Breaking News

महिन्याच्या कालावधीनुसार अभ्यासक्रमाची पुस्तके तयार करा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची एनसीईआरटीला सूचना

मुंबई : प्रतिनिधी

देशाची भावी पिढी सुर्वगुण संपन्न बनावी याउद्देशाने शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी व्हावे यासाठी एनसीईआऱटी अर्थात राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने महिन्याच्या कालावधीनुसार अभ्यासक्रम निश्चित करावा अशी सूचना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी एनसीईआरटीला एका पत्राद्वारे केली.

दोन दिवसांपूर्वी एनसीईआरटीने एक जाहीरात प्रसिध्द करत शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात बदल करण्याची तयारी दर्शविली. तसेच देशातील भावी पिढी अर्थात शालेय विद्यार्थ्यांची सर्व गुणसंपन्न पिढी तयार व्हावी या उद्देशाने अभ्यासक्रमातील संभावित बदलासाठी थेट जनतेतून ऑनलाईन पध्दतीने सूचना  मागविण्यात आल्या. त्यानुसार विरोधी पक्षनेते मुंडे यांनी यासंदर्भात सूचना एनसीईआरटीला केली.

महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सहामाही आणि वार्षिक परिक्षा घेतल्या जातात. या दोन्ही परिक्षेत त्या त्या कालावधीत शिकविलेल्या अभ्यासक्रमानुसारच प्रश्न विचारण्यात येतात. तसेच ज्या महिन्यात जो अभ्यासक्रम शिकविला जातोय त्याच अभ्यासाच्या पुस्तकांची निर्मितीही पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी केली आहे. या पध्दतीचा अवलंब केल्यास विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी होईल. तसेच त्यांच्यावरील अभ्यासाचा ताणही कमी होईल अशी सूचना करत यानुसार एनसीईआरटीनेही आपल्या अभ्यासक्रम पध्दतीत बदल करण्याचे मागणी केली.

 

Check Also

मतदान कार्ड नाही ? हरकत नाही यापैकी कोणतेही एक ओळखपत्र न्या

राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पाच टप्प्यात होणार असून १९, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *