Breaking News

पंतप्रधान मोदी यांच्या भाषणावर मल्लिकार्जून खर्गे म्हणाले, हरणार की जिंकणार मतदार…. मोदीजी देश कसा एकसंध ठेवणार

देशाचा ७६ वा स्वातंत्र्य दिन असून प्रथेप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन भाषण केलं. आपल्या भाषणात दहा वर्षांमध्ये केलेल्या कामांची महती सांगत पेटलेलं मणिपूर यासह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या काळात देश भ्रष्टाचाराच्या राक्षसाच्या विळख्यात अडकला होता हे देखील असा आरोप करत पुढच्या वर्षी मी ध्वजारोहणासाठी पुन्हा येईन असा विश्वास व्यक्त केला. त्यावरून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत सवाल केला.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्या वर्षी नक्की ध्वजारोहण करतील पण तो कार्यक्रम त्यांच्या घरी होईल. जे सत्तेवर असतात त्यांना हे वाटतच असतं की आपण पुन्हा निवडून येऊ. पण तुम्ही जिंकणार की हरणार हे सर्वस्वी मतदारांच्या हाती असतं. मतदार तुम्हाला काय कौल देतात? त्यावर सगळं अवलंबून आहे. २०२३ च्या १५ ऑगस्टच्या दिवशी हे सांगायचं की पुन्हा येईन यात नरेंद्र मोदींचा अहंकार दिसून येतो. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीही त्यांनी विरोधकांवर टीका केली. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी देश कसा एकसंध ठेवणार? असाही सवालही केला.

तर दुसरीकडे काँग्रेस खासदार के.सी. वेणुगोपाल यांनीही असंच एक वक्तव्य करताना म्हणाले, २०२४ च्या लोकसभा निवडणुकांना अद्याप वेळ आहे. त्या निवडणुकीत कुणाला कौल द्यायचा? हे लोक ठरवतील. त्यानंतरच कोण पुन्हा येईल की नाही हे ठरेल. माझं पंतप्रधान मोदींना सांगणं आहे किमान २०२४ च्या निवडणुकीची आणि त्यानंतरच्या निकालांची तरी वाट बघा. दरम्यान आज झालेल्या स्वातंत्र्य दिवसाच्या ध्वजारोहण सोहळ्यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची अनुपस्थिती होती. त्यांच्या खुर्च्या रिकाम्या होत्या.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

मराठा समाजाला आरक्षण; महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय

मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत १० टक्के आरक्षण देण्याचे विधेयक विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून एकमताने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *