Breaking News

सुप्रिया सुळे यांचा विश्वास, दिल्ली समोर महाराष्ट्रा कधीही झुकणार नाही दिड वर्षात अद्यापही महापालिका निवडणुका का घेतल्या नाही?

आज भारताच्या ७७ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात कार्यकारी अध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस तथा आमदार जितेंद्र आव्हाड, महिला प्रदेश अध्यक्ष विद्याताई चव्हाण मुंबई विभाग कार्याध्यक्ष राखी जाधव यांच्यासह सेवा दलाचे प्रमुख पदाधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, भारताच्या जडणघडणीत महाराष्ट्राचे योगदान जास्त आहे. सामाजिक परिवर्तन शैक्षणिक क्षेत्रात असेल ज्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपण बोलतो त्या शाहू फुले आंबेडकरांचे विचार महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारत घेऊन पुढे जात आहे. त्याचा आपल्याला सर्वांना सार्थ अभिमान आहे. मला आज भाषणं करताना वेदना होतं आहे. मणिपूर प्रश्ननी आज प्रचंड दुखः होतं आहे. मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा हीच आमच्या पक्षाची मागणी असणार आहे.

खासदार सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की लोकांमध्ये द्वेष वाढवण्याच् काम केलं जातं आहे. महागाई बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत आहे. पेट्रोल डिझेल दर आणखी वाढणार आहेत. याचा जाहीर निषेध करायला हवा. दडपशाही दिन साजरा करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्य दिना च्या दिवशी महागाई, बेरोजगारी, मणिपूर, महिला सुरक्षा यासारख्या आव्हानावर आज बोलावं लागत आहे. यासारखं दुर्दैवची बाब आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आज मोठी जबाबदारी आली आहे.

यावर सविस्तर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की वॉशिंग मशीनच्या विरोधात आपल्याला लढायचं आहे. हल्ली सगळे व्हाट्सअप आणि फेस टाईमवरच बोलतात. याचं कारण नागरिकांना विचारलं तर ते म्हणतात सगळे कॉल रेकॉर्ड होतात. आपण देशाच्या विरोधात कुठलेही काम करत नाही आपण देशासाठी काम करत आहेत त्यामुळे आपण कुणालाही भिण्याचे काम नाही. जे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक जणांनी बलिदान दिले ते स्वातंत्र्य आम्ही कुणाच्याही दडपशाही खाली जाऊ देणार नाही असे देखील म्हटले आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, दिड वर्ष झाली महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकत झाल्या नाहीत. निवडणूका घ्या ही मागणी स्वातंत्र्यदिनानिमित्त करावी लागते हे दुर्दैवी आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न कुणी सोडवायचे नगरसेवक, ग्रामपंचायत, सदस्य जिल्हा परिषद सदस्य निवडून येतात त्यावेळी सर्वसामान्यांचे प्रश्न प्रशासनासमोर मांडतात. मात्र गेल्या दिड वर्षांपासून सध्याच्या राज्य सरकारने निवडणुका घेतलेल्या नाही आहे या निवडणुका कोणत्या भीतीमुळे घेण्यात आल्या नाही आहे असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित केला आहे. या महाराष्ट्रातील जनतेला कुणाचीही भीती वाटू नये याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच या मायबाप जनतेच्या पाठीमागे उभा राहणार आहे.

प्रसार माध्यमांमध्ये रोज नवीन नवीन संभ्रम समोर येत आहे आज देखील अशा काही बातम्या आल्या आहे. शरद पवार साहेबांची संगोल्याची सभा आणि त्यानंतर पत्रकार परिषद पाहिली तर सध्या निर्माण झालेला संभ्रम पुर्णपणे दूर होईल. आपल्याला कुणाशी वैयक्तीक लढायचं नाहीं आपली वैचारिक लढाई आहे. संभ्रम आपण निर्माण करत नाही आहे तर समोरच्यांच्या मनात संभ्रम असल्यामुळे ते निर्माण करत आहे. अन्याय आणि असत्याच्या विरोधात रस्त्यावर उतरून लढाई लढायची आहे. सध्याच्या राज्यकर्त्यांविरोधात इंडिया आघाडी पूर्णपणे ताकतीने समोर जाणार आहे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीला मोठ्या प्रमाणात यश मिळेल. महाराष्ट्र कधीही दिल्ली समोरं झुकला नाही आणि झुकणार देखील नाही. जेव्हा केव्हा हिमालय अडचणीत आला त्यावेळी मदतीला सह्याद्री मदतीसाठी धावून गेला असे देखील खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी भूमिका स्पष्ट केली. नात्यांतील ओलावा आणि राजकीय धोरण वेगळे आहे. आमच्या मध्ये कुठल्याही गैरसमज नाही. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँगेस आणि शिवसेनेशी मी स्वतः बोलले त्याची चिंता कोणी करू नये असे देखील खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाषण दरम्यान परिवारवर बोलले आहे. प्रत्येक पक्षामध्ये परिवार राहतील व्यक्ती आहेतच मी संसदेमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे भाषण ऐकले होते त्यामध्ये ते म्हटले होते की जर एक बोट दुसऱ्याकडे दाखवले तर तीन बोटे आपल्याकडे असतात असे ते म्हटले होते. जर खरच घराणेशाही बदल करणार असतील तर म्हणजे काय? घराणेशाही म्हणजे जे लोक निवडून आले भाजपा मध्ये ही असे लोक आहेत. भ्रष्टाचार बाबत जे आरोप झाले नेत्यांवर जे कधी आरोप झाले भाजपने केले आज ते भाजप मध्ये आहेत. मग संभ्रम काय आहे. भाजपा मध्ये याबाबत स्पष्टता नाही. असेही खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले आहे.

Check Also

नाना पटोले यांचे टीकास्त्र, नरेंद्र मोदी फेल झालेले इंजिन…

नरेंद्र मोदी यांनी मागील १० वर्षात देशाला अधोगतीकडे नेले आहे. मोदींनी जनतेला दिलेले एकही आश्वासन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *