Breaking News

विशेष बातमी

पत्रकारतेत असूनही फायदे नाकारणारे ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवेंना अभिवादन कॉ.सुबोध मोरे यांचा खास लेख

आज सकाळी संयुक्त महाराष्ट्र चळवळीले लढवय्या पत्रकार दिनू रणदिवे यांनी वयाच्या ९५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दिनू रणदिवे महाराष्ट्र टाइम्सचे निवृत्त वृत्त संपादक होते. सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या”कॉमन मॅन ” चे ते खरे प्रतिनिधी होते. मुंबई- महाराष्ट्रात झालेल्या स्वातंत्र्यपूर्व व स्वतंत्र्योत्तर कालखंडात झालेल्या सर्व चळवळींचे ते साक्षीदार …

Read More »

राज्यातली जमिन तेलंगणाच्या नावावर करण्याचा भाजपा सरकारचा पराक्रम महाविकास आघाडी सरकारकडून चौकशी समिती जाहीर

मुंबई: विशेष प्रतिनिधी विदर्भाला लागून महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवरील मेडीगड्डा बॅरेज कामासाठी राज्यातील जमिन तेलंगणा राज्याला अधिगृहीत करण्याची परवानगी देण्यात आली. तसेच अधिग्रहण केल्यानंतर सदरची जमिन त्यांच्या नावावर करण्याचा प्रकार फडणवीस सरकारच्या काळात घडल्याचे उघडकीस आल्याने या सर्व प्रक्रियेचीच चौकशी करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला असून यासंदर्भात जलसंपदा विभागाने …

Read More »

राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाला वित्तमंत्री कोण ? याची माहितीच नाही शासन निर्णय निघाला वित्तमंत्र्यांच्या नावे मात्र समितीच्या अध्यक्षपदी भुजबळांचे नाव

मुंबई: प्रतिनिधी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात येणाऱ्या निर्णयाची माहिती किंवा सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती सामान्य प्रशासन विभागाकडून दिली जाते. मात्र राज्याचे वित्त अर्थात अर्थमंत्री नेमके कोण याचा विसर या विभागाला पडला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या अनुषंगाने नेमके अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील कि अन्न व नागरी पुरवठा …

Read More »

पूर्ण महिन्याचा पगार पाहिजे तर मंत्रालयात या अन्यथा….. पैसा नसल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना बिन पगारी रजा देण्याची कामगार विभागाची शिफारस

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यावर आलेल्या कोरोनासंकटाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा गैरअर्थ काढत मंत्रालयातील अनेक अधिकारी, कर्मचारी हे नियमानुसार मुख्यालयाला न कळविताच परस्पर गावी जावून बसले आहेत. अशा विना परवानगी गावी गेलेल्यांच्या विरोधात विभागीय चौकशी लावण्याची शिफारस करत मंत्रालयात प्रत्यक्ष राहून काम करणाऱ्यांना पूर्ण महिन्याचे वेतन द्या अन्यथा घरी बसून …

Read More »

गृहमंत्र्यांनी साजरा केला बंदोबस्तावरील पोलीस उपनिरीक्षकाचा वाढदिवस किवळे फाटा येथे वाढदिवस केला साजरा

मुंबई: प्रतिनिधी गृहमंत्री अनिल देशमुख काल पुणे येथे दौऱ्यावर होते. आज सळाळी पुण्यावरुन मुंबईला येताना एक्सप्रेस हायवेवर त्यांनी किवळे फाटा येथे कर्तव्यावर असलेले पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांचेशी थोडा वेळ थांबून संवाद साधला. त्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधा याची माहिती घेतली. तसेच अडीअडचणी बाबत चर्चा केली. या चर्चे दरम्यान त्यांना समजले …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरेंचा निर्णय राज्यपाल कोश्यारींनी केला रद्दबातल विद्यापीठ कायद्यानुसार अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्याचे आदेश

मुंबई: विशेष प्रतिनिधी दोनच दिवसांपूर्वी राज्यातील विद्यापीठस्तरावरील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परिक्षा रद्दबातल करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केला. मात्र या निर्णयावरून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या भविष्याच्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय रद्दबातल करत विद्यापीठ कायद्यानुसार विद्यार्थ्यांच्या परिक्षा घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे परिक्षेच्या कारणावरून …

Read More »

खुषखबर ! पुण्यात होणार पहिल्यांदा ३० माकडांवर कोरोना लसची चाचणी माकड राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे करणार सुपूर्द-वनमंत्री संजय राठोड

मुंबई : प्रतिनिधी कोरोना विषाणूमुळे (कोव्हीड – 19) होत असलेला प्रादुर्भाव टाळण्यासाठी SARS COV- 2 ही लस तत्काळ विकसीत करण्यासाठी संशोधन हाती घेण्यात आले आहे. या संशोधन प्रकल्पासाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला ३० माकडांची आवश्यकता आहे. ही ३० माकडे राज्याच्या हद्दीतील घेण्यात येणार असून कोरोना प्रतिबंधात्मक लसचा सर्वप्रथम प्रयोग …

Read More »

मुंबई, पुण्याची गर्दी कमी करायचीय, तर दुर्लक्षित जिल्ह्यांमध्ये जावे लागेल महानगरांमध्ये ४० लाख कामगारांची संख्या

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्याची आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई आणि पुणे महानगरात मोठ्या प्रमाणावर उद्योगांची गर्दी झालेली आहे. या दोन्ही महानगरात राज्यातील आणि परराज्यातील स्थलांतरीत कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या दोन शहरांमध्ये जमा होणारी गर्दी कमी करायची असेल तर राज्यातील इतर मागास जिल्ह्यांचा विकास करत रोजगाराच्या संधी निर्माण …

Read More »

दानवे-जाधव, राजकारणामुळे कौटुंबिक सौख्य हरविलेल्या घराण्यात आणखी एकाची वाढ राज्यातील प्रतिष्ठित राजकिय घराण्यांमध्ये सारेच काही आलबेल नाही

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात अनेक तालेवार राजकारण्यांची घराणी आहेत. त्यापैकी काही सुसंस्कृत तर काही इरसाल घराणी म्हणून ओळखली जातात. मात्र राजकिय महत्वकांक्षेने कुटुंबात वाद निर्माण झाला आणि त्याची परिणती राजकिय तर कधी वैयक्तिक स्तरावर झाल्याचे चित्र आपल्याला काही ठिकाणी पाह्यला मिळाली. त्यात आता रावसाहेब दानवे आणि हर्षवर्धन जाधव या …

Read More »

विधान परिषदेचे आमदार म्हणतात, अधिवेशन “झुम” अॅपवर घ्या अंतिम निर्णय विधिमंडळ सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यातच आता विधिमंडळाच्या पावसाळी  अधिवेशनाचा कालावधी जवळ येत आहे. यापार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशन घ्यायचे की नाही यावरून संभ्रम निर्माण झालेला असताना विधान परिषदेतील काही सदस्यांनी झुम अॅपवर विधान परिषदेचे अधिवेशन घेण्याची मागणी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याकडे केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. …

Read More »