Breaking News

Tag Archives: congress

‘बेटी बचाओ’चा नारा देणारे पंतप्रधान मूग गिळून गप्प का? हाथरस पीडित कुटुंबियांना न्याय देण्याच्या मागणीसाठी सोमवारी काँग्रेसचा सत्याग्रह: थोरात

मुंबई: प्रतिनिधी उत्तर प्रदेशातील हाथरसच्या घटनेने देशाला शरमेनं मान खाली घालायला लावली पण भाजपाच्या योगी आदित्यनाथ सरकारची थोडीही संवेदना जागी झाली नाही. हे प्रकरण अत्यंत बेजबाबदारपणे व हुकुमशाही पद्धतीने हाताळण्यात आले. पीडित कुटुंबाला न्याय देण्याऐवजी त्यांना धमक्या देण्यापर्यंत उत्तर प्रदेश सरकारची मजल गेली. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष …

Read More »

सुशांतसिंग प्रकरणात महाराष्ट्राला बदनाम करणारा भाजपा उघडा पडला एसआयटी चौकशीची काँग्रेस मागणी

मुंबई : प्रतिनिधी सुशांतसिंग याने आत्महत्या केल्याचा अहवाल एम्समधील  डॉ. सुधीर गुप्ता यांच्या पथकाने दिलेला असून मुंबई पोलीसांचे चारित्र्य उजळून निघाले आहे. त्यांनी केलेली चौकशी प्रामाणिक व योग्य दिशेनेच चालली होती. सर्वोच्च न्यायालयानेही मुंबई पोलीसांचा तपास योग्यच होता असे म्हटले होते. त्यामुळे महाराष्ट्राची बदनामी करणारा भाजपा उघडा पडला आहे. महाराष्ट्राला …

Read More »

मोदी धृतराष्ट्र झाले का? गांधी जयंती दिवशी युपीमध्ये लोकशाहीचे किळसवाणे वस्त्रहरण! काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिवशी उत्तर प्रदेश सरकारने सत्तेच्या धुंदीत लोकशाहीचे चालवलेले किळसवाणे वस्त्रहरण सर्व देश पहात आहे. महाभारतात देखील महिलेवर दुर्योधन, दु:शासन अत्याचार करत असताना धृतराष्ट्रासह सर्वजण हातावर हात धरून गप्प बसले होते. आज हाथरसमध्ये एका दलित परिवारातील मुलीवर बलात्कार करुन तीची हत्या झाली आणि ते …

Read More »

उत्तर प्रदेश पोलिसांनी वाईट वागणूक देवूनही राहुल गांधी म्हणाले….. वाचण्यासाठी क्लिक करा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना न घाबरण्याचा सल्ला

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी मृत दलित मुलीच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी निघालेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अशोभनीय वागणूक दिली. तसेच त्यांना १४४ कलमान्वये अटकही केली. तरीही राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी इतकेही घाबरू नये असा सल्ला दिला. ते म्हणतात, युपी मे जंगलराज का ये …

Read More »

बाबरी मशीद खटल्याचा निकाल धक्कादायक असून वस्तुस्थितीला धरून नाही काँग्रेसचे माजी खा. हुसेन दलवाई यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी बाबरी मशीद खटल्याप्रकरणी सीबीआय कोर्टाने आज दिलेला निकाल धक्कादयक असून वस्तुस्थितीला धरून नाही. यामुळे देशातील जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडेल अशी भीती माजी खा. हुसेन दलवाई यांनी व्यक्त केली. बाबरी मशीद पाडण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवाराकडून राष्ट्रव्यापी मोहीम राबविण्यात आली. रथयात्रा काढण्यात आल्या, दंगली घडविल्या यात …

Read More »

केंद्रात शेतकऱ्यांचे नाही तर सुटबुटवाल्यांचे सरकार शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, काँग्रेसचे राज्यपालांना निवेदन

मुंबई: प्रतिनिधी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विषयक विधेयकाला काँग्रेस पक्षाचा विरोध आहे. ही विधेयके शेतकरी विरोधी असून ते रद्द केले पाहिजेत अशी भूमिका असून या विधेयकाच्या विरोधात देशभरात काँग्रेस पक्ष आंदोलन करत आहे. कोणाशीही चर्चा न करता शेतकरी विरोधी कायदे लादणारे केंद्रातील भाजप सरकार हे जनसामान्यांचे, शेतक-यांचे नसून फक्त …

Read More »

अस्तित्वाच्या भीतीने काँग्रेसचा शेतकरी, कामगार विधेयकांबाबत अपप्रचार भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी शेतकरी आणि कामगार वर्गाच्या कल्याणात मैलाचा टप्पा ठरणारी विधेयके संसदेत मंजूर झाली आहेत.  राजकीय अस्तित्वाच्या भीतीने सैरभैर झालेल्या काँग्रेसकडून मोदी सरकारच्या प्रत्येक निर्णयाबाबत जनतेच्या मनात संभ्रम पसरविण्याचे काम सुरु असल्याची टीका करत शेतकरी , कामगार या अपप्रचारावर विश्वास ठेवणार नाहीत, असा विश्वास भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केला. …

Read More »

देशात पुन्हा जमीनदारी पद्धत आणण्याचा केंद्रातील भाजप सरकारचा प्रयत्न महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार बड्या उद्योगांच्या दबावाखाली असून निवडक उद्योगपतींच्या फायद्यासाठी सरकारने शेतकरी आणि कामगारांना उद्धवस्त करणारे कायदे आणले आहेत. हे कायदे आणून देशात पुन्हा जमीनदारी पद्धत आणण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न आहे. हे शेतकरीविरोधी कायदे रद्द होईपर्यंत काँग्रेस कार्यकर्ते गावागावात जाऊन शेतक-यांसोबत मिळून संघर्ष करतील, असा इशारा …

Read More »

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आता ‘नमो कंट्रोल्ड ब्युरो’ झाला आहे का? ड्रग कनेक्शन चौकशीत एनसीबीची कंगणावर मेहरबानी का? काँग्रेसचा सवाल

मुंबई: प्रतिनिधी सुशांतसिंह प्रकरणातून बॉलिवूडचे ड्रग कनेक्शन उघड होताच एनसीबीने काही लोकांना अटक केली. आता बॉलिवूडमधील काही कलाकारांची चौकशी होत असताना या प्रकरणाशी संबंधीत असलेल्या भारतीय जनता पार्टी-बॉलिवूड-सँडलवूड-गोवा ड्रग कनेक्शनची चौकशी एनसीबी का करत नाही, हा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB ) आता ‘नमो कंट्रोल्ड ब्युरो’ झाला आहे का, असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश …

Read More »

मुंबई पोलिसांचा अपमान करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेंना भाजपकडून बक्षीस? महाराष्ट्राला बदनाम करण्याचा भाजपाचा हीन डाव उघड !: सचिन सावंत

मुंबई : प्रतिनिधी अभिनेता सुशांतसिंग प्रकरणाचा वापर करुन महाराष्ट्राला बदनाम करत राष्ट्रीय महत्व कमी करण्याचा भाजपाचा डाव उघड झाला आहे. या कटाचा एक भाग असलेले बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी व्हीआरएससाठी अर्ज केला असून तो तात्काळ मंजूरही करण्यात आला आहे. या पांडेंना लवकरच भाजपाकडून मोठे बक्षीस मिळू शकेल यात शंका …

Read More »