Breaking News

विशेष बातमी

टाटा पॉवरकडून अंतिम आकडा आला की वीज ग्राहकांना मिळणार सबसिडी १२०० ते १५०० कोटींचा खर्च येणे अपेक्षित

मुंबई: विशेष प्रतिनिधी लॉकडाऊन काळात राज्यातील वीज ग्राहकांना मीटर रिडींग न घेता आल्याने आणि वीज बील भरण्यास तीन महिन्याची मुदत दिली. मात्र जून महिन्यात वीज बीलांचे आकडे पाहून राज्यातील जनतेमध्ये रोष पसरला. अखेर या वाढीव वीज बीलावर तोडगा काढण्यासाठी ज्यांची वाढीव बीले असतील, त्यांना बिलातील फरकाची रक्कम सबसिडी स्वरूपात दिली …

Read More »

खुषखबर : लोकप्रतिनिधी आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे राहिलेले थकित वेतन मिळणार जुलै महिन्याचे वेतन अदा झाल्यानंतर मार्चचे अर्धे वेतन जमा होणार

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यातील निवडूण आलेले लोकप्रतिनिधी आणि सरकारी अधिकारी- कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्यातील अर्धे राहिलेले वेतन लवकरच मिळणार आहे. सध्या जुलै महिन्याचे वेतन तयार करण्याचे काम सुरु आहे. ते वेतन कोषागारातून दिले गेल्यानंतर लगेच मार्च महिन्याचे थकित अर्धेवेतन त्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश वित्त विभागाने सर्व विभागांना दिले असून याबाबतचा …

Read More »

ई सिम धारकांनो सायबर भामट्यांपासून सावध रहा महाराष्ट्र सायबर विभागाचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी ई  सिम धारकांनी सायबर भामट्यांपासून सावध राहावे. त्यांच्या फसव्या फोनला बळी पडू नये.  या साठी काळजी घ्यावी,असे आवाहन महाराष्ट्र सायबर तर्फे  करण्यात येत आहे. सध्या बाजारात नवीन प्रकारचे फोन आले आहेत त्यामध्येच e -सिम किंवा embedded सिमकार्ड असते . हे e -सिमवाले फोन जर तुमच्याकडे असतील तर …

Read More »

खुषखबर ! राज्यातील शाळा आणि कॉलेजच्या अभ्यासक्रमात २५ टक्क्याने कपात शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे शाळा, महाविद्यालये अद्याप सुरु करण्यात आलेली नाहीत. तसेच विद्यार्थ्यांना सध्या मर्यादीत वेळेच्या स्वरूपात ऑनलाईन शिक्षण देण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील शालेय आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करणे अवघड बनले आहे. यापार्श्वभूमीवर सीबीएसईप्रमाणे यंदाच्या शैक्षणिक वर्षातील १ ली ते १२ वी पर्यंतच्या अभ्यासक्रमात २५ टक्के …

Read More »

प्रशासनात डॉक्टर सहकारी असल्याचा असाही विभागाला फायदा कर्मचाऱ्यांच्या शरीरातील अॅण्टीबॉ़डी स्टेट करून सुरक्षिततेची घेतली काळजी

मुंबई : विशेष प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रसाराला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून वेळोवेळी पावले उचलण्यात येत आहेत. या विषाणूच्या संसर्गाची लागण स्वत:लाही होवू नये यादृष्टीने अनेकजण पुरेशी काळजी घेत आहेत. तरीही या विषाणूची लागण काही जणांना होताना दिसत आहे. यापार्श्वभूमीवर मंत्रालयातील उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातील उपसचिव डॉ.श्रीकांत पुलकंडवार यांनी विभागातील …

Read More »

सरकारचे आदेश ! विरोधकांच्या बैठकांना अधिकाऱ्यांनी हजर रहायचे नाही राज्य सरकारकडून आदेश जारी

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यातील वाढत्या कोरोना विषाणूवरून आता खऱ्या अर्थाने राजकारण सुरु झाले असून परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी भाजपाचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्याचा दौरा करण्यास सुरुवात केली. मात्र या दौऱ्यात सरकारकडून राहीलेली माहिती या विरोधी पक्षनेत्यांकडून उघडकीस येत असल्याने अखेर या …

Read More »

म्हाडाचे बांधकाम करणाऱ्या शिर्केच्या कामाची चौकशी होणार गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार उपसचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती

मुंबई: विशेष प्रतिनिधी मुंबईसह महाराष्ट्रात म्हाडाच्या इमारतींचे बांधकाम करणाऱ्या शिर्केच्या कामाची चौकशी करण्यात येणार असून त्यासाठी गृहनिर्माण विभागातील उपसचिवांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसेच २ महिन्यात या समितीने आपला अहवाल राज्य सरकारला सादर करण्यास आदेश दिले आहेत. साधारणत: २० ते २५ वर्षापूर्वी अर्थात १९९३ साली राज्यात शिवसेना-भाजपा …

Read More »

पगाराला पैसे नाहीत मात्र न्यायाधीश-कुटुंबियांच्या चष्म्यासाठी सरकारकडे पैसे विधी व न्याय विभागाकडून प्रस्ताव मंजूर

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यात कोरोनाचा वाढता प्रसारामुळे अनेक जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्याची पाळी राज्य सरकारवर आली. त्यामुळे थांबलेल्या अर्थव्यवस्थेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारीसाठी पैश्याची चणचण भासत असल्याने दर महिन्याला कर्ज काढत आहे. मात्र राज्यातील मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि त्यांच्या कुटुंबियांना लागणाऱ्या चष्म्यासाठी तब्बल ५० हजार रूपये देण्याचा निर्णय …

Read More »

१२ वीच्या निकालात गतवर्षीपेक्षा यंदा ४.७ टक्क्याने वाढ सर्वाधिक निकाल कोकण तर सर्वात कमी औरंगाबादचा निकाल

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील १२ वी परिक्षार्थींचा निकाल आज जाहीर झाला असून राज्याचा निकाल ९०.६६ टक्के इतका लागला असून गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्यावर्षी १२ वी निकालात ४.७ टक्केने वाढ झाली आहे. या निकालात कोकणने बाजी मारली असून राज्यात सर्वात कमी निकाल औरंगाबादचा लागला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण …

Read More »

घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवासाठीची नियमावली जाहीर घरात २ फुटाचा तर सार्वजनिक मंडळ‌ासाठी ४ फुटाची गणेश मुर्ती बंधनकारक

मुंबई: विशेष प्रतिनिधी काही दिवसांवर राज्यात गणेशोत्सव आलेला आहे. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रसाराचा संभावित धोका लक्षात घेवून राज्य सरकारने हा उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला असून त्या दृष्टीने नियमावली जाहीर केली. ती खालीलप्रमाणे… १) महापालिकेच्या धोरणानुसार सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी रितसर परवानगी घेणे आवश्यक. २) उच्च न्यायालयाच्या निर्णयामप्रमाणे आणि …

Read More »