Breaking News

Tag Archives: congress

नाना पटोलेंची टीका, वस्त्रोद्योग कार्यालय हलवण्यामागे महाराष्ट्राला बरबाद करण्याचा डाव पंतप्रधान मोदी जनतेसाठी नाही तर ‘मेहुलभाई’सारख्या मित्रोंसाठीच काम करतात

मुंबई व महाराष्ट्राबद्दल दिल्लीतील भाजपा सरकारला कायम आकस राहिला असून मुंबई व राज्याचे महत्व कमी करण्याचा विडाच मोदी सरकारने उचललेला आहे. शिंदे सरकार आल्यापासून महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प गुजरातला हलवून महाराष्ट्राचे नुकसान करण्यात आले. आता मुंबईतील वस्त्रोद्योग आयुक्तांचे कार्यालय दिल्लीला हलवण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे जाणीवपूर्वक केले जात असून महाराष्ट्राला बरबाद …

Read More »

बाळासाहेब थोरात यांची मागणी, साईबाबा संस्थानच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा त्यांच्या वेतनाचा लाभही द्या

अध्यात्मिकदृष्ट्या देशात अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या व अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या ५९८ कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून घ्यावे व वेतनातील फरक त्वरित द्यावा, अशी मागणी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत केली आहे. थोरात पुढे म्हणाले की, शिर्डी साई संस्थान मधील सुमारे ५९८ कंत्राटी कर्मचारी साधारणपणे …

Read More »

नाना पटोलेंचा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून खोचक टोला, राज्यात टाईमपास सरकार शेतकऱ्यांना मदत करण्याची शिंदे-फडणवीस सरकारकडे इच्छाशक्तीच नाही

अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. सरकारने तातडीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे अशी विरोधी पक्षांची मागणी आहे. परंतु शेतकरी संकटात असतानाही राज्य सरकार मदतीसाठी काहीच हालचाल करताना दिसत नाही. केवळ पोकळ घोषणा देऊन वेळ मारून नेत आहेत. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे …

Read More »

एकनाथ शिंदेंचे ठाकरेंना प्रत्युत्तर, आपटी बार, फुसका बारच्या थयथयाटाला मी उत्तर देणार नाही… यांच्याकडे फक्त तीनच शब्द खोके, गद्दार आणि विकलेले गेलेले

बाळासाहेब ठाकरेंच्या विचार वाचविण्यासाठी आम्ही त्यांच्या नेतृत्वाविरोधात आम्ही उठाव केला. ज्या काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाला बाळासाहेबांनी विरोध केला. त्यांच्याच मांडीला मांडी लावून तुम्ही बसण्यासाठी आणि मुख्यमंत्री पदाच्या लालसेतून तुम्ही बंड केलात. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांचे तुम्ही खरे गद्दारी केलीत. फक्त आम्ही बाळासाहेबांच्या विचारासाठी शिवसेना वाचविण्याचे काम करत त्यांच्या तावडीतून आणल्याचा प्रत्यारोप मुख्यमंत्री …

Read More »

नाना पटोलेंची टीका, त्यामुळे घाबरलेले पंतप्रधान मोदी पोलिसांना पुढे करतायत… काँग्रेस पक्ष अदानी मोदींचे काळे सत्य देशासमोर आणणारच

उद्योगपती गौतम अदानींचा हजारो कोटींचा महाघोटाळा आणि त्याचे नरेंद्र मोदींशी असलेले संबंध राहुल गांधी यांनी लोकसभेत उघड केल्यामुळेच घाबरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी पोलिसांना पुढे करून राहुल गांधींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, पण राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष हुकूमशाही वृत्तीच्या मोदी सरकारच्या दडपशाहीला भीक घालत नाही. अदानी मोदींच्या महाघोटाळ्या विरोधात …

Read More »

राहुल गांधीच्या माफीप्रकरणी संजय राऊत म्हणाले, माफी मागायची असेल तर आधी… गांधींच्या विधानावर संसदेत सध्या सुरु भाजपाकडून करण्यात येत असलेल्या आक्रमक भूमिकेवर राऊत यांचे वक्तव्य

काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी हे लंडनच्या तीन दिवसीय दौऱ्यावर होते. त्यावेळी तेथील भारतीय पत्रकारांच्या संघटनेच्यावतीने घेण्यात आलेल्या मुलाखती दरम्यान आणि तेथील थिंक टँक या संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी देशातील एकूण राजकिय घडामोडींवर भाष्य केले. त्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार खळबळ उडाली असून, संसदेतही भाजपाकडून राहुल …

Read More »

श्रीनगरमधील त्या वक्तव्याप्रकरणी राहुल गांधींची दिल्ली पोलिसांकडून २ तास चौकशी बलात्कार पिडीतांवरील वक्तव्याची माहिती घेण्यासाठी दिल्ली पोलिस सकाळपासून राहुल गांधींच्या घरी

कन्याकुमारी ते काश्मीर दरम्यान काढण्यात आलेली भारत जोडो यात्रा श्रीनगर मध्ये पोहोचली. या यात्रे दरम्यान, अनेक व्यक्ती, तरूण आणि मुली-महिला राहुल गांधी यांना भेटत होत्या. त्याच्यावर झालेल्या अन्यायाची, संकटाची, अडचणींची माहिती देत होत्या. भारत जोडो यात्रा काश्मीर मध्ये पोहोचल्यानंतर श्रीनगर येथे झालेल्या जाहिर सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यात्रे …

Read More »

छगन भुजबळ भावनिक होत म्हणाले, माझा धाकटा भाऊ स्व.गोपीनाथराव मुंडे असते तर मी… लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांनी ओबीसीसह समाजातील वंचित घटकांसाठी सुरू केलेलं काम शेवटचा श्वास असेपर्यंत सुरू ठेवणार

स्व.गोपीनाथ मुंडे यांनी राज्यातील ओबीसीसह पीडित सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आयुष्यभर लढा दिला. त्यांनी सुरू केल्याल्या कामाची सर्व जबाबदारी आता माझ्यावर आणि तुमच्यावर आहे. त्यामुळे शेवटचा श्वास असेपर्यंत त्यांचं काम सुरू ठेवू असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. नांदूर शिंगोटे येथे लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या गोपीनाथ गड या …

Read More »

नाना पटोलेंचा टोला, एकनाथ शिंदेंचे चांगले व्हावं हिच आमची सदिच्छा, पण आता कुठे सुरुवात… चंद्रशेखर बानवकुळे यांच्या व्हायरल व्हिडिओवरून शिंदेना काढला चिमटा

भाजपा कार्यकर्त्ये आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी विधानसभा निवडणुदरम्यान भाजपा २४० जागा लढेल, अशा आशयाचं विधान केले. तसेच फक्त ४८ जागा शिंदे गटाला देण्यात येणार असल्याचे वक्तव्य केले. त्यांच्या या विधानानंतर विविध राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, नाना पटोले यांनी या विधानवरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर …

Read More »

नाना पटोलेंचा टीका, सरकार पडण्याची चाहुल लागल्याच्या भितीनेच मंत्रालयात लगबग सुरु सरन्यायाधिशांना ट्रोल करण्याची हिम्मत करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा

राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असताना सरन्याधीशांनी जी निरिक्षणे नोंदवली, ताशेरे ओढले यातून निर्णय आपल्याविरोधात जातो की काय या भीतीने सरन्यायाधीशांनाच काही लोकांनी ट्रोल केले हे लांछनास्पद आहे. ट्रोल करण्याची भाडोत्री व्यवस्था कोणाकडे आहे हे सर्वांना माहित असून सरन्याधीशांना ट्रोल करण्याची हिम्मत करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, म्हणूनच काँग्रेसचे खासदार …

Read More »