Breaking News

Tag Archives: congress

शहिद निनाद मांडवगणे यांच्या कुटुंबियांची विरोधी पक्षनेत्यांनी घेतली भेट सरकारबरोबरच प्रवरा परिवारही पाठीशी उभारणार असल्याची मांडवगणे कुटुंबियांना ग्वाही

नाशिक : प्रतिनिधी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी वीरवैमानिक शहिद निनाद मांडवगणे यांच्या परिवाराची आज नाशिक येथे सांत्वनपर भेट घेतली. तसेच राज्य सरकारबरोबरच प्रवरा परिवार त्यांच्या पाठीशी उभा राहणार असल्याची ग्वाही विखे-पाटील यांनी मांडवगणे कुटुंबियांना दिली. शहिद निनाद मांडवगणे हे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सिन्नर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे …

Read More »

राहुल गांधी यांनी घेतली स्व.कामत यांच्या कुटुंबियांची भेट स्व. गुरुदास कामत यांच्या आठवणींना उजाळा

मुंबईः प्रतिनिधी माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्त्ये स्व. गुरूदास कामत यांच्या निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी कामत कुटुंबियांची शुक्रवारी भेट घेतली. यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जून खर्गे हे ही उपस्थित होते. यावेळी स्व.गुरूदास कामत यांनी काँग्रेस पक्ष वाढीसाठी …

Read More »

इंदू मिल व छत्रपती स्मारकाचे काम इंचभरही पुढे सरकले नाही राधाकृष्ण विखे-पाटील, धनंजय मुंडे यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारकडून नुसता घोषणांचा पाऊस पाडण्यात येत असून बिहार निवडणूकीच्या आधी इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन झाले. त्यास आता वर्षे लोटली. तीच अवस्था छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाची असून स्मारकाच्या पुतळ्याच्या उंचीचा वाद अद्यापही संपलेला नाही. या दोन्ही स्मारकाबाबत राज्य सरकार सांगतेय तशी परिस्थिती खरी …

Read More »

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नैराश्याच्या खाईत ढकलणारा अर्थसंकल्प! विरोधी पक्षनेते विखे पाटील यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी भाजप-शिवसेना सरकारने मांडलेला अंतरिम अर्थसंकल्प दुष्काळग्रस्तांना नैराश्याच्या खाईत ढकलणारा असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. अंतरिम अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रूपये थेट आर्थिक मदत देण्याची गरज होती. खरीप २०१८ पर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्याची आवश्यकता …

Read More »

छावण्या बंद…लावण्या सुरु विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

मुंबई : प्रतिनिधी छावण्या बंद… लावण्या सुरु… शेतकऱ्यांना मदत न करणार्‍या सरकारचा धिक्कार असो… मेगाभरती रद्द करणाऱ्या सरकारचा निषेध असो…छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम थांबणार्‍या सरकारचा धिक्कार असो… मोदी हटाव… देश बचाव… अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस आणि आघाडीतील पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला. अर्थसंकल्प अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही विरोधकांनी …

Read More »

मतदान केंद्रांवर सर्व सुविधा उपलब्ध करून द्या आयोगाने घेतला निवडणूक तयारीचा जिल्हानिहाय आढावा

मुंबई: प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने राज्यातील निवडणूक तयारीचा जिल्हानिहाय आढावा आज भारत निवडणूक आयोगाचे आयुक्त अशोक लवासा आणि सुशील चंद्रा यांनी आज येथे घेतला. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे कालपासून निवडणूक आयुक्त लवासा आणि चंद्रा राज्यातील यंत्रणांशी बैठका घेऊन निवडणूक तयारीचा आढावा घेत आहेत. उप निवडणूक आयुक्त  सुदीप …

Read More »

पाकिस्तानची हिम्मत होणार नाही इतकी कठोर कारवाई करा भारतीय हवाई दलाच्या जवानांनो भले शाब्बास! : खा. अशोक चव्हाण

मुंबईः प्रतिनिधी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये घुसून बेधडक हल्ला केला आणि दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले. ही प्रत्येक भारतीयासाठी अतिशय आनंदाची व अभिमानाची बाब आहे. भारतीय सैनिकांचा प्रत्येक भारतीयाला सार्थ अभिमान आहे. या असामान्य शौर्याचे कौतुक करण्याकरिता शब्द अपुरे आहेत. परंतु हृदयातून भले शाब्बास हे उद्गार आपसूकच बाहेर पडत आहेत. अशा …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ढोंगीपणा पुन्हा एकदा उघड

काँग्रेस प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांची टीका मुंबईः प्रतिनिधी जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यामध्ये ४० जवान शहीद झाले आहेत. या घटनेला २४ तास पूर्ण होण्याच्या आत पंतप्रधान नरेंद्र मोदी आक्रमक राजकीय प्रचार मोहीम राबवीत आहेत त्यामुळे सैनिकांविषयी त्यांचे पुतना मावशीचे प्रेम उघडे पडले असून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ढोंगीपणा उघड …

Read More »

८ महिन्याचा काळ, पण ४ महिन्याच्या खर्चाला मंजूरी

मुदतीपूर्वी विधानसभा बरखास्तीची शक्यता मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विधानसभा निवडणूकीला आणखी ८ महिन्याचा कालावधी आहे. मात्र आगामी लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागणार आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून मांडण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात पूर्ण वर्षाचा अर्थसंकल्प मांडत फक्त चार महिन्याच्या खर्चाला मंजूरी देण्यात येणार असल्याने मुदतीपूर्व विधानसभा बरखास्तीचा विचार राज्य सरकारकडून …

Read More »

मोदीलाट ओसरल्याने पवारांसह अनेक मातब्बर निवडणूकीच्या रिंगणात?

शरद पवार, मुत्तेमवार, शिंदे, चव्हाण यांच्यासह अनेकांचा समावेश मुंबई : प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या आचारसंहितेला आता काही दिवसांचाच अवधी शिल्लक राहीलेला असतानाच भाजपच्या मोदीलाटेच्या वाटवटळीतून आपले राजकीय जहाज वाचविलेल्या आणि बुडालेल्या अनेक नेत्यांनी आता पुन्हा निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरु केली असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, छगन भुजबळ, काँग्रेसचे …

Read More »