Breaking News

Tag Archives: congress

मोदींच्या ईडी, सीबीआय व इन्कम टॅक्सला फक्त विरोधी पक्षच दिसतो, ‘अदानी’ दिसत नाही का? ‘अदानी’ महाघोटाळ्याविरोधात सोमवारी १३ तारखेला राजभवनवर धडक मोर्चा व ‘राजभवन घेराव’!: नाना पटोले

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची उद्योगपती अदानींवर विशेष मेहरबानी असून या विशेष मेहरबानीतूनच स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) एलआयसीमधील (LIC) कोट्यवधी लोकांचा पैसा मनमानी पद्धतीने अदानींच्या कंपन्यात गुंतवला. आता अदानी समुहातील आर्थिक घोटाळा उघड झाल्याने जनतेचा कष्टाचा पैसा सुरक्षित राहिला नाही. अदानी महाघोटाळ्याप्रश्नी मोदी सरकार मूग मिळून गप्प बसले आहे परंतु …

Read More »

नाना पटोलेंची मागणी, खतासाठी शेतकऱ्याला जात विचारणाऱ्यावर कारवाई करा पुरोगामी महाराष्ट्रात शेतकऱ्याला जात विचारणे अत्यंत दुर्दैवी

शेतकऱ्याला जात नसते, सर्वांना अन्न पुरवणारा तो अन्नदाता आहे परंतु शेतकऱ्याला खत खरेदी करताना जात विचारली जात आहे हे दुर्भाग्यपूर्ण आहे. भाजपाच्या राजवटीत शेतकऱ्यांची थट्टा केली जात असून जात विचारण्याच्या प्रकरणाची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. शेतकऱ्याला जात विचारली जाते या मुदद्यावर …

Read More »

वर्षा गायकवाडांच्या प्रश्नावर मंत्री राठोडांची घोषणा, मुंबईतील मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थांचाही पुनर्विकास विधानसभेत लक्षवेधी सुचनेवरील चर्चेवेळी दिली माहिती

सर्वसामान्य मागासवर्गीयांसाठी सामाजिक न्याय विभागामार्फत मागासवर्गीय गृहनिर्माण योजना राबविली जाते. लवकरच मंत्रीमंडळासमोर मागासवर्गीय गृहनिर्माण योजनेंतर्गत पुनर्विकास धोरण आणण्यात येईल, अशी माहिती मंत्री संजय राठोड यांनी आज विधानसभेत दिली. सदस्य वर्षा गायकवाड यांनी मुंबईतील विक्रोळी, कन्नमवार नगर येथील ४५ वर्षांपूर्वी मागासवर्गीयांसाठी बांधण्यात आलेल्या गृहनिर्माण योजनेच्या पुनर्विकास कामाबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. …

Read More »

खत खरेदीवेळी जातीची विचारणाः विरोधकांनी धारेवर धरताच अखेर सरकारची …. अजित पवार आणि नाना पटोले आक्रमक पवित्रा घेतल्या नंतर मुख्यमंत्री शिंदेंचे आश्वासन

आधीच नैसर्गिक संकटांमुळे आणि शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या खताची खरेदी करण्यासाठी ऑनलाईन नावं नोंदवावी लागतात. मात्र नाव नोंदविताना ऑनलाईन पोर्टलवर संबधित शेतकऱ्यांची जात विचारली जात असल्याची माहिती पुढे आली. याच याचे पडसाद शुक्रवारी विधानसभेत उमटले असून याविरोधात विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत राज्य …

Read More »

नाना पटोलेंची टीका, शिंदे-फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पात केवळ घोषणांचा पाऊस ६.८ टक्के विकासदराने १ ट्रिलीयन डॉलरची अर्थव्यवस्था हे दिवास्वप्नच

अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा आकड्यांचा खेळ असून प्रत्यक्षात काहीही नाही केवळ मोठं मोठ्या आकड्यांची घोषणा आहे. शेतमालाच्या हमीभावाबद्दल अर्थसंकल्पात काहीच नाही, अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीबद्दल काहीच घोषणा केलेली नाही तसेच जुन्या पेन्शनबद्दलही अर्थसंकल्पात कोणतेही सुतोवाच केलेले नाही. हा अर्थसंकल्प अर्थहिन व जनतेची दिशाभूल करणारा …

Read More »

उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील बैठकीत मविआने घेतला “हा” निर्णय संयुक्त सभांच्या माध्यमातून मिंधे सरकारला सळो की पळो करणार

राज्याचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु होऊन दुसरा आठवडा सुरू झाला. यापार्श्वभूमीवर आज पहिल्यांदाच माजी मुख्यमंत्री तथा ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे हे विधान भवनात आले. यावेळी विधान भवनातच महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. त्यावेळी येत्या काळात महाविकास आघाडीच्या संयुक्त सभांच्या माध्यमातून मिंधे सरकारला सळो की पळो करून सोडणार असल्याचा निर्णय …

Read More »

नाना पटोलेंचा आरोप, शिंदे-फडणवीस सरकारचे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; तातडीने मदत जाहीर करा

राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे. कांदा, कापूस, धान, सोयाबीन, हरभरा, तुरीसह शेतमालाला भाव नाही त्यातच अवकाळीने झोडपल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाची राखरांगोळी झाली आहे, त्यामुळे सर्व कामकाज बंद करून शेतकऱ्यांबद्दल सरकराची भूमिका काय आहे हे कळले पाहिजे, संकटातील शेतकऱ्यांला सरकारने तातडीने मदत …

Read More »

मंत्री तुपाशी शेतकरी उपाशी… नुकसान भरपाई जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाली करा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक

राज्यातील उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके भुईसपाट झाली. या नैसर्गिक संकटामुळे हजारो हेक्टरवरील उभी पिके वाया गेल्याने हजारो शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. यापार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीची मदत जाहिर करावी या मागणीसाठी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उध्दव ठाकरे गटाच्या आमदारांनी …

Read More »

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप,…वैधतेबाबत शंका असल्यानेच निवडणूका पुढे ढकलतायत शिंदे-फडणवीस सरकारवर टांगती तलवार आणि विरोधात वातावरण

महाविकास आघाडी एकत्रित निवडणूकांना सामोरे जाण्यासाठी आणि जातीयवादी पक्षांना रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे प्रयत्नशील आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला फटकारत आयोगाच्या आयुक्त पदाच्या नियुक्तीबाबत केंद्र सरकारला आदेश दिले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर अवैधतेची टांगती तलवार असून शिंदे-फडणवीसांनाही त्यांच्या …

Read More »

राहुल गांधी म्हणाले, आरएसएस आणि मुस्लिम ब्रदरहूड संघटना सारखीच लंडनमधील थिंक टँक चँथम कार्यक्रमात बोलताना केली तुलना

काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या लंडनच्या दौऱ्यावर असून दोन दिवसांपूर्वीच त्यांनी चीनचं कौतुक केलं होतं आणि मोदींवर टीका केली होती. आता पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मुस्लीम ब्रदरहूड हे दोन्ही सारखेच आहेत असं वक्तव्य केले. त्यामुळे देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान राहुल गांधी …

Read More »