Breaking News

Tag Archives: महसूल मंत्री

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णयः वाळू-रेतीची विक्री ना नफा ना तोटा तत्वावर करणार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

अनधिकृत उत्खनन व वाहतुकीस आळा घालण्याच्या उद्देशाने शासनामार्फत ऑनलाईन पद्धतीने ग्राहकांना वाळू व रेती पुरविण्याबाबत सर्वंकष सुधारित रेती धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. ना नफा ना तोटा तत्त्वावर वाळू विक्री दर निश्चित करण्यात येणार आहे. वाळू गटातून वाळूचे उत्खनन, उत्खननानंतर वाळूची …

Read More »

शासकीय व गावठाण जमिनीवरील कातकरी व्यक्तींची अतिक्रमणे नियमानुकूल होणार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची माहिती

शासकीय व गावठाण जमिनीवर कातकरी व्यक्तींनी घरठाणाबाबतची केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे ठाण्यातील कातकरी कुटुंबांना दिलासा मिळणार असून कातकरी समाजाच्या हितासाठी राज्य शासन कटीबद्ध असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले. ठाणे जिल्ह्यात गावठाण जमिनीवरील कातकरी समाजाच्या घरठाणाबाबतची १ हजार ४३३ अतिक्रमणे, शासकीय जमिनीवरील …

Read More »

गोदावरी खोऱ्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी वळविणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

गोदावरी खोऱ्याला कायमचे दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्यातील पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. शिर्डी विमानतळाजवळील काकडी येथे ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात शासकीय योजनांच्या लाभांचे लाभार्थ्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरण …

Read More »

नारळी पौर्णिमा दिन आता “शेतकरी दिन” पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील

यावर्षी ३० ऑगस्ट, २०२३ रोजी म्हणजेच नारळी पोर्णिमा दिनी राज्यात “शेतकरी दिन” साजरा करण्यास येणार आहे. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचे स्मरणार्थ २९ ऑगस्ट हा दिवस “शेतकरी दिन” म्हणून साजरा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. दरवर्षी हा दिवस मराठी तिथीप्रमाणे शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव …

Read More »

महसूल सप्ताहात हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबियांचे, माजी सैनिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

महसूल विभागाशी संबंधित सामान्य नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करण्याच्या उद्देशाने १ ऑगस्ट या महसूल दिनापासून ‘महसूल सप्ताह ‘ साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहात हुतात्मा सैनिकांचे तसेच माजी सैनिकांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे प्रश्न सोडविण्यासाठी ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ हा उपक्रम राबवला जात आहे, अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी …

Read More »

सोलापूर जिल्ह्यातील पात्र चारा छावण्यांची प्रलंबित देयके अदा करण्यासाठी लवकरच कार्यवाही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

सोलापूर जिल्ह्यात सन २०१९-२० मध्ये चारा छावण्या उघडण्यात आल्या होत्या. यातील एप्रिल ते ऑक्टोबर २०१९ या कालावधीतील प्रलंबित देयके अदा करण्यासाठी सुधारित प्रस्ताव मुख्य सचिव यांना प्राप्त झाला आहे. अहवाल शासनास सादर झाल्यानंतर पात्र चारा छावणींची देयके अदा करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत पुढील कार्यवाही लवकरच करण्यात येईल, असे महसूल …

Read More »

आदिवासी बांधवांना त्यांच्या जमिनीची पूर्ण मालकी देण्यासाठी सरकार पुढाकार घेणार का? काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांची सभागृहात विचारणा

मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली यूपीए सरकारने कायदा करून आदिवासी बांधवांना त्यांच्या जमिनी दिल्या. आदिवासी बांधव त्यांच्या हक्काच्या जमिनीवर अतिक्रमित म्हणून राहात होते, तो ऐतिहासिक अन्याय यूपीए सरकारने दूर केला. मात्र त्या कायद्याप्रमाणे अनेक ठिकाणी अंमलबजावणी होताना दिसत नाही, शिवाय आदिवासी बांधवांचे नाव इतर हक्कात येते, त्यामुळे त्यांना शेती कर्ज घेण्यात …

Read More »

महसूल सप्ताहानिमित्त नागरिकांना योजनांचा लाभ आणि माहिती द्या महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे प्रशासनाचे आवाहन

महसूल विभाग हा शासनाच्या पाठीचा कणा आहे. यंदा प्रथमच राज्यात १ ऑगस्टपासून महसूल सप्ताहाचे आयोजन राज्यभरात केले जाणार आहे. तरी, शासनाच्या कामकाजाप्रती नागरिकांचा विश्वास वृद्धींगत होईल यावर लक्ष केंद्रित करत अशासकीय व नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करुन हा सप्ताह यशस्वी करावा, असे आवाहन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले. महसूल सप्ताहाचे आयोजन …

Read More »

गायरान जमीन अतिक्रमणबाबतच्या धोरणास महिन्याभरात अंतिम स्वरूप महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे आश्वासन

राज्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमणाबाबतच्या धोरणाला न्यायालयाच्या निर्देशाला अधीन राहून महिन्याभरात अंतिम स्वरूप देण्यात येईल, असे आश्वासन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. विधानपरिषदेतील कॉंग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी ‘लक्षवेधी’द्वारे मांडलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. गायरान जमिनीवरील अतिक्रमणाचा सार्वत्रिक प्रश्नावर आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत …

Read More »

शेती महामंडळाच्या जमिनी आता खाजगी कंपन्यांच्या लॉजिस्टिक पार्क, ड्राय पोर्टसाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आराखडा तयार करण्याचे निर्देश

एकेकाळी राज्यातील शेतकऱ्यांच्या पीक पध्दतीत सुधारणा घडवून आणण्यासाठी आणि विविध पिकांच्या संशोधनासाठी शेती महामंडळाची स्थापना करण्यात आली ही. तसेच या शेती महामंडळाच्या जमिनीवर बीयाणावरील संशोधनाच्या अनुषंगाने वेगवेगळे प्रयोग करण्यात येत होते. मात्र काही वर्षांपूर्वी शेती महामंडळाचे कामच राज्य सरकारकडून जवळपास थांबविण्यात आले आहे. त्यामुळे ज्या जमिनी पडीक आणि महामार्गालगत आहेत …

Read More »