Breaking News

काँग्रेसची वॉर रुम भाजपाच्या फेक न्यूजला सडेतोड उत्तर देणार राहुल गांधींच्या हस्ते राजीव गांधी सोशल मीडिया सेंटरचे उद्घाटन

सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय विरोधकांवर चिखलफेक करणे, विरोधी पक्षांच्या नेत्यांची बदनामी करणे तसेच खोटी, चुकीची माहिती पसरवून समाजाची दिशाभूल करण्याचे काम भारतीय जनता पक्ष सातत्याने करत आहे. भाजपा सोशल मीडीयाचा दुरुपयोग करत फेक न्यूजही ससरवत असतो. भाजपाचा हा प्रपोगंडा हाणून पडण्यासाठी व भाजपाकडून होत असलेला अपप्रचार खोडून काढण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने अत्याधुनिक वॉर रुमची स्थापना केली आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, खा राहुल गांधी यांच्या हस्ते टिळक भवन येथील ‘भारतरत्न राजीव गांधी सोशल मीडिया सेंटर’चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार आदी उपस्थित होते. काँग्रेस सोशल मीडिया महाराष्ट्राचे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार यांच्या नेतृत्वात काँग्रेसची ही सोशल मीडिया टीम काम करणार आहे. या सोशल मीडिया केंद्रात स्टुडिओ तयार करण्यात आलेला आहे तसेच अत्याधुनिक सॉफ्टवेरअयुक्त उपकरणे आहेत. या सर्व यंत्रणा कार्यान्वित करण्याकरिता अत्यंत कुशल तंत्रज्ञानस्नेही सोशल मीडिया टीम सज्ज करण्यात आलेली आहे. राहुल गांधी व खर्गे यांनी या केंद्राची पाहणी करुन सोशल मीडिया यंत्रणेचे कौतुक केले.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

विनोद घोसाळकर यांचे प्रतिपादन, अभिषेकला विश्वासघाताने संपवले…

माझा मुलगा अभिषेकची विश्वासघाताने निर्घृण हत्या करण्यात आली. हा माझ्या कुटुंबावरील मोठा आघात आहे. आमच्यावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *