Breaking News

Tag Archives: chief minister

बाळासाहेब थोरातांची मागणी, कृषीमंत्र्यांचे विधान असंवेदनशील; मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी कांदा उत्पादक शेतकऱ्याला दिलेले अनुदान तुटपुंजे; किमान ५०० रुपये द्या

राज्यातील शेतकरी संकटात सापडलेला आहे. अवकाळी पावसाने शेतातील उभे पिक वाया गेले आहे. सोयबीन, कापूस, तूर, हरभरा, कांद्याला बाजारात भाव मिळत नाही. कांद्याला यावेळी ४००-५०० रुपये भाव मिळत असून हा भाव अत्यंत कमी आहे. सरकारने प्रति क्विंटल ३०० रुपये अनुदान जाहीर केले आहे, ते अत्यंत तुटपुंजे आहे. कांदा उत्पादनास येणाऱ्या …

Read More »

जयंत पाटील यांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला, काल पंतप्रधानच बदलले आता ते माझे गटनेता पदही धोक्यात… मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे गटनेते होऊ इच्छित आहेत असे वाटते...

विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे गटनेते आणि प्रतोद हे पद रिक्त असून या पदावर एकनाथ शिंदे यांची राष्ट्रवादीचे गटनेते आणि अनिकेत तटकरे यांची पक्ष प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली अशी माहिती देण्यात आली. ही माहिती अजूनही अधिकृत संकेतस्थळावर दाखवण्यात येत आहे ही गंभीर चूक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांना शेतकरी-कष्टकऱ्यांच्या मोर्चाची भीती? कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३०० रू.चे अनुदान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

शेत मालाला योग्य दर मिळत नाही, कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी पीक घेण्यासाठी केलेला खर्चही निघत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपला कांदा बाजारात विकण्याऐवजी रस्त्यावर टाकणे पसंद करत आहेत. त्यातच अवकाळी पावसामुळे आर्थिक आरीष्ट्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने अद्याप मदत जाहिर केली नसल्याच्या निषेधार्थ शेतकरी-कष्टकऱ्यांचे लाल वादळ विधान भवनाला घेराव घालण्यासाठी नाशिक मुंबईकडे …

Read More »

शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल करणाऱ्या कृषीमंत्री सत्तारांच्या विरोधातील आंदोलनाला मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा? अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याविरोधात महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक

शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल करणार्‍या कृषीमंत्र्यांचा धिक्कार असो… धिक्कार असो, धिक्कार असो कृषीमंत्र्यांचा धिक्कार असो… या कृषी मंत्र्यांचे करायचे काय खाली डोके वर पाय… निवडणूकीचा गाजर हलवा… महाराष्ट्राचे बजेट, गाजर हलवा…खोके सरकार हाय हाय… ५०० कोटीचा घोटाळा करणार्‍या आमदार राहुल कुलवर कारवाई झालीच पाहिजे…सट्टा लावतो म्हणणार्‍या मंत्र्यांचा धिक्कार असो… अशा गगनभेदी …

Read More »

भाग-१: मुख्यमंत्र्यांच्या शहरातील जिल्हा रूग्णालयात मोठा आर्थिक घोटाळा, आरोग्यमंत्री-पालकमंत्री गप्पच कॅग ऑडिटमध्ये ९० हजाराची मशिन ६ लाख ६१ हजारांना विकत घेतली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहर आणि जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा चांगलीच भ्रष्टाचाराने बरबटलेली दिसून येत आहे. विशेष म्हणजे या भ्रष्टाचाराबाबत स्वतः केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या कॅगने केलेल्या ऑडिटमध्ये उघडकीस आले आहे. मात्र याबाबतचा अहवाल उपसंचालक कार्यालय आणि आरोग्य मंत्री कार्यालयास पाठवून दिल्यानंतरही त्याबाबतची कोणतीही कारवाई आरोग्य मंत्री डॉ.तानाजी …

Read More »

राजन विचारेंनी आनंद दिघेंचा संदर्भ देत एकनाथ शिंदेंवर टीका, कर्तृत्व सिध्द करावं लागतं आणि… शाखा बळकाविल्यावरून साधला निशाणा

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गट हाच अधिकृत शिवसेना पक्ष असल्याचा निकाल दिला. ‘शिवसेना’ पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटाकडून शाखा ताब्यात घेण्यात येत आहेत. होळीच्या दिवशी ठाण्यात शिंदे गटाकडून शिवसेनेची शाखा ताब्यात घेण्यात आली होती. तेव्हा ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. यावरून ठाण्याचे खासदार राजन …

Read More »

गुलाबराव पाटील म्हणाले, मंत्री पदाचा सट्टा लावत,… मी ३३ नंबरला गेलो मी एकटाच राहिलो असतो मग विकास करू शकलो असतो का?

राज्यात उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार उलथवून टाकत शिवसेनेतील ४० आमदारांनी बंडखोरी करत भाजपाच्या मदतीने राज्यात शिंदे-भाजपा सरकार स्थापन केले. या घटनेला आता जवळपास ९ महिने पूर्ण होत आले आहेत. तरीही शिंदे गटाचे मंत्र्यांकडून आपले बंड कसे योग्य होते याचेच दाखले देत असून यापार्श्वभूमीवर जळगांवातील भोरखेडा येथील एका …

Read More »

शिंदे-फडणवीसांच्या अर्थसंकल्पाच्या निषेधार्थ मविआकडून “भ्रमाचा भोपळा” आंदोलन बजेट म्हणजे भ्रमाचा भोपळा; घोषणांनी विधान भवनाचा परिसर दणाणला

बजेटमध्ये मिळाला भोपळा… महाराष्ट्राला मिळाला भोपळा… बजेट म्हणजे भ्रमाचा भोपळा…बजेट म्हणजे रिकामा खोका… सर्वसामान्यांना मिळाला भोपळा… सत्तेत कामी आले खोके, सर्वसामान्यांना मात्र धोके… अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पाचा निषेध केला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा आठवा दिवस असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित …

Read More »

अर्थसंकल्पावर उध्दव ठाकरेंची खोचक टीका, गरजेल तो बरसेल काय यापेक्षा महाविकास आघाडीने मांडलेला अर्थसंकल्प चांगला

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पहिलाच अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पावर खोचक टीका करत गरजेल तो बरसेल काय अशी टीका करत महाविकास आघाडी सरकारने यापूर्वीचे दोन-तीन अर्थसंकल्प मांडले होते ते अभ्यासपूर्ण होते. आजचा अर्थसंकल्प म्हणजे गाजर का हलवा आहे …

Read More »

जयंत पाटील यांचा उपरोधिक टोला, पुन्हा अर्थसंकल्प मांडायचा नाही, हा एकमेवच… जे शक्य नाही अशा गोष्टींची कमिटमेंट या सरकारने राज्यातील जनतेला करून घोषणांचा पाऊस पाडला...

आजचा अर्थसंकल्प १६ हजार कोटी रुपयांच्या तुटीचा अर्थमंत्र्यांनी मांडला परंतु ज्या घोषणा केल्या त्या किमान लाखभर कोटीच्या असल्याने त्याची बेरीज केली तर ही तूट १६ हजार कोटीवरुन एक लाख कोटीवर देखील जाऊ शकते अशा स्वप्नाळू अर्थसंकल्पाचे दर्शन झाले अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी …

Read More »