Breaking News
Responsive Iframe Example

Tag Archives: congress

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उंचीवरून विरोधकांचे रणकंदन सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याने सभागृहाचे कामकाज तहकूब: राजदंड पळविला

नागपूर : प्रतिनिधी अरबी समुद्रात उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची कमी करून त्याऐवजी त्यांच्या तलवारीची उंची वाढविण्याची योजना राज्य सरकारची असल्याची सत्य माहिती अधिकारातून उघडकीस आले आहे. त्यामुळे पुतळ्याची उंची कमी करण्याचा कोणताही अधिकार राज्य सरकारला नसल्याचा टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी करत याप्रकरणी सरकारने …

Read More »

नाणार प्रकल्पावरून विधानसभेत तिसऱ्या दिवशीही गोंधळ सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब

नागपूर : प्रतिनिधी मागील दोन दिवसांपासून कोकणातील नाणार प्रकल्पावरून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून सातत्याने विधानसभेत विरोध करण्यात येत आहे. या प्रश्नी आज शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका जाहीर न केल्याने शिवसेनेसह सर्वच विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. याच मुद्द्यावरून सुरुवातीला सभागृहाचे …

Read More »

काँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेनेच्या आक्रमकतेमुळे विधानसभा दिवसभरासाठी तहकूब मात्र गोंधळात विधेयके मंजूर करण्यासाठी सरकारसोबत हात मिळवणी

नागपूर : प्रतिनिधी नाणार प्रकल्पाप्रश्नी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतल्यामुळे केवळ नाईलाजास्तव शिवसेनेलाही आक्रमक भूमिका घ्यावी लागल्याने विधानसभेचे कामकाज तब्बल पाच वेळा तहकूब करत दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. दरम्यान सरकारला विधेयके मंजूर करून घेण्यासाठी या तिन्ही राजकिय पक्षांनी सहकार्य केल्याने नाणार प्रश्नी रडीचा डाव असल्याचे फक्त करण्यात आल्याचे सभागृहात …

Read More »

नाणार प्रश्नी राणेंची शिवसेनेला साथ राजदंड पळविल्याने सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब

नागपूर : प्रतिनिधी कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या मुद्यावरून काँग्रेसने स्थगन प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रश्नी क्रेडिट घेण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला. अखेर याची परिणीती काँग्रेसच्या नितेश राणे यांनी शिवसेनेच्या आमदारांना साथ देत राजदंड पळविल्याने विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. नाणार प्रश्नी जवळपास चारवेळा तहकूब झाल्यानंतर पाचव्यांदा सभागृहाचे कामकाज …

Read More »

नाणार प्रश्नी प्रस्ताव काँग्रेसचा मात्र गोंधळ शिवसेनेचा सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब

नागपूर : प्रतिनिधी कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात शिवसेनेने विरोध दाखविण्यास सुरुवात केला. तरी या प्रकल्पाच्या विरोधात कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव विधानसभेत आणला नाही. परंतु या प्रकल्पाच्या अनुषंगाने काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बुधवारी प्रस्ताव मांडताच शिवसेनेचे सर्व आमदार अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जमा होत नाणार प्रकल्पाच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देण्यास …

Read More »

भुजबळांना रोखण्यासाठी सत्ताधारी आमदारांचा पुढाकार राष्ट्रवादीच्या आमदारांऐवजी काँग्रेसचे आमदार धावले मदतीला

नागपूर : प्रतिनिधी तब्बल सव्वादोन वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी विधानसभेत आगमन झाल्यानंतर आज ते पहिल्यांदा काय बोलणार याबाबत सबंध सभागृहात उत्सुकता होती. मात्र त्यांच्या वाग्बाणात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे घायाळ झाल्याने त्यांनी भुजबळ यांच्यावर चिडून प्रत्तितुर देण्याचा प्रयत्न केला. तरीही  भुजबळ हे थांबले जात नसल्याचे पाहून सत्ताधारी …

Read More »

शिवसेनेच्या तीन तर भाजपच्या एका जागेच्या विजयाची औपचारीकता बाकी विलास पोतनीस, कपिल पाटलांच्या विजय जवळपास निश्चित

मुंबई : प्रतिनिधी विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मतदारसंघ, मुंबई पदवीधर मतदार संघात, कोकण शिक्षक मतदारसंघासाठी झालेल्या निवडणूकीत शिवसेनेला तीन जागांवर विजय मिळल्याचे सांगण्यात येत आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत कपिल पाटील आणि कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे हे आघाडीवर असल्याची माहिती संध्याकाळ पर्यंत हाती आली असून या जागांच्या विजयाची …

Read More »

लोकशाही पायदळी तुडविणारेच लोक आता संविधान बचावचा नारा देतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कॉंग्रेसवर हल्लाबोल

मुंबई : प्रतिनिधी व्यक्ती स्वातंत्र  हिरावून घेत ज्यांनी देशात जाचक आणीबाणी लादून संविधान पायदळी तुडवले, तेच लोक आता संविधान बचावचा नारा देत असल्याची टीका काँग्रेसवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करत २६ जून १९७५ साली इंदिरा गांधी सरकारने देशात आणबाणी जाहीर करत सरकार विरोधी बोलणाऱ्यांना तुरुंगात डांबण्याचे काम केल्याचा आरोपही त्यांनी …

Read More »

एमपीएससी आणि वैद्यकीय प्रवेशात मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर अन्याय कॉंग्रेस आमदार हरिभाऊ राठोड यांचा सरकावर आरोप

मुंबई : प्रतिनिधी एमपीएससी परिक्षेतील उत्तीर्ण होणाऱ्या मागासवर्गीय परिक्षार्थी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर राज्य सरकारकडून अन्याय करण्यात येत आहे. या दोन्ही ठिकाणी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना चांगले मार्क आणि मार्काच्या आधारे खुल्या प्रवर्गातून प्रवेश मिळत असला तरी या विद्यार्थ्यांपेक्षा खुल्या प्रवर्गातील कमी मार्क मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देवून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना …

Read More »

मोदी सरकार देशातील गरिबांची लूट करुन श्रीमंतांचे खिसे भरतेय नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकारवर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा हल्लाबोल

मुंबई : प्रतिनिधी संपूर्ण देशात महाआघाडी असावी अशी देशातील जनतेची भावना असून देशातील सर्व विरोधी पक्ष एकवटले आहेत. तसेच सर्व पक्ष पंतप्रधान मोदी आणि भाजप आणि आरएससच्या कारभाराच्या विरोधात एकवटले आहेत. केवळ राजकीय पक्षच नाही तर जनतेमध्येही सरकारविरोधी भावना आहे. या भावनेला जोडण्याचे काम कॉग्रेस करत असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे अध्यक्ष …

Read More »