Breaking News

इंडिया रॅकिंग : महाराष्ट्रातील ‘या’ शैक्षणिक संस्था देशात पहिल्या ५० आणि १०० त उच्च शैक्षणिक क्षेत्रातील सर्वंकष क्रमवारीत देशात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक

उच्च शैक्षणिक क्षेत्रातील सर्वंकष १०० उत्कृष्ट संस्थांमध्ये महाराष्ट्राच्या १२ शैक्षणिक संस्थांच्या समावेशसह देशात राज्याने दुसऱ्या क्रमांक पट‍काविला आहे. यासह प्रथम दहामध्ये मुंबई आयआयटी तिसऱ्या क्रमांकावर आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने ‘इंडिया रँकिंग -२०२२’ हा कार्य‍क्रम इंडिया हॅबीटेट सेंटरच्या स्टेन सभागृहात आयोजित करण्यात आला. केंद्रीय शिक्षण मंत्री धमेंद्र प्रधान, केंद्रीय उच्च शिक्षण सचिव के. संजय मुर्ती, युजीसीचे अध्यक्ष एम. जे. कुमार तसेच शिक्षण क्षेत्रातील वरिष्ठ मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री प्रधान यांनी उच्च शिक्षण क्षेत्रातील सर्वंकष क्रमवारी तसेच उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध ९ अभ्यासक्रमांची श्रेणी  ‘इंडिया रँकिंग-2022’ ची यादी जाहीर केली.

या कार्यक्रमात प्रत्येक श्रेणीतील प्रथम तीन संस्थांना प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

उच्च शिक्षण क्षेत्रातील सर्वंकष १०० उत्कृष्ट संस्थांमध्ये राज्याचा दुसरा क्रमांक आहे. प्रथम क्रमांकांवर तामिळनाडूतील १८ उच्च शैक्षणिक संस्थांचा समोवश आहे. प्रथम १०० उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये राज्यातील १२ संस्था आहेत. यामध्ये तिस-या क्रमांकावर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (आयआयटी), २५ व्या क्रमांकावर सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ, २६ व्या क्रमांकावर भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था पुणे, २८ व्या क्रमांकावर इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई, ३३ व्या क्रमांकावर होमी भाभा राष्ट्रीय संस्था, मुंबई, ६२ व्या क्रमांकावर सिम्बायोसिस इंटरनॅशनल, पुणे, ६८ व्या क्रमांकावर विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर, ७६ व्या क्रमांकावर  डॉ.डी वाय पाटील विद्यापीठ, पुणे, ८१ व्या क्रमाकांवर मुंबई विद्यापीठ, मुंबई, ८९ व्या क्रमांकावर एसव्हीकेएम नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, मुंबई, ९२ व्या क्रमांकावर दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, वर्धा, ९९ व्या क्रमांकावर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई या महाराष्ट्रामध्ये असणा-या संस्था पहिल्या १०० सर्वोत्कृष्ट संस्थांमध्ये समाविष्ट आहेत.

देशभरातील उत्कृष्ट १०० विद्यापीठांमध्ये राज्यातील १३ विद्यापीठांचा समावेश आहे. यामध्ये अनुक्रमे १२, १४, १७, ३२, ४१, ४५, ५१, ५४, ६०, ७३, ७६ , ८१ आणि ८३ या क्रमांकांवर आहेत.

उत्‍कृष्ट 100 महाविद्यालयांमध्ये राज्यातील ३ महाविद्यालयांचा समावेश आहे यामध्ये ५७, ६९, ८७, क्रमांकांवर आहेत. उत्कृष्ट ५० संशोधन संस्थांमध्ये राज्यातील ५ संस्थांचा समावेश आहे. यामध्ये ४, ७, ११, १७ आणि २५ या क्रमांकांवर आहेत.

उत्कृष्ट २०० अभियांत्रिकी महाविद्यालय/संस्था/विद्यापीठांमध्ये राज्यातील १७ संस्थांचा समावेश आहे. यामध्ये ३, १८, ३२, ७१, ७२, ११६, ११९, १३१, १३५, १४२, १४६, १६३, १६७, १७२, १८५, १९३, आणि १९७ या क्रमांकांवर आहेत.

उत्कृष्ट १०० व्यवस्थापन संस्थांमध्ये राज्यातील १० संस्थांचा समावेश आहे. यामध्ये 9, 11, 17, 21, 25, 43, 68, 71, 91, आणि 95 या क्रमांकांवर आहेत.

उत्कृष्ट १०० फॉर्मसी महाविद्यालय/संस्था/ विद्यापीठांमध्ये राज्यातील १६ संस्थांचा समोवश आहे. यामध्ये 7, 11, 21, 32, 38, 41, 42, 46, 53, 65, 74, 76, 87, 88, 90, आणि 99 या क्रमांकांवर आहेत.

उत्कृष्ट 50 वैद्यकीय महाविद्यालय/संस्था/विद्यापीठांमध्ये राज्यातील ४ महाविद्यालये/संस्था/ विद्यापीठांचा समावेश आहे. यामध्ये 17, 24, 42, 45 क्रमांकांवर आहेत. उत्कृष्ट ४० दंत महाविद्यालय/संस्था/ विद्यापीठांमध्यें राज्यातील 6 महाविद्यालय/संस्था/विद्यापीठांचा समावेश आहे. यामध्ये 3, 9, 11, 17, 35 आणि 37 या क्रमांकांवर आहेत.

उत्कृष्ट ३० विधी महाविद्यालय/संस्था/विद्यापीठांमध्ये राज्यातील एका संस्थेचा समोवश आहे. यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर सिम्बायोसिस लॉ स्कुल, पुणे या संस्थेचा समावेश आहे.  उत्कृष्ट वास्तुकला महाविद्यालय/संस्था/ विद्यापीठांमध्ये राज्यातील ८ व्या क्रमांकावरील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर, या एका संस्थेचा समावेश आहे. या संकेतस्थळावर सविस्तर यादी उपलब्ध आहे. https://www.nirfindia.org/2022/Ranking.html

Check Also

मतदान कार्ड नाही ? हरकत नाही यापैकी कोणतेही एक ओळखपत्र न्या

राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पाच टप्प्यात होणार असून १९, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *