Breaking News

राज्य मंत्रिमंडळ विस्तारात भाजपा आणि शिंदे गटातील या संभावित चेहऱ्यांना मिळणार संधी आणि खाती भाजपामधून १५ तर शिंदे गटातून १० जणांचा समावेश राहणार

सर्वोच्च न्यायालयात एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांच्यात शिवसेनेचा वारससह कोण पात्र-अपात्र या मुद्यावरून न्यायालयीन लढाई सुरु आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या नुकत्याच झालेल्या दिल्ली दौऱ्यानंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची लगबग सुरु आहे. या मंत्रिमंडळात भाजपाकडून १५ तर शिंदे गटाकडून १० जणांची नावे अंतिम करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर या संभावित मंत्र्यांना खात्याचे वाटपही निश्चित करण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

राज्यात सत्तांतर होत महिला झाला तरी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार न करता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेच राज्याचा कारभार हाकत होते. त्यातच मंत्रिमंडळात मंत्रीच नसल्याने मंत्र्याचे काही अधिकार विभागाच्या प्रधान सचिवांना दिल्याची माहिती बाहेर आली. त्यामुळे राज्यात एकच खळबळ माजली.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर गेले. तेथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला परवानगी दिली. तसेच कोणती खाती शिंदे गटाकडे तर कोणती खाती भाजपाकडे राहणार यावरही शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे दिल्ली दौऱ्यावरून परत येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या दृष्टीने हालचालींना वेग दिला.

दरम्यान सर्वोच्च न्यायालयात असलेल्या याचिकेवर आज सोमवारी सुनावणी होणार होती. परंतु आजची सुनावणी १२ ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यामुळे न्यायालयीन लढाई सुरु असताना राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

संभावित नावे आणि खाते वाटप
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : नगरविकास, रस्ते विकास महामंडळ
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : गृह, वित्त
चंद्रकांत पाटील : महसूल, सहकार
गिरीश महाजन : वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा
आशिष शेलार : गृहनिर्माण
सुधीर मुनगंटीवार : ऊर्जा
संजय कुटे / चंद्रशेखर बावनकुळे : ओबीसी कल्याण
सुरेश खाडे : सामाजिक न्याय
अशोक ऊईके : आदिवासी विकास
माधुरी मिसाळ/ देवयानी फरांदे : महिला व बालविकास
राधाकृष्ण विखे पाटील : ग्रामविकास/कृषी
बबनराव लोणीकर : स्वच्छता व पाणीपुरवठा
योगेश सागर :
रवींद्र चव्हाण :
राणा जगजितसिंह पाटील :
प्रशांत ठाकूर :
नितेश राणे :
______

शिंदे गट
_____
दादा भुसे
गुलाबराव पाटील
संदीपान भुमरे
उदय सामंत
शंभूराज देसाई
बच्चू कडू
राजेंद्र पाटील यड्रावकर
अब्दुल सत्तार

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *