नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत भाजपाने विजय मिळवित सत्ता कायम राखली. त्यानंतर मागील ७ वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या शिवराजसिंग चौहान यांच्याऐवजी राज्याची धुरा अर्थात मुख्यमंत्री पदी मोहन यादव यांची निवड केली. या साऱ्या घटनेला १२ दिवसही पूर्ण होत नाही तोच मध्य सरकारने आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करत २८ आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश केला.
१२ दिवसापूर्वी मोहन यादव यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसेच दोन उपमुख्यमंत्री पदी जगदीश देवडा, राजेंद्र शुक्ला यांचीही उपमुख्यंत्री पदाची शपथ त्याचवेळी देण्यात आली. त्यानंतर आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात २८ आमदारांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये मध्य प्रदेशमधील भाजपाचे नेते प्रल्हाद सिंग पटेल, कैलाश विजयवर्गीय, राकेश सिंग यांचा समावेश मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.
मध्य प्रदेश सरकार के नव गठित मंत्री मंडल में सम्मिलित सभी मंत्रीगणों को हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं। pic.twitter.com/Au5pQvLP5l
— BJP Madhya Pradesh (@BJP4MP) December 25, 2023
राज्य मंत्रिमंडळात ६ जणांना स्वतंत्र राज्यमंत्री नियुक्ती करण्यात आली आहे. तर ४ जणांना राज्यमंत्री म्हणून राज्यपाल मंगुभाई पटेल पटेल यांनी शपथ दिली.
मध्य प्रदेशच्या या राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या शपथविधी सोहळ्यास भाजपाचे नेते अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
LIVE : मध्य प्रदेश मंत्रिमंडल शपथ ग्रहण समारोह।https://t.co/wTLHQA5ji2
— BJP Madhya Pradesh (@BJP4MP) December 25, 2023