Breaking News

Tag Archives: chief minister

मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सात दिवसांच्या आत मदत शेत पीके व पडझड झालेल्या घरांची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

पारनेर तालुक्यातील वनकुटे गावात नुकतेच वादळी वारा, गारपीटीसह झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने झालेल्या नुकसानाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाहणी केली‌. “एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही यासाठी युद्धपातळीवर पंचनामे करुन एका आठवड्यात शेतकऱ्यांचा खात्यात आर्थिक मदत वितरित करण्यात येईल.” अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वनकुटे गावातील …

Read More »

बाबरी प्रकरणी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे म्हणाले, मी चंद्रकांत पाटील यांच्याशी बोललो त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सत्तेतील काही मंत्री काही दिवसांपूर्वी अयोध्येमध्ये जाऊन आले. त्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वबूमीवर भाजपा नेते आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाबरी पाडल्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून सत्ताधारी भाजपा-शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात खडाजंगी सुरू झाली …

Read More »

संजय राऊत यांचा हल्लाबोल, पलायन करणारी; पळपुट्यांना घेऊन सरकार बनवणारी भाजपा… डॉ.मिधें आणि ४० आमदारांनी जाहिर करावं आम्ही गुलाम

बाबरी मस्जिद विध्वंस प्रकरणी श्रेय घेण्यापासून लांब पळणारी भाजपा आता त्याच श्रेयासाठी आक्रमक झाल्याचे दिसून येत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे शिवसेनेत पडलेली दुफळी यासाठी महत्वाची मानली जात असून भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा विद्यमान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाबरीचा ढाचा पाडण्यासाठी शिवसेना किंवा शिवसेना प्रमुख बाळासाहेब …

Read More »

जयंत पाटील यांची टीका, शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीकडे सरकारचा सहानुभूतीचा दृष्टीकोन… पहिल्यांदाच देवाच्या दर्शनासाठी अख्खं सरकार जाते हा प्रकार पहिल्यांदाच दिसतो

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीकडे सरकारचा सहानुभूतीचा दृष्टीकोन दिसत नाही. अवकाळी पाऊस वेगवेगळ्या भागात पडत आहे. पंचनामे ताबडतोब करणे व तात्काळ मदत करणे अशी भूमिका राज्य सरकारची दिसत नाही याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आज राष्ट्रवादी भवन येथे बैठकीला …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर अन् म्हणाले, मदतीबाबत मंत्रिमंडळात निर्णय अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तत्काळ करुन अहवाल सादर करावा

बागलाण तालुक्यातील बिजोटे, आखतवाडे, निताणे या गावामध्ये बिगरमोसमी पाऊस, वादळी वारा व गारपिटीमुळे बाधित झालेल्या पिकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून झालेल्या नुकसानाची माहिती घेतली. नुकसानाचे तातडीने पंचनामे करुन अहवाल तत्काळ शासनास सादर करण्याच्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना दिल्या. शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी असून मंत्रिमंडळात …

Read More »

राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना करून दिली आठवण, … ती व्यक्तीगत गोष्ट पण, कर्तव्य श्रेष्ठ एक 'नाथांच्या' राज्यात शेतकरी अनाथ

रामचंद्राच दर्शन घ्यायचं असेल तर खुशाल घ्या ती तुमची व्यक्तीगत बाब पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा चांगलाच चर्चेत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्येला जाऊन मुंबईत परतले आहेत. मात्र त्यांच्यावर महाविकास आघाडीकडून टीका होते आहे. राज्यात अवकाळी पाऊस झाला आहे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याला मदत करायची सोडून …

Read More »

संजय राऊत यांची टीका, …शक्ती प्रदर्शनासाठी अयोध्येला जायची गरज नाही ते तर…. गद्दारांना रस्त्यात पकडून मारलं पाहिजे हा बाळासाहेबांचा विचार

राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकारच्यावतीने पहिल्यांदाच अयोध्या दौरा करत तेथील रामाचे दर्शन घेत राम मंदिर उभारणीच्या कामाची पाहणी केली. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर चांगलाच निशाणा साधत अयोध्या दौऱ्यात रामाच्या दर्शनापेक्षा शक्ती प्रदर्शनाचा विषय जास्त होता अशी खोचक टीका करत आम्ही अनेकदा अयोध्येत जाऊन रामाचं दर्शन घेतलं. …

Read More »

अजित पवार यांची खोचक टीका,.. मुख्यमंत्र्यांची ही फालतूगिरी, अयोध्येतून मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर आमच्यावर निशाणा साधला म्हणजे आमच्या अंगाला भोकं पडत नाहीत

राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदाच अयोध्या दौऱ्यावर गेले. याआधी एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला होता. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर देताना म्हणाले की, आताच्या ताज्या प्रश्नांवरून लोकांना विचलित करण्याची मुख्यमंत्र्यांची ही फालतुगिरी आहे. आमच्यावर निशाणा साधला म्हणजे आमच्या अंगाला भोकं …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचा हल्लाबोल, त्यांना हिंदूत्वाची अॅलर्जी…आम्ही ८ महिन्यापूर्वी चुक दूरूस्त त्यामुळेच काहीजणांना परदेशात जाऊन देशाविरोधात वक्तव्ये करावे लागत आहेत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्या दौऱ्यासाठी काल शनिवारी रात्री लखनौ विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर आज ९ एप्रिल रोजी त्यांनी अयोध्येत रामलल्लांचं दर्शन घेतलं. तसेच या दर्शनानंतर त्यांनी माध्यमांशी बातचित केली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, काही लोकांना आमच्या या अयोध्या दौऱ्याची अ‍ॅलर्जी होती, अनेकांना या दौऱ्यामुळे त्रासही झाला. त्यांनी टीका केली. …

Read More »

शरद पवार यांची खोचक टीका,…मदत कशी करता येईल यावर आमची श्रध्दा सत्ताधाऱ्यांची श्रध्दा अयोध्येत

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या शिवसेनेला राजकिय सेटबॅक देण्याच्या उद्देशाने हिंदूत्वाचा नारा देत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांच्या गटाचे मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्तेही अयोध्येला गेले. या दौऱ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य केले आहे. ते नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधत …

Read More »