Breaking News

नवनियुक्त १८ मंत्र्यांचा अल्प परिचय माहित आहे का? मग वाचा भाजपा-शिवसेना मंत्र्यांचा माहिती थोडक्यात

शिंदेे-फडणवीस सरकारच्या आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात नवनियुक्त १८ जणांना मंत्री पदाची शपथ दिली. हे सर्व आमदार पूर्वी कधी मंत्री झाले होते. त्यांचा मतदारसंघ कोणता? त्याचे जन्मसाल, शिक्षण, त्यांनी केलेल्या कामाचा माहिती यासह त्या सर्वांचा अल्प परिचय खालील प्रमाणे :-

विखेपाटील, श्री. राधाकृष्ण एकनाथराव

जन्म : 15 जून, 1959.
जन्म ठिकाण : श्रीरामपूर, जिल्हा-अहमदनगर.
शिक्षण : बी.एस्सी.(ॲग्री).
ज्ञात भाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी.
वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती शालिनीताई.
अपत्ये : एकूण 3 (एक मुलगा व दोन मुली).
व्यवसाय : शेती.
पक्ष : भारतीय जनता पक्ष.
मतदारसंघ : 218-शिर्डी, जिल्हा-अहमदनगर.
इतर माहिती : 1987-95 अध्यक्ष, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील सहकारी साखर कारखाना, लि., प्रवरानगर; संस्थापक-चेअरमन, प्रवरा फळे-भाजीपाला उत्पादक व प्रक्रिया खरेदी विक्री शेतकरी सहकारी संस्था, मर्या.प्रवरानगर, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर; 1995-2000 चेअरमन, दि.मुळा प्रवरा इले.को.ऑप.सोसायटी, लि., श्रीरामपूर; जून, 2002 ते ऑगस्ट, 2003 व्हाईस चेअरमन, सप्टेंबर, 2005 ते डिसेंबर, 2007 चेअरमन, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक; या काळात या बँकेद्वारे शेतकऱ्यांना 6 टक्के व्याज दराने कृषी कर्ज योजना राज्यात प्रथम सुरु केली; 2006 पासून संचालक, प्रवरा सहकारी बँक लि.लोणी, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर; संचालक, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, प्रवरानगर; सदस्य, कार्यकारी परिषद, पुणे विद्यापीठ; कार्यकारी अध्यक्ष, पद्मश्री डॉ. विखे पाटील फाऊंडेशन, विळदघाट, अहमदनगर; विश्वस्त, श्री साईबाबा संस्थान, शिर्डी ; प्रवरा ग्रामीण नैसर्गिक, सामाजिक, अध्ययन संस्था, प्रवरानगर, प्रवरा रुरल मेडिकल ट्रस्ट, लोणी बु; दि.6 ते 10 नोव्हेंबर, 1998 मुंबई येथे “ॲग्रो ॲडव्हॉन्टेज”चे शासनाच्या वतीने आयोजन करुन राज्यातील सुमारे 5 लाख शेतकऱ्यांना शेतीविषयक प्रदर्शन भरवून आधुनिक शेतीबाबतची माहिती दिली; 8 फेब्रुवारी, 2008 भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते थोर अर्थतज्ज्ञ डॉ. धनंजयराव गाडगीळ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ टपाल तिकीटाचे विमोचन व अर्ध पुतळ्याचे अनावरण करुन प्रवरानगरमध्ये भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले; 19 जून, 2008 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत प्रवरानगर येथे भव्य महिला मेळाव्याचे आयोजन व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या “जनजागरण विकास यात्रा”, कार्यक्रमाचा शुभारंभ शिर्डी विधानसभा मतदारसंघापासून सुरु केला; एस.एस.सी.परीक्षेत दोन विषयात नापास विद्यार्थ्यांसाठी एटीकेटी योजना लागू केली; राज्यातील कायम विनाअनुदानित माध्यमिक शाळा मधील “कायम” शब्द वगळून सर्व शाळांना अनुदानित करण्याचा निर्णय घेतला; वेदांत फाऊंडेशन व महाराष्ट्र शिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण संगणकाच्या माध्यमातून द्यावयाच्या उपक्रमाची सुरुवात केली; शालेय शिक्षण विभागाची वेबसाईट सुरु केली; इंग्रजी व इतर माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्याचा निर्णय घेतला; शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ केली; मुंबईत अकरावी प्रवेश ऑनलाईन पद्धतीने सुरु केला; ऊर्दू शिक्षणासाठी स्वतंत्र संचालनालयाची स्थापना केली; राज्यातील सर्व शाळांचे मूल्यांकन व प्रमाणिकरण करण्यासंदर्भात तसेच शाळांच्या गुणात्मक वाढीसाठी कोअर ग्रुप व सल्लागार समितीचे गठण; राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाच्या कामकाजात सूत्रता आणून शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी विविध उपक्रम व महत्त्वपूर्ण निर्णय घेवून त्याची कार्यक्षमपणे अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न शिक्षणमंत्री म्हणून केला; 1995-1999, 1999-2004, 2004-2009, 2009-2014, 2014-2019 सदस्य, महाराष्ट्र विधानसभा; मे, 1998 ते फेब्रुवारी, 1999 कृषी व जलसंधारण खात्याचे मंत्री; फेब्रुवारी, 1999 ते ऑक्टोबर, 1999 कृषी, जलसंधारण, दुग्धविकास आणि पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय खात्याचे मंत्री, डिसेंबर, 2008 ते ऑक्टोबर, 2009 पर्यंत शालेय शिक्षण, विधी व न्याय खात्याचे मंत्री व औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री; नोव्हेंबर, 2009 ते नोव्हेंबर, 2010 परिवहन, बंदरे, विधी व न्याय खात्याचे मंत्री; नोव्हेंबर, 2010 ते सप्टेंबर, 2014 कृषी व पणन खात्याचे मंत्री व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री; ऑक्टोबर, 2014 ते जून, 2019 विरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र विधानसभा; 2019 पासून भारतीय जनता पक्षाचे कार्य, जून, 2019 ते नोव्हेंबर, 2019 गृहनिर्माण खात्याचे मंत्री; ऑक्टोबर, 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड. दि. 9 ऑगस्ट 2022 रोजी मंत्रीपदाची शपथ.

(संदर्भ-14 वी महाराष्ट्र विधानसभा सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय)

 

मुनगंटीवार, श्री. सुधीर सच्चिदानंद

जन्म : 30 जुलै, 1962.
जन्म ठिकाण : चंद्रपूर.
शिक्षण : एम.कॉम., एलएल.बी., बी.जे., डी.बी.एम., एम.फिल.
ज्ञात भाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी.
वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती सपना.
अपत्ये : एकूण 1 (एक मुलगी).
व्यवसाय : शेती.
पक्ष : भारतीय जनता पक्ष.
मतदारसंघ : 72-बल्लारपूर, जिल्हा-चंद्रपूर.
इतर माहिती : अध्यक्ष, डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय; अध्यक्ष, राष्ट्रचेतना लोक-कल्याणकारी संस्था; 1989 बेरोजगारांच्या हक्कासाठी मोर्चांचे आयोजन; 1994 बेरोजगारांसाठी युवाधिकार परिषदेचे आयोजन; 1993 स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी व शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मोर्चाचे आयोजन; नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व अमरावती विद्यापीठाला संत गाडगेबाबा यांचे नाव द्यावे यासाठी विशेष प्रयत्न. विधानसभेच्या माध्यमातून केलेल्या संसदीय संघर्षाला यश प्राप्त; शासनाकडे सभागृहाच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे 1999 मध्ये बल्लारपूर तालुक्याची निर्मिती; उपेक्षित मातंग समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग आयोग; 1 जानेवारी, 1998 रोजी राज्यात स्वतंत्र खनिज विकास मंत्रालय सुरु करण्यात यश; गडचिरोली जिल्ह्यातील श्रीक्षेत्र मार्कण्डेश्वर मंदिर परिसराचा शासन निधी प्राप्त करुन विकास केला; चंद्रपूर, गडचिरोली या दोन जिल्ह्यांसाठी स्वतंत्र गोंडवाना विद्यापीठ निर्मितीसाठीच्या लढ्याचे नेतृत्व; जुलै, 2010 च्या अधिवेशनात याबाबत कार्यवाही पूर्ण; शासकीय विविध योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी यासाठी ‘आधार अपंगांचा’, ‘आधारगाथा’ व ‘प्रकाश वंचितांसाठी’ या पुस्तकांचे प्रकाशन व मोफत वाटप; आरोग्य तपासणी, नेत्र चिकित्सा शिबिरांचे आयोजन; 1999 मध्ये चंद्रपूर शहरात मोफत सार्वजनिक वृत्तपत्र वाचनालय उपक्रम सुरु केले; 1979 व 1981 सह सचिव व अध्यक्ष, छात्रसंघ सरदार पटेल महाविद्यालय; 1979 सचिव, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, चंद्रपूर; 1980 सचिव, चंद्रपूर शहर भारतीय जनता पक्ष; 1987 अध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चा; 1993 उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता युवा मोर्चा; 1996 सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष; 2002 उपाध्यक्ष, अखिल भारतीय युवा मोर्चा; एप्रिल, 2010-2013 प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष; 1995-1999, 1999-2004, 2004-2009, 2009-2014, 2014-2019 सदस्य, महाराष्ट्र विधानसभा; फेब्रुवारी, 1999 ते ऑक्टोबर, 1999 राज्याच्या पर्यटन व ग्राहक संरक्षण खात्याचे मंत्री; चंद्रपूर जिल्ह्यातील झाडीपट्टी विभागाचे सांस्कृतिक वैभव संपूर्ण राज्याला माहिती व्हावे यासाठी मे, 1999 मध्ये चंद्रपूर झाडीपट्टी पर्यटन महोत्सवाचे आयोजन; संपूर्ण चंद्रपुर जिल्हा दारु बंदी करण्यात यश; राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे विधानसभेतील सन 1998 चा ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कार प्राप्त; 2009-2012 विधीमंडळ भारतीय जनता पक्षाचे प्रतोद; 31 ऑक्टोबर, 2014 ते नोव्हेंबर, 2019 वित्त व नियोजन आणि वने खात्याचे मंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री; ऑक्टोबर, 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड; सन 2020 पासून समिती प्रमुख, लोकलेखा समिती. दि. 9 ऑगस्ट 2022 रोजी मंत्रीपदाची शपथ.

(संदर्भ-14 वी महाराष्ट्र विधानसभा सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय)

 

पाटील, श्री. चंद्रकांत (दादा) बच्चू 

जन्म : 10 जून, 1959.
जन्म ठिकाण : मुंबई.
शिक्षण : बी.कॉम.
ज्ञात भाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी.
वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती अंजली.
व्यवसाय : टेलिकॉम मार्केटिंग.
पक्ष : भारतीय जनता पक्ष.
मतदारसंघ : 210-कोथरुड, जिल्हा पुणे.
इतर माहिती : सन 1977-1980 विद्यार्थी कार्यकर्ता; 1980-1993 पूर्णवेळ कार्यकर्ता व 1990-1993 राष्ट्रीय सरचिटणीस, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद; सचिव, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, मुंबई; 1995-99 सहकार्यवाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, कोल्हापूर विभाग; 2004-2007 चिटणीस व दक्षिण महाराष्ट्र विभाग प्रमुख, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष; 2007-2010 प्रदेश सरचिटणीस, 2010-2015 प्रदेश उपाध्यक्ष, जुलै, 2019 पासून प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष; सन 2008-2014, 2014-2019 सदस्य, महाराष्ट्र विधान परिषद, ऑक्टोबर, 2014 ते ऑक्टोबर, 2019 महसूल व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) खात्याचे मंत्री; 2014-2019 विधान परिषदेचे सभागृह नेते; ऑक्टोबर, 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर निवङ दि. 9 ऑगस्ट 2022 रोजी मंत्रीपदाची शपथ.

(संदर्भ-14 वी महाराष्ट्र विधानसभा सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय)

 

    गावित, डॉ. विजयकुमार कृष्णराव


जन्म
: 15 ऑगस्ट, 1955.
जन्म ठिकाण : लोभाणी, तालुका-तळोदा, जिल्हा-नंदुरबार.
शिक्षण : एम,बी.बी.एस., एम.डी.(मेडिसीन).
ज्ञात भाषा : मराठी, हिंदी, इंग्रजी, भिल व अहिराणी.
वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती कुमुदिनी.
अपत्ये : एकूण 2 (दोन मुली).
व्यवसाय : वैद्यकीय व शेती.
पक्ष : भारतीय जनता पक्ष.
मतदारसंघ : 3 – नंदुरबार (अनुसूचित जमाती), जिल्हा -नंदुरबार.
इतर माहिती : 1993 पासून अध्यक्ष, देवमोगरा शिक्षण संस्था, नटावट; गरीब विद्यार्थ्यांना मदत; आरोग्यविषयी जागृती शिबीराचे आयोजन; मराठवाडा विद्यापीठाच्या पुरुष व महिला संघाचे प्रशिक्षक; अखिल भारतीय कबड्डी व बॉस्केटबॉल संघाच्या निवड समितीवर कार्य ; विविध खेळांच्या आंतरविद्यापीठ संघाचे प्रतिनिधीत्व; 1988 अध्यक्ष, आदिवासी क्रीडा मंडळ, नटावट; मराठवाडा विद्यापीठ ऑफिसर्स कमिटी व वैद्यकीय शिक्षक निवड समितीचे सदस्य; नंदुरबार जिल्हा निर्मितीसाठी विशेष प्रयत्न; सामाजिक संस्थामार्फत व आदिवासी विकास प्रकल्पांमार्फत आदिवासींच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नरत; नंदुरबार जिल्हा क्रीडा संकुल निर्माण करुन खेळाडूंना प्रोत्साहन दिले; 1985 सल्लागार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय विद्यार्थी संघटना; सल्लागार, आदिवासी विकास संघटना; 1985 उपाध्यक्ष, मागासवर्गीय डॉक्टर संघटना, औरंगाबाद; 1999-2014 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्य ; मार्च, 2014 पासून भारतीय जनता पक्षाचे कार्य ; १९९५-१९९९, १९९९-२००४, २००४-२००९, २००९-२०१४, २०१४-२०१९ सदस्य, महाराष्ट्र विधानसभा; मार्च , १९९७ ते जुलै, १९९९ सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये आणि कुटुंब कल्याण खात्याचे राज्यमंत्री ; मार्च , २००१ ते जुलै, २००२ सामान्य प्रशासन, समाजकल्याण, दारुबंदी प्रचारकार्य खात्याचे राज्यमंत्री ; जुलै, २००२ ते जुलै, २००४ सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क व व्यसनमुक्ती कार्य खात्याचे राज्यमंत्री ; जुलै, २००४ ते ऑक्टोबर, २००४ सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क, आदिवासी विकास, सामाजिक न्याय, भटक्या विमुक्त जाती व इतर मागासवर्ग कल्याण व राजशिष्टाचार यासह (ऑगस्ट, २००४ पासून व्यसनमुक्त कार्य ) खात्याचे राज्यमंत्री ; नोव्हेंबर, २००४ ते ऑक्टोबर २००९ आदिवासी विकास खात्याचे मंत्री ; नोव्हेंबर, २००९ ते १९ मार्च , २०१४ वैद्यकीय शिक्षण, फलोत्पादन व पर्यटन (२००९-२०११) खात्याचे मंत्री ; ऑक्टोबर, २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड. दि. 9 ऑगस्ट 2022 रोजी मंत्रीपदाची शपथ.

(संदर्भ-14 वी महाराष्ट्र विधानसभा सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय)

 

                        महाजन, श्री. गिरीष दत्तात्रय

: 17 मे, 1960
जन्म ठिकाण : जामनेर, जिल्हा-जळगांव.
शिक्षण : बी.कॉम.
ज्ञात भाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी.
वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती साधना.
अपत्ये : एकूण 2 (दोन मुली).
व्यवसाय : शेती व सामाजिक कार्य.
पक्ष : भारतीय जनता पक्ष.
मतदारसंघ : 19-जामनेर, जिल्हा-जळगाव.
इतर माहिती : सदस्य, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी; संचालक, इंदिराबाई ललवाणी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, जामनेरपुरा; अध्यक्ष, छत्रपती व्यायामशाळा, जामनेर; अध्यक्ष, पंडित दिनदयाळ संस्था; उपाध्यक्ष, शिक्षण प्रसारक मंडळ; अध्यक्ष, लोकहितवादी मंडळ; अध्यक्ष, वीर सावरकर क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, जामनेर; अध्यक्ष, दत्तगुरु शिक्षण बहुउद्देशीय संस्था; चेअरमन, महालक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था, जामनेर; संचालक, श्रीकृष्ण दूध उत्पादक सहकारी संस्था; संचालक, तापी पूर्णा शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज, लि. जळगाव; कार्याध्यक्ष, गोविंद महाराज संस्थान, जामनेर; जिल्हाध्यक्ष, व्हॉलीबॉल व बॅडमिंटन असोसिएशन; अध्यक्ष, जिल्हा शूटींग बॉल असोसिएशन; अध्यक्ष, सिद्धगड मंदिर देवस्थान, रामपुर जिल्हा जामनेर; अध्यक्ष, सोनेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट, जामनेर; विद्यार्थ्याना शालोपयोगी वस्तुंचे वाटप; विविध क्रीडा व वादविवाद स्पर्धांचे आयोजन; नेत्रचिकित्सा व रक्तदान शिबिरांचे आयोजन; लातूर व गुजरात भुकंपग्रस्तांना मदत कार्य; 1992-95 सरपंच, ग्रामपंचायत, जामनेर; कायम निमंत्रित सदस्य, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष; 1990-92 उपाध्यक्ष, जामनेर तालुका कार्यकारणी, भारतीय जनता पक्ष; 1993-95 सदस्य, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष; 1995-1999, 1999-2004; 2004-2009, 2009-2014, 2014-2019 सदस्य, महाराष्ट्र विधानसभा; डिसेंबर, 2014 ते नोव्हेंबर, 2019 जलसंपदा खात्याचे मंत्री, नाशिक व नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री; ऑक्टोबर, 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड; दि. 9 ऑगस्ट 2022 रोजी मंत्रीपदाची शपथ.

(संदर्भ-14 वी महाराष्ट्र विधानसभा सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय)

 

                     पाटील, श्री. गुलाबराव रघुनाथ

                  जन्म : 5 जून,1967
जन्म ठिकाण : बोरखेडा, तालुका-धरणगाव जिल्हा-जळगाव.
शिक्षण : एच.एस.सी.
ज्ञात भाषा : मराठी, हिंदी इंग्रजी व मारवाडी.
वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती मायाबाई.
अपत्ये : एकूण 3 (दोन मुलगे व एक मुलगी)
व्यवसाय : शेती व व्यापार
पक्ष : शिवसेना
मतदारसंघ : 14- जळगाव-ग्रामीण, जिल्हा-जळगाव.
इतर माहिती : सन २००८ पासून संस्थापक-अध्यक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय माध्यमिक विद्यालय, पाळधी; सन २०१२ पासून अध्यक्ष, पद्मालय शिक्षण प्रसारक मंडळ, म्हसावद; गरीब व अपंग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि उन्नतीसाठी विविध मदत कार्य; रक्तदान शिबिरांचे आयोजन; सामाजिक अन्यायाविरुध्दच्या जनआंदोलनात सक्रिय सहभाग; १९९२-९७ सदस्य व १९९७-९८ सभापती, पंचायत समिती, एरंडोल; १९९७-९९ सदस्य व सभापती, कृषी समिती, जिल्हा परिषद, जळगाव; १९९२-९७ संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, धरणगाव, १९९६-९९ सदस्य, म्हाडा, नाशिक विभाग; १९८४-८९ शिवसेना पक्षाचे शाखाप्रमुख, उप तालुका प्रमुख व १९९६ जिल्हा प्रमुख; २००३ उपनेता म्हणून कार्य; शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ म्हणून विशेष ओळख; १९९९-२००४, २००४-२००९, २०१४-२०१९ सदस्य, महाराष्ट्र विधानसभा, विधानमंडळाच्या पंचायत राज, रोजगार हमी, अंदाज समिती व आश्वासन समितीचे सदस्य, जुलै, २०१६ ते नोव्हेंबर, २०१९ सहकार खात्याचे राज्यमंत्री; परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री; ऑक्टोबर, २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड, जानेवारी, २०२० ते जून २०२२ पाणी पुरवठा व स्वच्छता खात्याचे मंत्री. दि. 9 ऑगस्ट 2022 रोजी मंत्रीपदाची शपथ.

(संदर्भ -14 वी महाराष्ट्र विधानसभा सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय)

 

     भुसे, श्री. दादाजी दगडु

जन्म : 6 मार्च 1964.
जन्म ठिकाण : मालेगांव, जिल्हा-नाशिक.
शिक्षण : डी.सी.ई.
ज्ञात भाषा : मराठी, हिंदी, इंग्रजी.
वैवाहिक माहिती : विवाहित,पत्नी श्रीमती अनिता.
अपत्ये : एकूण 2(दोन मुलगे)
व्यवसाय : शेती व बांधकाम.
पक्ष : शिवसेना.
मतदारसंघ : 115- मालेगांव-बाह्य जिल्हा- नाशिक.
इतर माहिती : शिवसेना तालुका प्रमुख, मालेगाव; पक्षाच्या सर्व उपक्रमांत सक्रीय सहभाग; जागर शिवशाहीच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांना शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली; संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन अनुदान योजना व श्रावण बाळ योजनेचे अनुदान लाभार्थींना मिळवून दिले; रस्ते, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा यासारखी सामाजिक कामे केली; महिला बचतगटाच्या माध्यमातून महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या; शासकीय पडिक जागा व गावठाणातील सरकारी जमीन 15000 लाभार्थींना मिळवून दिली; वन हक्क समितीच्या माध्यमातून वन जमिनी नियमित केल्या; दारिद्रय रेषेखालील व्यक्तिंना मदत; मालेगाव येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय सुरु करण्यासाठी प्रयत्न; आमआदमी विमा योजना, स्वर्णजयंती ग्रामीण रोजगार योजना राबविली. लोकसहभागातून ए.पी.जे. अब्दुल कलाम बंधारा तयार केला; गरीबांना अल्प किंमतीत घरे मिळवून दिली; भारतनिर्माण व राष्ट्रीय पेय जल अंतर्गत पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली; सामुहिक विवाहांचे आयोजन, गोरगरीब रुग्णांना मदत, रक्तदान शिबीरांचे आयोजन; आरोग्य तपासणी शिबीरांचे आयोजन; रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली; शालोपयोगी वस्तुंचे वाटप; संगणक प्रशिक्षण केंद्र सुरु केले; जिमखाना सुरु केला; व्यसनमुक्ती व स्वच्छता अभियान राबविले; जागर शिवशाहीचा कार्यक्रमाच्या माध्यमातून जातीचे दाखले मिळवून दिले; 2004-2009, 2009-2014, 2014-2019 सदस्य, महाराष्ट्र विधानसभा 5 डिसेंबर 2014 ते नोव्हेंबर 2019 सहकार खात्याचे राज्यमंत्री व धुळे जिल्ह्याचे पालक मंत्री; ऑक्टोबर 2019 मध्ये महाराष्ट्र विधान सभेवर फेरनिवड, जानेवारी 2020 ते जून 2022 दरम्यान महाराष्ट्र राज्याचे कृषी व माजी सैनिकांचे कल्याण खात्याचे मंत्री. दि. 9 ऑगस्ट 2022 रोजी मंत्रीपदाची शपथ.

(संदर्भ -14 वी महाराष्ट्र विधानसभा सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय)

 

                       राठोड, श्री संजय दुलीचंद

जन्म : 30 जून 1971.
जन्म ठिकाण : यवतमाळ.
शिक्षण : बी.कॉम., बी.पी.एड.
ज्ञात भाषा : मराठी, हिंदी, इंग्रजी व बंजारा.
वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती शितल.
अपत्ये : एकूण 2 (एक मुलगा व एक मुलगी)
व्यवसाय : शेती.
पक्ष : शिवसेना.
मतदारसंघ : 79-दिग्रस, जिल्हा-यवतमाळ.
इतर माहिती : सचिव, छत्रपती शिवाजी कला, शिक्षण, क्रीडा, कृषी व ग्रामीण विकास प्रतिष्ठान, शिवपुरी, तालुका कळंब, जिल्हा यवतमाळ; आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप; आदिवासींसाठी नृत्य व लोकनृत्य स्पर्धांचे आयोजन; २००३-२००४ प्लास्टिक मुक्ती अभियानाचे आयोजन; २००२-२००४ मच्छरमुक्ती अभियानांचे आयोजन; कुपोषित बालकांना दूध पावडर व बिस्किटांचे वितरण; आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत; रुग्णांना सर्वोतोपरी मदत; सहकाराच्या माध्यमातून जनतेच्या विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न; ग्रामविकास सहकारी संस्था, आदिवासी सहकारी संस्था, विविध कार्यकारी संस्था, जिनिंग प्रेसिंग सहकारी संस्था, तालुका देखरेख सहकारी संस्था, खरेदी-विक्री सहकारी संस्था, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यात सक्रिय सहभाग; १९९१ पासून शिवसेनेचे कार्य; १९९७ जिल्हा प्रमुख, शिवसेना यवतमाळ जिल्हा; शिवसेनेच्या सर्व आंदोलनात सक्रिय सहभाग; विदर्भस्तरीय आदिवासी परिषद, बंजारा समाज मेळावा व सरपंच परिषदेचे आयोजन; निराधारांना अनुदानासाठी तसेच पाणी प्रश्न व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी धरणे तसेच अन्याय अत्याचार विरोधी आंदोलनात सक्रीय सहभाग; २००४-२००९, २००९-२०१४, २०१४-२०१९ सदस्य, महाराष्ट्र विधानसभा; सदस्य, पंचायत राज समिती, सदस्य, उपविधान समिती ५ डिसेंबर २०१४ ते नोव्हेंबर २०१९ महसूल खात्याचे राज्यमंत्री; ऑक्टोबर २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड; जानेवारी २०१९ ते २८ फेब्रुवारी २०२१ वने व भुकंप पुनर्वसन खात्याचे मंत्री. दि. 9 ऑगस्ट 2022 रोजी मंत्रीपदाची शपथ.

(संदर्भ -14 वी महाराष्ट्र विधानसभा सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय)

 

खाडे, डॉ. सुरेश (भाऊ) दगडू

 

: 1 जून, 1958.
जन्म ठिकाण : पेड, तालुका-तासगाव, जिल्हा-सांगली.
शिक्षण : अभियांत्रिकी (वेल्डिंग) डिप्लोमा (सिल्व्हर मेडल प्राप्त), डी.लिट. (श्रीलंकेतील आंतरराष्ट्रीय कोलंबो युनिव्हर्सिटीने उत्कृष्ट समाजसेवेबद्दल पदवी प्रदान केली.)
ज्ञात भाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी.
वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती सुमन.
अपत्ये : एकूण- 2 (दोन मुलगे).
व्यवसाय : शेती व उद्योग.
पक्ष : भारतीय जनता पक्ष.
मतदारसंघ : 281- मिरज (अनुसूचित जाती), जिल्हा-सांगली.
इतर माहिती : संस्थापक-अध्यक्ष, दास बहुउद्देशीय शिक्षण संस्था, या संस्थेमार्फत मिरज येथे आमदार सुरेश (भाऊ) खाडे इंग्लिश मेडियम स्कुल सुरु केले; आय.ए.एस. व आय.पी.एस.च्या विद्यार्थ्यांना पुस्तके व आर्थिक मदत; अनेक शैक्षणिक संस्थांना संगणक संच दिले; गरीब होतकरु विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप; जत साखर कारखान्याच्या माध्यमातून दुष्काळात चारा छावणी सुरु केली; अनेक गावात स्वखर्चाने बोअरवेल बसविल्या; टँकरने पाणीपुरवठा केला; जत तालुक्यातील इंदिरा आवास योजनेंतर्गत अपूर्ण घरांसाठी स्वखर्चाने साहित्य पुरविले; शहिद जवानांच्या कुटुंबियांना अर्थसहाय्याद्वारे वैयक्तिक मदत केली; 2010-2013 सांगली जिल्हा अध्यक्ष (ग्रामीण), 2013-2015 महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष; पुर परिस्थितीत पुरग्रस्तांना तसेच गरीब व निराधार महिलांना संसारोपयोगी साहित्य दिले; जळीतग्रस्तांना मदत; नैसर्गिक आपदग्रस्तांना मदत; दीन, दलित अपंगांना तसेच गरीब रुग्णांना औषधोपचारासाठी मदत; संचालक, राजे विजयसिंह डफळे सहकारी साखर कारखाना लि. जत; संस्थापक-अध्यक्ष, सुरेश (भाऊ) खाडे वाहतूक सहकारी संस्था जत, जिल्हा सांगली; संस्थापक-अध्यक्ष, जत तालुका रहिवाशी संघ मुंबई; संस्थापक-चेअरमन, सुरेश (भाऊ) खाडे नागरी सहकारी पत संस्था मर्या, मुंबई; 1999-2003 जतच्या दुष्काळी भागाला म्हैसाळ योजनेच्या सहाव्या टप्प्याचे कृष्णा नदीचे पाणी मिळावे यासाठी अनेक वेळा धरणे, मोर्चे व आंदोलने केली; भूमीसंपादनाबद्दल शेतकऱ्यांना भरपाई मिळवून दिली; रस्त्यांचा बॅकलॉग भरुन काढला; जत तालुक्याचे विभाजन करुन नवीन उमदी तालुका करावा यासाठीच्या आंदोलनाचे नेतृत्व; आश्रमशाळा विकासासाठी प्रयत्न; जत येथे जागतिक बँकेच्या सहाय्याने उप जिल्हा रुग्णालय व्हावे यासाठी प्रयत्न; जत तालुक्यातील अनेक शैक्षणिक संस्थांना व व्यायामशाळांना आर्थिक मदत; मुकबधिर विद्यालयास मदत; ग्लुकोज मका प्रक्रिया सहकारी उद्योग उभारणीसाठी प्रयत्न; मिरज तालुक्याच्या दुष्काळी भागाला म्हैसाळ योजनेचे पाणी मिळावे यासाठी प्रयत्न; मिरज तालुक्यात अनेक ठिकाणी समाजमंदिरे बांधली; अनेक मंदिरांच्या बांधकामासाठी मदत; बेळंकी येथील सिद्धेश्वर मंदिरात अन्नछत्र बांधून दिले; तालुक्यात अनेक गावात बुद्धमंदिरे उभी केली. मिरज तालुक्यातील रस्त्यांचा अनुशेष भरुन काढला, बेळंकी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीसाठी 15 कोटी निधी मंजुरीसाठी विशेष प्रयत्न; अनेक गावांच्या विकासासाठी भरीव निधी मिळवुन दिला; मिरज तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष योगदान; 2004-2009, 2009-2014, 2014-2019 सदस्य, महाराष्ट्र विधानसभा; सदस्य, अंदाज समिती, पंचायतराज समिती, अनुसूचित जाती कल्याण समिती व उपविधान समिती; 2015 ते 2019 अनुसूचित जाती कल्याण समितीचे समिती प्रमुख; जून, 2019 ते ऑक्टोबर, 2019 सामाजिक न्याय व मदत सहाय्य खात्याचे मंत्री; ऑक्टोबर, 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड. दि. 9 ऑगस्ट 2022 रोजी मंत्रीपदाची शपथ.

(संदर्भ-14 वी महाराष्ट्र विधानसभा सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय)

 

भुमरे, श्री. संदिपानराव आसाराम

जन्म : 13 जुलै 1963
जन्म ठिकाण : पाचोड बु., तालुका- पैठण, जिल्हा-औरंगाबाद.
शिक्षण : एस.एस.सी.
ज्ञात भाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी.
वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती पुष्पा.
अपत्ये : एकूण 3 (एक मुलगा व दोन मुली)
व्यवसाय : शेती.
पक्ष : शिवसेना.
मतदारसंघ : 110- पैठण, जिल्हा-औरंगाबाद
इतर माहिती : साक्षरता अभियान कार्यक्रमात सहभाग; ग्रामीण भागात प्राथमिक शाळा सुरु केली; हुंडाविरोधी चळवळ राबविली, सामूहिक विवाहांचे आयोजन; ग्रामीण भागातील कलाकारांना प्रोत्साहन; नाट्य स्पर्धा, कबड्डी, क्रिकेट, व्हॉलीबॉल स्पर्धांचे आयोजन; लेझिम पथक व व्यायाम शाळा सुरु केल्या; १९८९ शिवसेना शाखा प्रमुख व सर्कल प्रमुख, पाचोड; १९८९-९४ सदस्य, ग्रामपंचायत, पाचोड; १९९२-९४ उपसभापती, पंचायत समिती, पैठण; संचालक, औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक; १९९३-२०१४ संचालक, संत एकनाथ सहकारी साखर कारखाना लि; पैठण; १९९५- १९९९, १९९९-२००४, २००४-२००९, २०१४-२०१९ सदस्य, महाराष्ट्र विधानसभा; ऑक्टोबर २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड, जानेवारी २०२० ते जून २०२२ रोजगार हमी व फलोत्पादन खात्याचे मंत्री. दि. 9 ऑगस्ट 2022 रोजी मंत्रीपदाची शपथ.

(संदर्भ -14 वी महाराष्ट्र विधानसभा सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय)

 

                    सामंत, श्री उदय रविंद्र

जन्म : 26 डिसेंबर,1975
जन्म ठिकाण : गोवा
शिक्षण : डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग.
ज्ञात भाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी.
वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती जया.
अपत्ये : एकूण 2 ( दोन मुली)
व्यवसाय : शेती व व्यापार.
पक्ष : शिवसेना.
मतदारसंघ : 266- रत्नागिरी, जिल्हा- रत्नागिरी.
इतर माहिती : अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन; अध्यक्ष, श्री साई अनिरुद्ध एज्युकेशन सोसायटी या संस्थे मार्फत इंग्रजी माध्यमाची शाळा, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व महाविद्यालय सुरु केले; अध्यक्ष, पाली पंचक्रोशी विविध कार्यकारी सोसायटी; अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा कला व सांस्कृतिक कलाकार संघटना, रत्नागिरी;उपाध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा ऑटो चालक, मालक संघटना, रत्नागिरी; संस्थापक, शांतादुर्गा नागरी सहकारी पतसंस्था, रत्नागिरी, २०००-२००३ अध्यक्ष, रणजित ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था, पाली;अध्यक्ष, लोकमान्य ग्राहक सहकारी संस्था, पाली; संस्थापक सदस्य, अभिनव स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था; संस्थापक, ज्ञानज्योती सार्वजनिक ग्रंथालय, पाली; मुख्य प्रवर्तक, नियोजित रत्नागिरी स्वयंरोजगार सेवा संस्था फेडरेशन; सल्लागार, सह्याद्री स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था; संस्थापक, श्री लक्ष्मी पल्लिनाथ ग्राहक सहकारी संस्था; अध्यक्ष, नियोजित रत्नागिरी तालुका अपंग पुनर्वसन सेवा संस्था मर्यादित; १९९६-१९९९ अध्यक्ष, युवा मंच, पाली;  २००२-२००३ अध्यक्ष, रणजित ग्रामीण सहकारी पतसंस्था, पाली; २००० मध्ये खादी ग्रामोद्योग शिबीराचे रत्नागिरी येथे आयोजन,चाटे क्लासेस विरोधी मोर्चात सहभाग; जयहिंद सामाजिक संस्था स्थापन करून या संस्थेमार्फत रक्तदान शिबीर कार्यक्रमाचे आयोजन,         जिल्हास्तरीय जाखडी स्पर्धेचे आयोजन, गरीब रुग्णांना मदत, स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचे आयोजन, गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तुंचे वाटप, गरीब व गरजूंना संसारोपयोगी वस्तुंचे वाटप; वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन; आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवाचे आयोजन, स्वातंत्र्यसैनिक व गुणवंत विद्यार्थी यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन: रत्नागिरी जिल्ह्यात ८० गावात युवक जोडो कार्यक्रमाचे आयोजन; श्रमदानातून खानू, जोयशीवाडी, पाथरट, पावस, तोणदे व कशेळी या गावात बंधारे बांधले; नाचणे गावाच्या नळपाणी योजनेसाठी जीवन प्राधिकार कार्यालयावर मोर्चा काढला; पूर्णगड येथील वादळग्रस्तांना मदत, जिल्हास्तरीय मॅरॉथॉन स्पर्धेचे आयोजन; कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न, कोतवडा हायस्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनांचे आयोजन; दाभिळवाडी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी प्रयत्नः न्यु इंग्लिश हायस्कूल, पाली, माध्यमिक विद्यामंदिर नाणीज, अ. आ. देसाई हायस्कूल हातखंबा, न्यु इंग्लिश स्कूल टेंभे, आदर्श विद्यामंदिर कुरतडे, महालक्ष्मी माध्यमिक विद्यामंदिर खेडशी व जागुष्टे माध्यमिक हायस्कूल कुवारबांव या शाळांना संगणक सॉफ्टवेअर मिळवून दिले; रत्नागिरीत विविध ठिकाणी क्रिकेट स्पर्धांचे आयोजन; सदस्य, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नियामक मंडळ, मुंबई; अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, रत्नागिरी शाखा; बालमहोत्सव, नाट्यस्पर्धा, एकांकिका स्पर्धा व रंगसंमेलनाचे आयोजन; २००३-२००४ चा महाराष्ट्र पत्रकार संघाचा ‘कोकण रत्न’ पुरस्कार व २००४-२००५ चा रमजान मुबारक तर्फे ‘युवा रत्न’ पुरस्कार प्राप्त; सन २००७ चा दि प्राईड ऑफ इंडिया चा भास्कर अॅवार्ड, सन २०१३ मध्ये कोकण मराठी साहित्य परिषदेचा साहित्य मित्र सन्मान पुरस्कार प्राप्त; १९९६-१९९९ एन.एस.यु. आय. च्या कार्यात सक्रिय सहभाग, फेब्रुवारी १९९५ ते मे १९९९ उपाध्यक्ष, जिल्हा युवक काँग्रेस; अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस; १९९९-२००१ निरीक्षक, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस: १९९९-२००० चिटणीस, जुलै, २०१० ते २०१२ अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस; ऑक्टोबर, २०१४ पासून शिवसेना पक्षाचे कार्य, २००४-२००९, २००९-२०१४, २०१४-२०१९ सदस्य, महाराष्ट्र विधानसभा, ११ जून, २०१३ ते सप्टेंबर, २०१४ नगरविकास वने, विधी व न्याय, बंदरे व मत्स्यव्यवसाय खात्याचे राज्यमंत्री, विधिमंडळाच्या रोजगार हमी व पंचायत राज समितीचे सदस्य; ऑक्टोबर, २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड; जानेवारी, २०२० ते जून २०२२ उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे मंत्री. दि. 9 ऑगस्ट 2022 रोजी मंत्रीपदाची शपथ.

(संदर्भ -14 वी महाराष्ट्र विधानसभा सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय)

 

                            सावंत, डॉ. तानाजी जयवंत

: 1 जून, 1964
जन्म ठिकाण : मु.पो.वाकाव, तालुका माढा, जिल्हा सोलापूर
शिक्षण : डी.ई.ई., बी.ई (इलेक्ट्रॉनिक्स), पी. जी. डी.एम.,पी.एचडी.
ज्ञात भाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी.
वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती शुभांगी.
अपत्ये : एकूण 2 (दोन मुलगे)
व्यवसाय : व्यापार.
पक्ष : शिवसेना.
मतदारसंघ : 243- परांडा, जिल्हा उस्मानाबाद.
इतर माहिती : संस्थापक -अध्यक्ष, जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ, पुणे; अध्यक्ष, द. शेतकरी शिक्षण मंडळ, पुणे; अध्यक्ष श्री. भगवंत एज्युकेशन अँड रिसर्च चॅरिटेबल ट्रस्ट, बार्शी, जिल्हा सोलापूर, अध्यक्ष भैरवनाथ शुगर वर्क्स, लि; उस्मानाबाद, सदस्य, महाराष्ट्र राज्य ऊस दर नियंत्रण समिती. शैक्षणिक संस्था स्थापन करून विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सोय केली; प्रतिवर्षी सामुहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन; पुरग्रस्तांना मदत; दुष्काळी भागात पाच हजार पाण्याच्या टाक्यांचे वाटप; दुष्काळी भागात एक हजार टन चारा वाटप; बाळासाहेब ठाकरे शिवजल क्रांती योजनेतून १४८ कि.मी. नदी, नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण केले; कोविडच्या काळात भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियंत्रिकी महाविद्यालय बार्शी येथे एक हजार खाटाचे जंम्बो कोविड सेंटरची उभारणी करून हजारो रूग्णांच्या उपचाराची सोय केली; सन २०१६ पासून शिवसेनेचे उप नेते; शिवसेना संपर्क प्रमुख, उस्मानाबाद व सोलापूर जिल्हा; डिसेंबर, २०१६ ते ऑक्टोबर, २०१९ सदस्य, महाराष्ट्र विधान परिषद; सदस्य, पंचायत राज समिती विनंती अर्ज समिती व आमदार निवास आहार व्यवस्था समिती; माहे जून, २०१९ ते ऑक्टोबर २०१९ जलसंधारण खात्याचे मंत्री; ऑक्टोबर, २०१९ मध्ये महाराष्ट्र विधान सभेवर निवड. दि. 9 ऑगस्ट 2022 रोजी मंत्रीपदाची शपथ.

 

(संदर्भ -14 वी महाराष्ट्र विधानसभा सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय)

चव्हाण, श्री. रविंद्र दत्तात्रय

जन्म : 20 सप्टेंबर, 1970.
जन्म ठिकाण : मुंबई.
शिक्षण : एस.वाय.बी.ए.
ज्ञात भाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी.
वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती सुहासी.
अपत्ये : एकूण 2 (दोन मुली).
व्यवसाय : बांधकाम.
पक्ष : भारतीय जनता पक्ष.
मतदारसंघ : 143-डोंबिवली, जिल्हा-ठाणे.
इतर माहिती : 2005 नगरसेवक, 2006 सदस्य व 2007 सभापती, स्थायी समिती, कल्याण-डोंबिवली महागरपालिका; 2005 अध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा, कल्याण; संस्थापक, डोंबिवली रिक्षा चालक-मालक संघटना, या संस्थेद्वारे 3600 रिक्षा चालकांची विमा पॉलिसी काढली; बी.एस.यु.पी. या प्रकल्पांतर्गत 8250 गरीब झोपडपट्टीधारकांना मोफत घरे योजना राबविली; शहरात एम.एम.आर.डी.ए.च्या माध्यमातून अनेक योजना कार्यक्षमपणे राबवून जनतेला लाभ मिळवून दिला; कामगार, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांच्या हितासाठी विविध योजना राबविल्या; गरीब विद्यार्थ्यांसाठी मोठी पुस्तक पेढी व शालोपयोगी वस्तुंचे वाटप; खेळाडुंना प्रोत्साहन, डोंबिवली परिसरातील अनेक गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मंडळांना सर्वतोपरी सहकार्य; कल्याण महानगरपालिकेत घरेलू कामगार संघटनेची स्थापना करुन त्यांचे न्याय हक्कासाठी लढा दिला; संस्थापक, कल्याण म.न.पा.भारतीय जनता मनपा जनरल कामगार युनियन; डोंबिवली एक सांस्कृतिक परिवार मासिकचे संपादक; आपुलकी हेल्पलाईन सुरु करुन अनेक स्त्रीयांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न; “नवउद्घोष” साप्ताहिकाचे संपादक म्हणून कार्य केले; ज्येष्ठ नागरिकांसाठी रुग्णवाहिका, रक्तदान व आरोग्य शिबिरांचे आयोजन; टेबल टेनिस, बुद्धीबळ व कबड्डी स्पर्धांचे आयोजन; डोंबिवलीच्या सर्वांगिण विकासासाठी सतत प्रयत्नरत; 2009-2014, 2014-2019 सदस्य, महाराष्ट्र विधानसभा; 8 जुलै, 2016 ते 9 नोव्हेंबर, 2019 बंदरे, माहिती तंत्रज्ञान, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, वैद्यकीय शिक्षण खात्याचे राज्यमंत्री; ऑक्टोबर, 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवङ दि. 9 ऑगस्ट 2022 रोजी मंत्रीपदाची शपथ.

(संदर्भ-14 वी महाराष्ट्र विधानसभा सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय)

 

   सत्तार, श्री. अब्दुल नबी

 जन्म : 1 जानेवारी, 1965.
जन्म ठिकाण : सिल्लोड, जिल्हा – औरंगाबाद.
शिक्षण : बी.ए.
ज्ञात भाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी
वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती नफीजा बेगम.
अपत्ये : एकूण 7 (दोन मुलगे व पाच मुली)
व्यवसाय : व्यापार.
पक्ष : शिवसेना.
मतदारसंघ : 104-सिल्लोड, जिल्हा- औरंगाबाद
इतर माहिती : अध्यक्ष, नॅशनल एज्युकेशन संस्था; अध्यक्ष, प्रगती शिक्षण संस्था; अध्यक्ष, प्रियदर्शनी क्रीडा मंडळ, सिल्लोड; सार्वजनिक गणेशोत्सव कार्यक्रमांचे आयोजन; रक्तदान शिबीरांचे आयोजन, आदिवासी व दलित समाजातील सामुहिक विवाहांचे आयोजन; किल्लारी, जिल्हा लातूर येथील व गुजरात राज्यातील भूज येथील भूकंपग्रस्तांना मदत कार्य; मोहाडी पूरग्रस्तांना मदत; १९८४ ते १९९० सदस्य, ग्रामपंचायत, सिल्लोड; ५ मार्च, १९९४ ते ९ जानेवारी, १९९६, २९ ऑगस्ट, १९९८ ते ४ मार्च, १९९९ व १५ फेब्रुवारी, २००० ते ६ सप्टेंबर, २००१, अध्यक्ष, नगरपरिषद, सिल्लोड; चेअरमन, विविध कार्य सेवा सोसायटी, सिल्लोड; संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, सिल्लोड; संचालक, म्हसोबा महाराज तेलबिया उत्पादक सहकारी संस्था संचालक, दूध उत्पादक सहकारी संस्था, सिल्लोड; संचालक, औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक; २००१-२००६ सदस्य, महाराष्ट्र विधानपरिषद २००९-२०१४, २०१४-२०१९ सदस्य, महाराष्ट्र विधानसभा, २ नोव्हेंबर, २००९ ते डिसेंबर, २०१० अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे राज्यमंत्री, २ जून, २०१४ ते ऑक्टोबर, २०१४ पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय खात्याचे मंत्री, मे, २०१९ पासून शिवसेना पक्षाचे कार्य, ऑक्टोबर, २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड, जानेवारी, २०२० ते जून २०२२ महसूल, ग्रामविकास, बंदरे, खारजमिनी विकास व विशेष सहाय्य खात्याचे राज्य मंत्री. दि. 9 ऑगस्ट 2022 रोजी मंत्रीपदाची शपथ.

(संदर्भ -14 वी महाराष्ट्र विधानसभा सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय)

 

केसरकर,  श्री. दिपक वसंतराव

जन्म : 18 जुलै,1955
जन्म ठिकाण : सावंतवाडी, जिल्हा- सिंधुदुर्ग.
शिक्षण : बी कॉम, डिप्लोमा इन एक्सपोर्ट मॅनेजमेंट.
ज्ञात भाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी
वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती पल्लवी.
अपत्ये : एकूण 1 (एक मुलगी)
व्यवसाय : बांधकाम व्यावसायिक व शेती.
पक्ष : शिवसेना.
मतदारसंघ : 270- सावंतवाडी, जिल्हा – सिंधुदुर्ग.
इतर माहिती :  कार्यकारी सदस्य, जवाहर नवोदय विद्यालय, सांगेली (भारत सरकार उपक्रम); उपाध्यक्ष, शिवाजी शिक्षण संस्था, सावंतवाडी; सदस्य, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय परिषद; अध्यक्ष, जिल्हा साक्षरता अभियान, सिंधुदुर्ग; गरीब, गरजू विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप, तसेच दरमहा शिष्यवृत्ती योजना सुरु केली; सुसज्ज ग्रंथालय व समाज मंदिरांची निर्मिती केली; सतत ५ वर्षे भव्य सांस्कृतिक व पर्यटन महोत्सवाचे आयोजन; क्रीडा संकुलाची निर्मिती केली; महिलांसाठी बांबू प्रशिक्षण केंद्र, फळ प्रक्रिया केंद्र सुरु केले, बेरोजगारांसाठी हॉटेल मॅनेजमेंट प्रशिक्षण केंद्र सुरु केले; विविध कला व वस्तुसंग्रहालयाची निर्मिती केली; रक्तदान, योग शिबीर, आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन, गरीब जनतेला योग्य भावात स्वस्त धान्य वितरण कार्यक्रम राबविला; आयुर्वेदातील पंचकर्मावर आधारित रोजगार निर्मिती प्रकल्प तरुणांसाठी कार्यान्वित केला; भजनी मंडळांना सर्वतोपरी सहकार्य, मच्छिमार, आपदग्रस्त, छोटे उद्योजक, झोपडपट्टीवासीय, छोटे व्यापारी, शेतकरी व पुरग्रस्तांना मदत; अध्यक्ष, बाळासाहेब सावंत नागरी सहकारी पतसंस्था; उपाध्यक्ष, आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना; संचालक, सावंतवाडी अर्बन को-ऑप बँक; अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा खादी ग्रामोद्योग मंडळ; संचालक, इंडियन प्लायवूड रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (भारत सरकार) बेंगलोर, संचालक, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ; अध्यक्ष, रोटरी क्लब, सावंतवाडी, चेअरमन, रोटरी चॅरिटेबल ट्रस्ट; संस्थापक सदस्य, नॅशनल असोशिएशन फॉर ब्लाईंड (Nab); जिल्हा समादेशक, भारत स्काऊट आणि गाईड संस्था, सिंधुदुर्ग; काँग्रेस पक्षाचे 10 वर्षे तालुकाध्यक्ष; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 9 वर्षे जिल्हाध्यक्ष4 वर्षे प्रदेश कार्यकारणी सदस्य. सप्टेंबर, 2014 पासून शिवसेनेचे कार्य, 15 वर्षे सदस्य आणि 8 वर्षे नगराध्यक्ष, नगरपरिषद, सावंतवाडी; शहरातील जनतेच्या विकासासाठी अनेक योजना कार्यान्वित केल्या; 5 वर्षे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य नगरपरिषद महासंघ, मुंबई. 2009-2014, 2014-2019 सदस्य, महाराष्ट्र विधानसभा; 5 डिसेंबर, 2014 ते 8 जुलै, 2016 वित्त व ग्रामविकास खात्याचे राज्य मंत्री. 8 जुलै, 2016 ते 9ऑक्टोबर, 2019 वित्त, नियोजन व गृह (ग्रामीण) खात्याचे राज्यमंत्री. ऑक्टोबर, 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड, 2020 पासून समिती प्रमुख, विशेष हक्क समिती, विधानसभा. दि. 9 ऑगस्ट 2022 रोजी मंत्रीपदाची शपथ.

(संदर्भ -14 वी महाराष्ट्र विधानसभा सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय)

          सावे, श्री. अतुल मोरेश्वर

जन्म : 26 फेब्रुवारी, 1962.
जन्म ठिकाण : नांदेड.
शिक्षण : बी.कॉम.
ज्ञात भाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी.
वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती अंजली.
अपत्ये : एकूण- 2 (दोन मुलगे).
व्यवसाय : उद्योग.
पक्ष : भारतीय जनता पक्ष.
मतदारसंघ : 109-औरंगाबाद पूर्व, जिल्हा-औरंगाबाद.
इतर माहिती : सदस्य, मुकूलहार शिक्षण संस्था, औरंगाबाद; उपाध्यक्ष, श्री. भद्रामारुती देवस्थान ट्रस्ट, खुलताबाद, जिल्हा औरंगाबाद; 1996-1999 सदस्य, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, मुंबई; 1998-2003 औरंगाबाद शहर अध्यक्ष, 2003-2009 महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य व 2009-2015 चिटणीस, भारतीय जनता पक्ष; 2005 ते 2014 या काळातील एल जी इलेक्ट्रॉनिक्स कंपनी “बेस्ट व्हेंडर” ॲवार्डने सन्मानित; 2010-2011 आय.के.ई.ए., “बेस्ट इनोव्हेशन” ॲवार्ड. 2012 दैनिक भास्करचा “बिझनेस मॅन ऑफ द इअर” ॲवार्ड व 2014 चा स्पेशल ॲवार्ड फॉर एक्सपोर्ट तसेच “इपेक इंडिया स्टार परफॉर्मर इन डोमॅस्टिक होम प्रॉडेक्टस” पुरस्काराने सन्मानित; 2014-2019 सदस्य, महाराष्ट्र विधान सभा; 16 जून, 2019 ते 9 ऑक्टोबर, 2019 उद्योग, खनिकर्म, अल्पसंख्यांक विकास व वक्फ खात्याचे राज्यमंत्री; ऑक्टोबर 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड. दि. 9 ऑगस्ट 2022 रोजी मंत्रीपदाची शपथ.

(संदर्भ-14 वी महाराष्ट्र विधानसभा सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय)

 

              देसाई, श्री. शंभूराज शिवाजीराव

जन्म : 17 नोव्हेंबर, 1966.
जन्म ठिकाण : मुंबई.
शिक्षण : एस.वाय.बी.कॉम.
ज्ञात भाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी.
वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती स्मितादेवी.
 अपत्ये : एकूण 2 (एक मुलगा व एक मुलगी)
व्यवसाय : शेती.
पक्ष : शिवसेना.
मतदारसंघ : 261- पाटण, जिल्हा-सातारा.
इतर माहिती : अध्यक्ष, लोकनेते बाळासाहेब देसाई फाऊंडेशन, दौलतनगर; मार्गदर्शक, बाळासाहेब देसाई शिक्षण समुह, दौलतनगर; प्रमुख विश्वस्त, दौलत औद्योगिक प्रशिक्षण संस्था; सल्लागार, मोरणा शिक्षण संस्था मर्या., दौलतनगर; मरळी, तालुका-पाटण या संस्थेतर्फे पॉलिटेनिक कॉलेज, ज्युनिअर व सिनिअर कॉलेज, इंग्लिश मेडिअम स्कूल सुरु केले; आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन; वृक्षारोपण कार्यक्रमांचे आयोजन; ग्रामीण डोंगराळ भागात वैद्यकीय सेवा कार्य; वयाच्या १९ व्या वर्षी सन १९८६ पासून संचालक व १९८६-९६ चेअरमन, १९९६-२०१४ मार्गदर्शक-संचालक, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना लि. दौलतनगर, मरळी, तालुका-पाटण, जिल्हा-सातारा; सहकार क्षेत्रात १९ व्या वर्षी अशिया खंडातील सर्वात कमी वयाचे चेअरमन म्हणून निवड; २००० संस्थापक, शिवदौलत सहकारी बँक, मल्हारपेठ; सदस्य, नॅशनल फेडरेशन ऑफ शुगर फॅक्टरी, नवी दिल्ली; २००२-२००४ केंद्रीय प्रतिनिधी, बँक ऑफ महाराष्ट्र; संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ; १९९७-९९ सदस्य, महाराष्ट्र राज्य सहकार परिषद, मुंबई; १९९७ पासून पाटण तालुक्यात व सातारा जिल्ह्यात शिवसेनेचे संघटनात्मक कार्य; १९९२-९७ सदस्य, पंचायत समिती, पाटण; १९९२-२००२ सदस्य, जिल्हा परिषद, सातारा; २००४-२००९, २०१४-२०१९ सदस्य, महाराष्ट्र विधानसभा; शिवसेना पक्षाचे विधिमंडळ पक्ष प्रतोद; विधिमंडळ लोकलेखा समितीचे सदस्य; विशाखापट्टणम येथील १७ व्या अखिल भारतीय प्रतोद परिषदेत प्रतिनिधीत्व केले; सदस्य, ग्रंथालय समिती, राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे सन २००७-२००८ चा “उत्कृष्ट संसदपटू” पुरस्कार भारताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते देवून गौरविण्यात आले; ऑक्टोबर, २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड, जानेवारी, २०१९ ते जून २०२२ गृह (ग्रामीण), वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता आणि पणन खात्याचे राज्यमंत्री. दि. 9 ऑगस्ट 2022 रोजी मंत्रीपदाची शपथ.

(संदर्भ -14 वी महाराष्ट्र विधानसभा सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय

 

लोढा, श्री. मंगलप्रभात गुमानमल

जन्म : 18 डिसेंबर, 1955.
जन्म ठिकाण : जोधपूर (राजस्थान).
शिक्षण : बी.कॉम., एलएल.बी., सी.ए.(इंटर).
ज्ञात भाषा : मराठी, हिंदी, इंग्रजी व गुजराती.
वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती मंजुला.
अपत्ये : एकूण 2 (दोन मुलगे).
व्यवसाय : उद्योग व व्यापार.
पक्ष : भारतीय जनता पक्ष.
मतदारसंघ : 185-मलबार हिल, जिल्हा-मुंबई शहर.
इतर माहिती : सरचिटणीस, विद्यार्थी संघटना जोधपूर विद्यापीठ; 1973-1975 जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील नवनिर्माण चळवळीमध्ये विद्यार्थ्यांचे नेतृत्व; स्वयंसेवक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ; आणीबाणीत स्थानबद्ध; अध्यक्ष, दक्षिण मुंबई कारसेवा समिती; रामजन्मभूमी चळवळीचे नेतृत्व; 1990-1992 मध्ये चलो अयोध्या चळवळीत सहभाग; व्ही.टी. रेल्वे स्थानकाचे नामांतर व अंजूमन इस्माममध्ये बहुसंख्याक समाजासाठी आरक्षण मिळावे यासाठी मोर्चाचे आयोजन; सचिव, सिटीझन्स ऑर्गनायझेशन फॉर पब्लिक ओपिनियन; उपाध्यक्ष, (दोन वेळा), मुंबई भाजप; जून 2019 पासून अध्यक्ष, मुंबई शहर, भारतीय जनता पक्ष; अध्यक्ष, जैन कुशल मंडळ; अध्यक्ष, महावीर इंटरनॅशनल, मुंबई; सदस्य, लायन्स क्लब, मलबार हिल; ताडदेव परिसर विकासात सहभाग; नगरसेवक, मुंबई महानगरपालिका; पूरग्रस्तांसाठी मदत कार्य; गुटखा विरोधी आंदोलन व जनजागरण मोहिम सुरु केली; मलबार हिल ऑलिंपिक्सद्वारा विविध स्पर्धांचे आयोजन; सामूहिक दीपोत्सव, गणेशोत्सव व विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन; हळदीघाट, जालियनवाला बाग, झाशी यासारख्या धार्मिक, ऐतिहासिक स्थळांचे पावित्र्य रहावे यासाठी विविध प्रयत्न; बेरोजगारीची समस्या सोडविण्यासाठी मोफत सेवायोजन विभागाची निर्मिती; 9 ऑगस्ट 1997 रोजी क्रांतीदिनी भारत जोडोसाठी मानवी साखळीचे आयोजन; सामूहिक गोविंदा, आरोग्य तपासणी, रक्तगट तपासणी शिबिर, ज्येष्ठ नागरिक सहल, गरजू विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्यांचे वाटप, विद्यार्थ्यांकडून माफक शैक्षणिक शुल्क घेण्यात यावे यासाठी प्रयत्न; दिवाळी सणानिमित्त ना नफा ना तोटा तत्त्वावर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन; 1997 महाराष्ट्रात प्रथमच माहितीचा अधिकार हे अशासकीय विधेयक आणले व या विषयावर योग्य चर्चा घडविली. सन 2005 मध्ये महाराष्ट्र शासनाने माहितीचा अधिकार कायदा पास केला, केंद्र शासनाने तो स्वीकारला; 1995-1999, 1999-2004, 2004-2009, 2009-2014, 2014-2019 सदस्य, महाराष्ट्र विधानसभा; ऑक्टोबर, 2019 मध्ये विधानसभेवर फेरनिवड. दि. 9 ऑगस्ट 2022 रोजी मंत्रीपदाची शपथ.

(संदर्भ-14 वी महाराष्ट्र विधानसभा सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय)

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी बदलली स्ट्रॅटेजी

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीवरून मराठा समाजाचे कार्यकर्त्ये मनोज जरांगे पाटील यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *