कोण होणार? सर्व विरोधी पक्षांचे दिग्गज एकत्र

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सोबतच्या स्पर्धेवर मोठ्या विचारमंथनासाठी भारतातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या नेत्यांची तिसरी बैठक मुंबईत आजापासून सुरू झाली. मुंबईत होणाऱ्या भारत आघाडीच्या या तिसऱ्या बैठकीत संयोजकांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बुधवारी सायंकाळी इंडिया आघाडीच्या नेत्यांमध्ये अनौपचारिक बैठक झाली. गुरुवारी सर्व नेते …

Read More »

आगामी निवडणूकांसाठी काँग्रेसची टीम जाहिरः महाराष्ट्रातून या दोघांचा समावेश मल्लिकार्जून खर्गे यांनी शशी थरूर आणि ए के अॅथोनी यांना दिली पुन्हा संधी

साधारणतः नव्या वर्षाच्या दुसऱ्या महिन्यात लोकसभा निवडणूकीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता सर्वच राजकिय पक्षांनी गृहित धरली आहे. तर दुसऱ्याबाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२४ ला आपणच पंतप्रधान पदावर पुन्हा निवडूण येणार असल्याचे जाहिर केल्याने देशभरातील सर्वच राजकिय पक्षांनी निवडणूकीची तयारी सुरु केली. यापार्श्वभूमीवर कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणूकीतील विजयानंतर …

Read More »

पंतप्रधान मोदी यांच्या भाषणावर मल्लिकार्जून खर्गे म्हणाले, हरणार की जिंकणार मतदार…. मोदीजी देश कसा एकसंध ठेवणार

देशाचा ७६ वा स्वातंत्र्य दिन असून प्रथेप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन भाषण केलं. आपल्या भाषणात दहा वर्षांमध्ये केलेल्या कामांची महती सांगत पेटलेलं मणिपूर यासह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या काळात देश भ्रष्टाचाराच्या राक्षसाच्या विळख्यात अडकला होता हे देखील असा आरोप करत पुढच्या वर्षी …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांचे टीकास्त्र, पंतप्रधान मोदी INDIA ला ईस्ट इंडिया कंपनी म्हणतायत… मात्र मणिपूरप्रश्नी पंतप्रधान आजही संसदेत बोलायला तयार नाहीत

जवळपास अडीच महिन्यापासून ईशान्य भारतातील मणिपूर राज्यात उफाळलेल्या हिंसाचार काही केल्या शमायला तयार नाही. उलट दिवसेंदिवस मणिपूरमधील हिंसाचाराच्या नवनवीन घटनांचे व्हिडिओ आणि माहिती बाहेर येत आहे. त्यातच संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु होण्याच्या दिवसापासून काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी मणिपूरप्रश्नी चर्चेची मागणी केली. मात्र काल गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ …

Read More »

मोदी-भाजपा विरोधात २६ राजकिय पक्षांचा “इंडिया” लढणार पुढील बैठक होणार मुंबईत

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या वाढत्या एककल्ली कारभाराच्या विरोधात देशातील जवळपास २६ सर्वपक्षिय विरोधकांची बैठक आज कर्नाटकातील बंगरूळू येथे पार पडली. या बैठकीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी मोठी घोषणा करताना विरोधी पक्षांची आघाडी आता यापुढे इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इंक्लूझिव अलायन्स अर्थात इंडिया नावानं लढणार असल्याचे जाहिर केले. तसेच …

Read More »

उद्धव ठाकरे यांची बैठकीनंतर स्पष्टोक्ती, मतभेद असतील पण आम्ही…

भाजपाच्या मनमानी आणि हुकूमशाही पध्दतीच्या कारभाराच्या विरोधाच जवळपास २० हून अधिक राजकिय पक्ष एकत्र येत आज बिहारच्या पाटण्यात आयोजित बैठकीसाठी आले होते. या बैठकीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली असून निवडणुका एकत्र लढवण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिली. बैठकीनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित सर्व नेत्यांनी आपली …

Read More »