Breaking News

हिंदूत्ववाद्यांसाठी दलाली करणाऱ्या केंद्रीय मंत्री आणि डांगळेंच्या बैठकीवर बहिष्कार घाला आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांकडून साहित्यिक, विचारवंत, विद्यार्थ्यांना आवाहन

मुंबईः प्रतिनिधी
राज्यात विधानसभा निवडणूकीचे पडघड वाजायला सुरुवात झालेली असतानाच निवडणूकीत आपल्याच पक्षाचा वरचष्मा रहावा यासाठी प्रत्येक राजकिय पक्षाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि दलित साहित्यिक अर्जून डांगळे यांनी आंबेडकरी विचारधारेवर आधारीत संस्थेची उभारणी करण्याकरीता एका बैठकीचे आयोजन केले. मात्र हे दोन्हीही आंबेडकरी नेते हिंदूत्ववादी भाजपा आणि शिवसेनेची दलाली करतात असा आरोप आंबेडकरी चळवळीतील काही कार्यकर्त्यांनी करत त्यांनी आयोजित केलेल्या बैठकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे.
कार्यकर्त्यांकडून करण्यात येत असलेले आवाहन त्यांच्याच भाषेत..
फुले-आंबेडकरी साहित्यिक, विचारवंतांनी शिवसेना-भाजप या हिंदुत्ववादी, धर्मांध सत्ताधार्यांची दलाली करणार्या चारोळीकार,वात्रटीकार महान साहित्यिक मंत्री रामदास आठवले, अर्जुन डांगळे यांनी दि.१६ सप्टेंबरला मुंबई विद्यापीठा कलिना येथे बोलाविलेल्या मिटिंगवर जे खरे आंबेडकरी साहित्यिक, विचारवंत,कार्यकर्त्यांनी बहिष्कार घालावा—– विनम्र आवाहन…………………….. देशात भिमाकोरेगाव पासुन ते विद्रोही मासिकाचे संपादक सुधीर ढवळे,डॉ. आनंद तेलतुंबडे सारखे पुरोगामी, समतावादी विचारवंत, लेखक, मानवधिकार कार्यकर्त्यांना धर्मांध सत्ताधारी खोट्या आरोपाखाली तुरुंगात टाकत असताना, गोहत्येच्या खोट्या कारणास्तव गुजरात पासुन देशभर दलित, मुस्लिम, आदिवासी समाजावर हल्ले, अत्याचार होत असताना, आनंद पटवर्धनांच्या राम के नाम,जयभिम काँम्रेड चित्रपट प्रदर्शित करण्यावर जातियवादी बंदी घालत असताना,नसिरुद्दीन शहा सारख्या संवेदनशील कलावंतांच्या देशभक्तीवर नकली राष्ट्रभक्त आक्षेप घेत असताना,लेखक, कलावंतांची रोज सत्ताधार्या कडून मुस्कटदाबी होत असताना, डॉ नरेंद्र दाभोलकर, काँ.गोविंद पानसरे, डॉ कलबुर्गी, गौरी लंकेश सारख्या पुरोगामी, समतावादी, विचारवंत, नेते,पत्रकारांचे दिवसाढवळ्या निर्घृणपणे खून पडत असताना, संविधानीक मुल्य रोज पायदळी तुडवली जात असताना आणि संसदेबाहेर प्रत्यक्ष संविधान जाळले जात असताना हे स्वतः ला आंबेडकरी म्हणविणारे विदूषक नेते व साहित्यिक काय झोपले होते का “बांधावरच्या माणसांना ” घेऊन चारोळ्या, वात्रटिका म्हणत तोडीपाणी,करून सत्ताधार्यांशी सेटलमेंट करीत फिरत होते का? आणि विद्यापीठात जातीच्या नावे खुर्च्या उबविणारे “महासत्तेला पिंडदान करून शरण गेलेले व चिंताग्रस्त मुलखाचा आक्रोश विसरून प्राध्यापकाची खुर्ची टिकवण्यासाठी आक्रंदन करणारे कवी,मास्तर,जेव्हा देशात सत्ताधार्यांच्या असुहिष्णेते विरुद्ध साहित्यिक पुरस्कार वापसी करून बोंबलत होते तेव्हा हे मिटिंग घेणारे मराठी, इतिहासाचे प्राध्यापक, पत्रकार कुणाशी “सामना”करीत आपल्या लेखण्या झिजवत होते याचे आधी खरे आंबेडकरवादी असतील तर त्यांनी थोडी लाज असल्यास जाहीर उत्तर द्यावे.

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *