Breaking News

Tag Archives: cabinet expansion

सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, २८ आमदारांचा नव्याने समावेश

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत भाजपाने विजय मिळवित सत्ता कायम राखली. त्यानंतर मागील ७ वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या शिवराजसिंग चौहान यांच्याऐवजी राज्याची धुरा अर्थात मुख्यमंत्री पदी मोहन यादव यांची निवड केली. या साऱ्या घटनेला १२ दिवसही पूर्ण होत नाही तोच मध्य सरकारने आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करत २८ आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश केला. १२ …

Read More »

भरत गोगावले यांनी केले स्पष्ट, सूत्र सांगणार आणि आम्ही आशेवर…विचारतोच मुख्यमंत्र्यांना राज्य मंत्रिमंडळ विस्तारावरून भरत गोगावले यांनी भूमिका

राज्यात महाविकास आघाडी सरकार उलथवून टाकत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार येऊन एक वर्ष झालं, तरी अद्याप या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं सांगितलं जात आहे. परंतु त्याबद्दल अद्याप निश्चित माहिती कोणीही दिलेली नाही. त्याच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येत नसल्याच्या मुद्यावरून ठाकरे …

Read More »

अजित पवारांची टीका, मंत्रिमंडळात एकही महिला नाही हे पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैव राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ;सरकारने नराधमांवर जरब बसवावी...

महिलादिनी तरी राज्याच्या मंत्रिमंडळात महिला आमदारांना संधी मिळेल अशी अपेक्षा होती मात्र ती फोल ठरली. मंत्रिमंडळात एकही महिला प्रतिनिधी नसणे हे पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्देव आहे अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. दरम्यान राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली असल्याकडे सभागृहाचे लक्ष वेधत सरकारने अशा नराधमांवर …

Read More »

अजित पवार म्हणाले, काहीही जण सकाळी सकाळी टाकतात तर मी कामाला सुरुवात करतो पवारांचा रोख मनसे प्रमुख राज ठाकरेंकडे तर नाही ना चर्चेला सुरुवात

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज नेवासा येथील सभेत बोलताना राज्यातल्या शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. अजित पवार यांनी शिवसेनेचे बंडखोर आमदार, रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार, राज्यात न आलेले प्रकल्प आणि सुरू असलेल्या प्रकल्पांवरील स्थगितीवरून राज्य सरकारचा समाचार घेतला. राज्यात नवं सरकार स्थापन होऊन ६ महिने झाले तरी मंत्रिमंडळ विस्तार …

Read More »

शिंदे-फडणवीसांना बच्चू कडू यांचा खोचक टोला, अशीच शांततेनं झोप लागली पाहिजे राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावर लगावला टोला

राज्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात आल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा जोरदार कलगीतुरा रंगताना पहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांवर अनेक मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी, विशेषत: महाविकास आघाडीकडून हल्लाबोल करण्यात आला आहे. त्यातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार. सध्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा चालू आहे. मुख्यमंत्री आणि …

Read More »

आदित्य ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रासाठी काम करणं त्यांच्या मनात कधीच नव्हतं…

चोगले हायस्कूल, बोरीवली येथे महायुथ फाऊंडेशन यांच्या सहकार्याने आयोजित रोजगार मेळाव्याला आज युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे उपस्थित होते. तरुणांनी सकारात्मक आत्मविश्वास घेऊन प्रत्येक क्षेत्रात काम करावं, यश तुमच्याच हातात आहे. असं म्हणत तरुणांना प्रोत्साहन दिलं. यावेळी महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला चालले आहेत, बेरोजगारी वाढत चालली आहे. या प्रश्नांकडे लक्ष देण्याची …

Read More »

देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, उध्दव ठाकरेंना दिवाळी शुभेच्छा दिल्या नाहीत पण जरूर देऊ उध्दव ठाकरे यांच्याबरोबर युती करणार का? राजकारणात काहीही अशक्य नाही

अलीकडच्या काळात राज्याच्या राजकारणात कटूता वाढल्याचे फडणवीस यांनी यावेळी मान्य केले. मात्र राजकारणात कटूता असू नये, वैमनस्य असू नये, ती महाराष्ट्राची संस्कृती नाही. कटुता असेल तर ती सगळ्यांनीच हळूहळू कमी केली पाहिजे. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मी देखील करेन. पण एक चांगले आहे की सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांशी माझा अद्यापही …

Read More »

नवनियुक्त १८ मंत्र्यांचा अल्प परिचय माहित आहे का? मग वाचा भाजपा-शिवसेना मंत्र्यांचा माहिती थोडक्यात

शिंदेे-फडणवीस सरकारच्या आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात नवनियुक्त १८ जणांना मंत्री पदाची शपथ दिली. हे सर्व आमदार पूर्वी कधी मंत्री झाले होते. त्यांचा मतदारसंघ कोणता? त्याचे जन्मसाल, शिक्षण, त्यांनी केलेल्या कामाचा माहिती यासह त्या सर्वांचा अल्प परिचय खालील प्रमाणे :- विखे–पाटील, श्री. राधाकृष्ण एकनाथराव जन्म : 15 जून, 1959. जन्म …

Read More »

राज्य मंत्रिमंडळ विस्तारात भाजपा आणि शिंदे गटातील या संभावित चेहऱ्यांना मिळणार संधी आणि खाती भाजपामधून १५ तर शिंदे गटातून १० जणांचा समावेश राहणार

सर्वोच्च न्यायालयात एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांच्यात शिवसेनेचा वारससह कोण पात्र-अपात्र या मुद्यावरून न्यायालयीन लढाई सुरु आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या नुकत्याच झालेल्या दिल्ली दौऱ्यानंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची लगबग सुरु आहे. या मंत्रिमंडळात भाजपाकडून १५ तर शिंदे गटाकडून १० जणांची नावे अंतिम करण्यात आली …

Read More »

विस्तारीत मंत्रिमंडळाचा शपथविधी सकाळी ११ वाजता राजभवनात: २० ते २५ जणांचा समावेश? राज्यपाल भवन, राज शिष्टाचार विभाग इन रेडी पोझिशन

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्यासह ४० जणांनी बंडखोरी करत शिवसेनेवर दावा केला. तसेच उध्दव ठाकरे गटाने एकनाथ शिंदेंसह त्यांच्या समर्थक आमदारांच्या विरोधात दाखल केलेल्या अपात्रतेच्या विरोधात थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर पुन्हा उध्दव ठाकरे गटाकडूनही एकनाथ शिंदे यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आल्या. मात्र कायदेशीर बाबी सुरु असतानाही राज्य मंत्रिमंडळाचा …

Read More »