Breaking News

शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल करणाऱ्या कृषीमंत्री सत्तारांच्या विरोधातील आंदोलनाला मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा? अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याविरोधात महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक

शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल करणार्‍या कृषीमंत्र्यांचा धिक्कार असो… धिक्कार असो, धिक्कार असो कृषीमंत्र्यांचा धिक्कार असो… या कृषी मंत्र्यांचे करायचे काय खाली डोके वर पाय… निवडणूकीचा गाजर हलवा… महाराष्ट्राचे बजेट, गाजर हलवा…खोके सरकार हाय हाय… ५०० कोटीचा घोटाळा करणार्‍या आमदार राहुल कुलवर कारवाई झालीच पाहिजे…सट्टा लावतो म्हणणार्‍या मंत्र्यांचा धिक्कार असो… अशा गगनभेदी घोषणांनी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा नववा दिवस असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत शिंदे सरकारच्या विरोधात आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

महाविकास आघाडीचे आमदार विधानभनाच्या पायऱ्यावर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ विधान भवनाच्या पायऱ्यावर आंदोलन करत घोषणाबाजी करत असताना तेवढ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तेथूनच विधानभवनात प्रवेश करत होते. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्याजवळ थांबून हास्यविनोद केल्याचे दिसून आले. त्यामुळे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधातील आंदोलनाला छुपा पाठिंबा तर दिला नाही ना अशी चर्चा विधानभवन परिसरात सुरु झाली.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *