Breaking News

बाबरी प्रकरणी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे म्हणाले, मी चंद्रकांत पाटील यांच्याशी बोललो त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सत्तेतील काही मंत्री काही दिवसांपूर्वी अयोध्येमध्ये जाऊन आले. त्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वबूमीवर भाजपा नेते आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाबरी पाडल्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून सत्ताधारी भाजपा-शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात खडाजंगी सुरू झाली आहे. यासंदर्भात शिवसेनेचे मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले मी चंद्रकांत पाटील यांच्याशी बोलेलो आहे.

बाबरी पाडली तेव्हा कुठे होता? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना केला आहे. भाजपा नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेनेचा बाबरी पाडण्याशी कोणताही संबंध नसल्याचा दावा केला होता. पाटलांच्या या दाव्यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन पाटलांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला.

संजय राऊत म्हणाले की, अयोध्या आणि त्यानंतरच्या प्रत्येक घडामोडीत हिंदुत्वाची मशाल पेटती राहावी यासाठी बाळासाहेबांनी केलेला संघर्ष आणि त्याग या देशाला माहिती आहे. त्याच त्यागातून आजचा भाजपा निर्माण झाला आहे. बाळासाहेब ठाकरे बाबरी कांडानंतर लखनौला सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर झाले आहेत. त्यातले ते प्रमुख आरोपी आहेत. हे भाजपाच्या नेत्यांना माहिती नाही का? ज्यांना (एकनाथ शिंदे) त्यांनी विकत घेतलंय, त्यांच्या तोंडाला कुलूप का लागलंय? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील याप्रकरणी पत्रकार परिषद घेणार आहेत.

तर एकनाथ शिंदे यांनी राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. शिंदे म्हणाले की, त्यांना (उद्धव ठाकरे आणि संजय राऊत ) बाबरी मशिदीच्या मुद्द्यावर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांनी त्यांचा नैतिक अधिकार गमावला आहे. तसेच बाबरी मस्जिद पाडली तेव्हा उध्दव ठाकरे कुठे होते? असा सवालही शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य ऐकल्यानंतर मी त्यांच्याशी चर्चा केली असल्याचंही शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Check Also

नाना पटोले यांचा विश्वास, मोदी सरकारची १० वर्षांची तानाशाही संपणार; पराभव अटळ

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच मतदारसंघात मतदान झाले असून मविआच्या कार्यकर्त्यांचा उत्साह व मतदारांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *