Breaking News

ओबीसी मुस्लिमांच्या प्रश्नांसाठी मंत्री राम शिंदे यांना वेळच नाही

ऑल इंडीया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचा आरोप
मुंबई : प्रतिनिधी

मुस्लिम ओबीसी समाजाचे प्रश्न संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सोडविण्याबाबत वारंवार निवेदन देऊन सुद्धा ओबीसी मंत्री प्रा. राम शिंदे यांना वेळ नाही का ? असा संतप्त सवाल ऑल इंडिया मुस्लिम ओबीसीचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांनी उपस्थित केला.
यावेळी अन्सारी म्हणाले की, आम्ही गेली ४०-४५ वर्ष मुस्लिम समाजासाठी काम करतोय. मात्र असे मंत्री आम्हाला कोणत्याच सरकार मध्ये भेटले नाही. बैठकीत निर्णय झाल्यानंतर २७-६-२०१८ रोजी इतर मागासवर्गीय मुस्लिम समाजाच्या व्यक्तीस जातीचे प्रमाणपत्र तथा वैधता प्रमाणपत्रामध्ये येणाऱ्या अडचणी संबंधित अधिकाऱ्यांसह बैठक घेण्याची विनंती संघटनेच्यावतीने मंत्री शिंदे यांना देण्यात आले.

त्यानंतर पुन्हा दोनदा याबाबतचे स्मरण पत्रही मंत्री शिंदे यांना पाठवित त्यांची तीनवेळा भेट घेत त्याबाबत विचारणा केली. मात्र मंत्री राम शिंदे यांनी एकच प्रकरणावर एका मंत्र्याला किती वेळा भेटायचे ? असा प्रतिसवाल संघटनेच्या कार्यकर्त्याना केला. यावरून ओबीसी मुस्लिमांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मंत्री राम शिंदे यांना वेळच नसल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *