Breaking News

Tag Archives: cm fadnavis

लवकरच अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांपासून ते पोलिस उपनिरिक्षकांपर्यंतच्या बदल्या होणार

निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश मुंबई : प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू होण्यास अवघा महिना शिल्लक राहीलेला असतानाच राज्याच्या विविध भागात नियुक्तीवर असलेल्या अतिरिक्त जिल्हाधिकारी पासून नायब तहसीलदार आणि पोलिस दलातील आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यापासून ते पोलिस उपनिरिक्षक पदावरील सर्वांच्या बदल्या करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले. त्यामुळे लोकसभा निवडणूकीच्या …

Read More »

ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी ज्येष्ठ विधिज्ञाची नेमणूक करा

छगन भुजबळ यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी  मुंबई : प्रतिनिधी ओबीसी आरक्षणासंदर्भात दाखल झालेल्या याचिकेबाबत बाजू मांडण्यासाठी जेष्ट विधिज्ञाची नेमणूक करण्यात यावी. जर न्यायालयात ओबीसी आरक्षणाला स्थगिती मिळाली तर राज्यात मोठा उद्रेक निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण होणार असल्याने सरकारने याबाबत तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी …

Read More »

पुणे मेट्रो प्रकल्पासाठी २ हजार कोटींचा सामंजस्य करार

लवकरच युरोपियन बँकेबरोबर ४ हजार कोटींचा करार होणार नवी दिल्ली : प्रतिनिधी पुणे मेट्रो प्रकल्पासाठी एएफडी फ्रांस बॅक आणि केंद्रसरकार यांच्यात आज दोन हजार कोटींचा करार झाला. लवकरच युरोपियन इनव्हेसमेंट बँकेसोबतही चार हजार कोटींचा करार होणार असल्याची माहिती महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली. येथील नॉर्थ …

Read More »

… दिल्लीचेही तख्त शिवसेना हलवणार

शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत यांचा इशारा  मुंबई : प्रतिनिधी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेनेमध्ये युती करण्यावरून राजकीय कलगीतुरा सुरु आहे. मात्र युतीचा प्रस्ताव नसला तरी दिल्लीचे तख्त शिवसेना हलविणार असल्याचा इशारा शिवसेनेचे प्रवक्ते खा.संजय राऊत यांनी देत भाजपला एकप्रकारे आव्हान दिले. निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजपबरोबर युती करायची की …

Read More »

भरती प्रक्रिया पूर्ण होत आलीय आव्हान द्यायचे असेल तर खुशाल द्या

सरळसेवा भरतीसाठीच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी मुंबई : प्रतिनिधी एकाबाजूला राज्यातील बेरोजगारांची संख्या कमी करण्यासाठी आणि शासनातील रिक्त पदे भरण्यासाठी सरकारच्या विविध विभागाकडून विशेष नोकरभरती मोहीम राबविण्यात येत आहे. तर दुसऱ्याबाजूला राज्य सरकारच्याच अखत्यारीत असलेल्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या जाहीरातीतील चुकीच्या तरतूदींमुळे अनेक बेरोजगार वंचित राहण्याची बाब …

Read More »

या दळभद्री सरकारला उलथवून टाका

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची टीका कोल्हापूर – कागल: प्रतिनिधी लाखांचा पोशिंदा सुखी नाही… आया बहिणी सुरक्षित नाहीत… कुपोषणाने डोके वर काढले आहे… अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत हे असलं दळभद्री सरकार असून याला उलथवून टाका अशी जोरदार टिका विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी कागलच्या जाहीर सभेत केली. १५ …

Read More »

आश्रमशाळांना अनुदान द्या, अन्यथा २६ जानेवारीला आत्मदहन करू

प्रशासनकडून घोळ घालण्यात येत असल्याचा संस्थाचालकांचा आरोप मुंबई : प्रतिनिधी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये दलित, आदीवासी समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात सुरु करण्यात आलेल्या आश्रमशाळांना २० टक्के अनुदान देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तरीही मागील सहा महिन्यापासून या आश्रमशाळांना अद्याप अनुदान देण्यास सुरुवात न केल्याने संस्था चालक, …

Read More »

मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मॅको बॅंकेला प्रथम पुरस्कार

पगारदार सेवकांची बँक गटात सर्वोत्कृष्ट कार्य  मुंबई : प्रतिनिधी देशभरातील नागरी बँका तसेच पगारदारांच्या सहकारी बँकांना ‘एव्हीएस पब्लिकेशन’ तर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या बॅंको पुरस्कार स्पर्धेत मंत्रालयातील अधिकाऱी आणि कर्मचाऱ्यांच्या दि महाराष्ट्र मंत्रालय ॲन्ड ऑफिसेस को-ऑप बॅंक लि., मुंबई (मॅको बॅंक) ची प्रथम पुरस्कार देऊन सर्वोत्कृष्ट बँक म्हणून निवड केली. या स्पर्धेतील ‘पगारदार सेवकांची बँक’ या …

Read More »

रामदेव बाबांच्या पतंजलीची कोट्यावधी रूपयांची स्टँम्प ड्युटी माफ करण्याच्या हालचाली

महसूल विभागाकडून लवकरच अंतिम निर्णय होणार मुंबई : प्रतिनिधी नागपूर येथील मिहान प्रकल्पात सवलतीच्या दरात रामदेव बाबांच्या पतंजली कंपनीला स्वस्त दरात जमिन दिल्यानंतर जमिनीच्या येणेसाठी भरावी लागणारी साडेतीन कोटी रूपयांची स्टँम्प ड्युटी माफ करण्याच्या हालचाली राज्य सरकारकडून सुरु असल्याची धक्कादायक माहिती सामान्य प्रशासन विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. विदर्भाच्या विकासाच्या दृष्टीकोनातून …

Read More »

मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातही ईव्हीएम मॅनेज केलेत का?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचे फडणवीसांवर टीकास्त्र महाड : प्रतिनिधी महाराष्ट्रात अजून विधानसभेसाठी मतदान झालेले नाही. तरीही राज्याचा पुढील मुख्यमंत्री मीच, असा दावा देवेंद्र फडणवीस करत आहेत. ईव्हीएमबाबत लंडनमध्ये नुकत्याच झालेल्या गौप्यस्फोटानंतर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र विधानसभेसाठीही ईव्हीएम मॅनेज करून ठेवलेत की काय, अशी शंका निर्माण झाल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे …

Read More »