Breaking News

Tag Archives: chief minister

नीती आयोगाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले,… त्यांच्या राज्याचं नुकसान मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या भूमिकेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सकारात्मक घेतले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील नीती आयोगाच्या शनिवारी २७ मे रोजी झालेल्या बैठकीला तब्बल १० मुख्यमंत्री गैरहजर राहिले. यापैकी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भूमिका जाहिर करत बैठकीवर बहिष्कार टाकला. आता नीती आयोगाच्या बैठकीनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या …

Read More »

के चंद्रशेखर राव यांची टीका, देशात आणिबाणीपेक्षा वाईट…. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या भेटीनंतर केली टीका

दिल्ली सरकारवर नियंत्रण आणण्याच्या अध्यादेशाविरोधात विरोधकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नेत्यांची भेटीगाठी घेत आहेत. शनिवारी २७ मे रोजी केजरीवाल यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव ( केसीआर ) यांची हैदराबाद येथे भेट घेतली. यावेळी के चंद्रशेखर राव यांनी केंद्र सरकारने काढलेल्या अध्यादेशाविरोधात अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा दर्शवला. यानंतर …

Read More »

नीती आयोगाच्या बैठकीला ‘या’ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी फिरवली पाठ भाजपातेर पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी ढूकंनही पाहिले नाही

मागील ९ वर्षात केंद्रात असलेल्या मोदी सरकारकडून सातत्याने राज्याच्या अधिकारावर गदा आणण्यात येत असल्याचा आरोप भाजपातेर पक्षांकडून सातत्याने करण्यात येत आहे. त्यातच तीन वर्षे दिल्लीमधील प्रशासकिय अधिकार कोणाकडे असावेत याप्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला. मात्र केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या नेमका विरूध्द अध्यादेश काढत दिल्लीतील प्रशासकिय अधिकार पुन्हा स्वतःकडेच …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही, राज्यातले युती सरकार हे शब्द पाळणारे… समृद्धीचा दुसरा टप्पा भरवीर ते शिर्डी ८० किमीच्या महामार्गाचे लोकार्पण

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पहिल्या ५२० किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर या महामार्गाच्या ८० किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण आज करण्यात आले. त्यामुळे आता ६०० किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग नागरिकांसाठी खुला झाला आहे. राज्यातील युती सरकार हे शब्द पाळणारे …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचे सूचक वक्तव्य, …और मुझे रास्ते बनाने का समृध्दी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील उद्घाटनानंतर केले वक्तव्य

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर या ८० किमी लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण शुक्रवारी २६ मे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिर्डीजवळील कोकमठाण येथे झालं. त्यानंतर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डी आणि कोपरगावातील शेतकऱ्यांचं आभार मानले. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्याचा विकास …

Read More »

गजानन किर्तीकर यांचा इशारा, …तर आमची कामं झाली पाहिजे…पण आम्हाला सापत्न वागणूक… १३ खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासबोत आलो

मागील वर्षी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १३ खासदारांनी शिवसेनेत बंडखोरी केली. त्यानंतर भाजपाबरोबर जात एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं. पण, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचं दिसत आहे. अशातच खासदार गजानन किर्तीकर यांनी केलेल्या …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या राजकीय निर्णयाच्या विरोधात मुंबईवर एकटवले मुंबईतील खुल्या जागा, खेळाचे मैदान आणि मनोरंजन मैदानाचे सद्याचे धोरण बदलण्याची हालचाल

मुंबईतील खुल्या जागा, खेळाचे मैदान आणि मनोरंजन मैदानाचे सद्याचे धोरण बदलण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्त यांस आदेश जारी केले असून त्याविरोधात बॉम्बे कॅथोलिक सभेने एका सभा माहिम येथील सेंट मायकल सभागृहात आयोजित करण्यात आले होते. खाजगी संस्थेस किंवा व्यक्तीस दत्तक देण्याऐवजी शासन आणि पालिकेने या जागेच्या परिरक्षण करण्यावर सर्व वक्त्यांनी भर …

Read More »

राज्य सरकारची नवी घोषणा, अडीच लाखात झोपडीधारकाला घर; शासन निर्णय वाचा गृहनिर्माण विभागाकडून शासननिर्णय जारी

सर्वोच्च न्यायालयाने अप्रत्यक्षरित्या शिंदे-फडणवीस सरकारवर अपात्रतेवर शिक्का मोर्तब केल्यानंतर राज्यात विधानसभा-लोकसभा निवडणूका घेण्याच्या चर्चेला सुरुवात झाली. तर दुसऱ्याबाजूला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकाही जाहिर करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. यापार्श्वभूमीवर काहीही करून मुंबई महापालिका ठाकरे गटाच्या ताब्यातून हिसकावून घ्यायचीच याचा चंग बांधलेल्या भाजपा-शिंदे गटाने आता मुंबईकरांसह राज्यातील झोपडीधारकांना खुष करण्यासाठी अडीच लाख …

Read More »

अजित पवार यांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र, …तातडीने कार्यक्रमांचे आयोजन करा ७५ कोटी रूपयांचा निधी मंजूर पण एकाही कार्यक्रमाला मंजूरी दिली नाही

नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आपण सर्वपक्षियांना सोबत घेत राज्य सरकार मोठा कार्यक्रम घेणार असून ते कार्यक्रम वर्षभर राबवू असे आश्वासन दिले. मात्र त्यास आता तीन महिन्याचा कालावधी उलटून गेला तरी अद्याप कोणतीच कृती राज्य सरकारने केली नसल्याने …

Read More »

आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध उपाययोजना शेतकऱ्यांना दर्जेदार बी - बियाणे, खते मिळण्यासाठी कृषी विभागाने दक्ष राहावे

राज्य शासन शेतकऱ्यांप्रती संवेदनशील आहे. आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करतानाच शेतकऱ्यांना दर्जेदार बी – बियाणे, खते मिळण्यासाठी कृषी विभागाने दक्ष राहावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आज सकाळी राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक २०२३ चे …

Read More »