Breaking News

Tag Archives: congress

शरम असेल तर महापौर व मनपा आयुक्तांची हकालपट्टी करा मुंबईतील सर्व पुलांचे पुन्हा ऑडिट करण्याची काँग्रेसची मागणी

मुंबई: प्रतिनिधी मुंबई हे शासन आणि महापालिका पुरस्कृत अपघातांचे शहर झाले आहे. भाजप, शिवसेनेच्या भ्रष्ट आणि दळभद्री कारभारामुळे मुंबईकरांचे जगणे कठीण आणि मरण सोपे झाले आहे. सातत्याने पूल कोसळण्याच्या आणि आगींच्या घटनांमध्ये मुंबईकर मारले जात आहेत या निर्लज्ज आणि बेजबाबदार कारभाराची जबाबदारी देखील घेतली जात नाही. हे अत्यंत संतापजनक असून …

Read More »

दानवेंच्या पराभवासाठी खोतकरांचा शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र ? काँग्रेसमध्ये खोतकरांचे स्वागत असल्याचे आ.अब्दुल सत्तार यांचे वक्तव्य

औरंगाबादः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेनेमध्ये जरी युती जरी झालेली असली तरी या दोन्ही पक्षांमध्ये सारेच काही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. जालना लोकसभा मतदारसंघावरून खा. रावसाहेब दानवे यांच्याविरोधात शिवसेनेचे मंत्री अर्जून खोतकर यांनी दंड थोपटत दानवेंना पराभूत करण्याचे जाहीर केले आहे. मात्र शिवसेनेकडून याबाबत कोणतीच भूमिका जाहीर करत नसल्याने …

Read More »

पवारांच्या त्या वक्तव्यामुळे सुजयचा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचा खुलासा

मुंबईः प्रतिनिधी अहमदनगरच्या जागेबाबत आघाडीचा कुठलाही निर्णय झाला नव्हता, अशा वेळी शरद पवारांनी आमचे वडील बाळासाहेब यांच्याबाबत केलेले विधान दुर्देवी होतं. याचं मला व्यक्तिशः वाईट वाटलं. आघाडीत सदस्य असताना आणि आमचे वडील हयात नसताना त्यावर टिपण्णी करणे पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला शोभणारं नव्हतं. पवारांचे हे विधान आल्यानंतर सुजयने भाजपात जाण्याचा निर्णय …

Read More »

सरकारी जाहीरातींमुळे आचार संहितेचा भंग होतोय जाब विचारून गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची मागणी

मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता दि. १० मार्च रोजी पासून लागू झालेली असतानाही राज्यभरातील एसटी बसेस, बस थांबे, पेट्रोल पंपासहित इतर सार्वजनिक ठिकाणी असलेल्या सरकारी प्रचाराच्या जाहिराती अद्याप काढण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे निवडणूक आयोगाने सरकारला जाब विचारून संबधितांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी …

Read More »

राज्यातील जागा वाटप आणि परिस्थितीचा काँग्रेस आढावा घेणार गुरूवारी गांधी भवन येथे होणार बैठक

मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत असलेली परिस्थिती आणि संभावित विजयी जागांचा आढावा घेण्यासाठी गुरूवारी सकाळपासून प्रदेश काँग्रेस कार्यकारणीची बैठक होणार आहे. ही बैठक प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली होणार असल्याची माहिती काँग्रेसमधील सूत्रांनी दिली. ऐन लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून जाहीर केलेली …

Read More »

लोकसभेसाठी राष्ट्रवादीचा आमदार काँग्रेसच्या वाटेवर आमदार सतीश चव्हाण हाताच्या पंजावर लढविणार निवडणूक

औरंगाबाद : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजला असून, मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण हे काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ.अब्दुल सतार यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच इतर उमेदवारांची नावे म्हणून जालना मतदारसंघातून डॉ. कल्याण काळे किंवा मी स्वतः यांच्यापैकी एक उमेदवार …

Read More »

भाजप खुशीत तर काँग्रेस कोमात काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्यांचे सुपुत्र सुजय यांचा अखेर भाजप प्रवेश

मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने एकापक्षातून दुसऱ्या पक्षात कोलांट उंडी मारणाऱ्या आयाराम-गयारामांची सुरुवात झालेली आहे. मात्र या यादीत आता काँग्रेसचे विधानसभेतील विरोदी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे-पाटील यांचे नाव समाविष्ट झाले असून त्यांचा आज मंगळवारी भाजपमध्ये औपचारीक प्रवेश केला. त्यामुळे भाजप जोशात तर काँग्रेस कोमात गेल्याची चर्चा राजकीय …

Read More »

देशात ७ तर महाराष्ट्रात ४ टप्प्यात लोकसभा निवडणूकीसाठी मतदान २३ मे ला मतमोजणी होणार असल्याची निवडणूक आयोगाची घोषणा

नवी दिल्ली : प्रतिनिधी विद्यमान लोकसभेचा कार्यकाल जून महिन्यात संपणार असल्याने तत्पूर्वी नवी लोकसभा अस्तित्वात येण्यासाठी लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता आज रविवारपासून लागू झाल्याचे जाहीर करत देशात एकूण ७ टप्प्यात तर महाराष्ट्रात ४ टप्प्यात निवडणूका घेण्यात येणार असल्याची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी केली. तसेच यंदाच्या निवडणूकीत व्हीव्हीपँट मशिन्स …

Read More »

भ्रष्टाचारप्रकरणी महिला व बालविकास मंत्र्यांची हकालपट्टी करा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी महिला व बालविकास विभागातर्फे घरपोच आहाराचे सुमारे ६ हजार ३०० कोटी रूपयांचे कंत्राट सर्वोच्च न्यायालयाने रद्द करून सरकारचे तोंड काळे केले आहे. याच निर्णयाद्वारे बालकांना शिजवलेले गरम अन्न देण्याऐवजी प्रिमिक्स पाकिटे देण्याचे कंत्राट सरकारने याच माफियांना दिले होते. ते ही सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. या संपूर्ण प्रकरणात प्रचंड …

Read More »

हुकुमशाही सरकारविरोधात काँग्रेस सेवादलाची तिंरगा पदयात्रा ९ मार्च रोजी रोजी निघणार

मुंबईः प्रतिनिधी केंद्रातील व राज्यातील भाजप सरकार हुकुमशाही पद्धतीने कारभार करत आहे. संविधानिक संस्थांची गळचेपी सुरु असून देशाचे संविधान आणि लोकशाही धोक्यात आली आहे. संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी शनिवारी ९ मार्च रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष विलास औताडे यांच्या नेतृत्वाखाली टिळक भवन दादर येथून तिरंगा पदयात्रा काढण्यात येणार आहे. …

Read More »