Breaking News

मंत्रालयात महापुरूषांच्या विचारांचा जागर महापुरूषांची संयुक्तीक जयंती उत्साहात साजरी

मुंबई : प्रतिनिधी

“शिवराया – भिमराया

दोघांनी झिजवली काया

दोघांचाही जगी गाजावाजा

एक रयतेचा राजा

एक विद्येचा राजा…”

या पक्तींनी मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगण दुमदुमुन गेले होते. सप्तखंजेरी वादक प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी आपल्या प्रबोधनात्मक अभंगाने आणि खंजेरीच्या खिळवुन ठेवणा-या नादाने प्रसन्नावस्थेतील वातावरण अधीकच मोहक केले…निमीत्त होते मंत्रालयातील अनुसुचित जाती, जमाती, विजा-भटक्या जमाती, निमशासकीय/ शासकीय अधिकारी आणि कर्मचारी संघटनेच्यावतीने आयोजीत केलेल्या महापुरूषांच्या संयुक्तीक जयंती महोत्सवाचे. महाराष्ट्र राज्याला थोर महापरुषांचे कार्य आणि विचारांचा वारसा लाभला आहे. त्यांच्या विचारांना स्मरण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले, राजर्षी शाहु महाराज, भारतरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर या महामानवांची संयुक्तीक जयंती मोठ्या उत्साहात संघटनेच्यावतीने मंत्रालयात आयोजीत करण्यात आली होती.

मंत्रालयाच्या या ऐतिहासीक वास्तुत मॉ साहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, स्वामी पेरियार आणि डॉ. आंबेडकर, माता रमाई, राजर्षि शाहू महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, क्रांतीवीर बिरसा मूंडा, अण्णाभाऊ साठे, कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगे महाराज या महापुरूषांनी आपले आयुष्य समाजासाठी वेचले त्याचे तैलचित्र मोठ्या दिमाखात झळकत होते. विद्युत रोषणाई, उत्साहपुर्ण अनुयायांची उपस्थिती, मंत्रालयाची सजावट आणि महापुरूषांच्या दिमाखदार तैलचित्रांमुळे या महापुरूषांच्या सभेस उपस्थित असल्यासारखे जाणवत होते. त्यांचे कर्तुत्व आणि विचार महाराष्ट्राच्या मातीला लाभणे म्हणजे अहो भाग्यच आहे.

या अद्भुत उत्साहपुर्ण वातावणात खंजेरीचा नाद आणि सत्यपाल महाराजांचा आवाज…मनमोहून टाकणारा  होता.

“…देव म्हणे मज माणूस न दिसे,

…माणूस द्या मज माणूस द्या…”

या संत तुकडोजींच्या अभंगाच्या पंक्ती परिसरातील वातावरण जागृत करीत होता.

निर्मलग्राम, तंटामुक्ती अभियान, व्यसनमुक्ती, शेतकरी आत्महत्या, अंधश्रद्धा अशा अनेक विषयांना स्पर्श करत सत्यपाल महाराजांची मनोरंजनातुन सत्यवाणी कथन केली. संत गाडगे महाराजांच्या ग्रामगीतेचा सार त्यांनी रचलेल्या अभंगातून थोडक्यात विषद केला. महाराष्ट्र शासन राबवित असलेल्या आरोग्यदायी योजना, सामुहिक विवाह, अवयवदान चळवळ, जलयुक्त शिवार अशा अनेक योजनांमुळे ग्रामीण भागातील जनतेला फायदा होत असल्याचे त्यांनी कथन केले.

“…ना पोथी, ना कुराण, ना वेद पाहिजे

आज भारताला फक्त संविधान पाहिजे..,”

आज आपले जे काही अस्त्तित्व आहे ते फक्त या महापुरषांमुळेच, डॉ. आंबेडकर स्वत:साठी नाहीतर फक्त समाजासाठी जगले…आणि म्हणूनच आज आपण मंत्रालयात बसुन १२७ वर्षानंतरही त्यांची जयंती साजरी करीत आहोत.

“….ज्योतिबा सावित्री विद्येची देवी देवता,

विद्येविना ना उद्धार बहुजनांचा…”

महिलांचा उद्धार व्हावा म्हणून फुले दांम्पत्यांनी आयुष्य वेचले…आज महिला शिक्षीत आहेत त्या केवळ यांच्यामुळेच असे सांगून, स्त्री-पुरूष समानतेवर सत्यपाल महाराजांनी भाष्य केले.

एका वेळी सात खंजीरी वाजवून अनोख्या कलेचे दर्शन यावेळी झााले. दांडीया, भांगडा, लावणीची ढोलकी, गारूडी, ट्रेन असे विविध संगीतमय आवाज त्यांनी आपल्या खंजीद्वारे प्रेक्षकांपुढे सादर केले. प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला…

गेल्या २५ वर्षापासून मंत्रालयात महापुरूषांची संयुक्त जयंती

या जयंती सोहळ्यास वित्त नियोजन व वने  मंत्री सुधीर मुनगंटीवार, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य  मंत्री राजकुमार बडोले,ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,   पशु संवर्धन, दुग्ध व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर, राज्यमंत्री वित्त व नियोजन व गृह ग्रामिण दिपक केसरकर,   राज्यमंत्री  आदिवासी विकास व वने  राजे अंम्ब्रीशराव,  उर्जा पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार, दै. वृत्त  सम्राटचे संपादक बबन कांबळे, अभिनेता जे ब्रॅन्डन  उपस्थित होते. मान्यवरांनी महापुरूषांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली.

“महापुरूषांच्या विचारांचा जागर प्रबोधनकारी आहे. आजच्या काळात महापुरूषांच्या विचारांची कास धरणे गरजेचे आहे. यातुनच समाजाची जडणघडण होत असते. ” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा पत्रातुन जयंतीस आणि संघटनेस शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्राचा कारभार ज्या ऐतिहासीक वास्तुत होतो त्या वास्तुत थोर महापुरूषांच्या विचारांचा जागर गेली २५ वर्षे होत आहे. अनुसुचित जाती/जमाती/विजा-भटक्या जमाती/ इतर मागास वर्गीय प्रवर्ग, शासकीय / निमशासकीय  अधिकारी, कर्मचारी संघटनेच्यावतीने महापुरूषांची जयंती संयुक्तीकरित्या साजरी करण्यात येते. संघटनेच्यावतीने मंत्रालयाच्या प्रांगणात डॉ. आंबेडकरांचे तैलचित्र लावण्याची मागणी, मंत्रालयांच्या प्रवेशद्वारास महापुरूषांची नावे देणे. कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागु करणे, महिलांना बालसंगोपन रजा मंजुर करणे इत्यादी मागण्या या सोहळ्यानिमीत्त उपस्थित असणा-या मंत्री महोदयांना करण्यात आली होती. मा. मुख्यमंत्री परदेशदौ-यावर असल्याने त्यांचे प्रतिनिधीत्व वित्त व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आणि संघटनेच्या मागण्या मान्य करण्यासाठी प्रयत्न करणार असून, सातवा वेतन आयोगाची मागणी निश्चीत पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाअंती माजी कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर, लोकनायकचे संपादक कुंदन गोटे आणि भय्यु महाराज यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

संघटनेच्यावतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य म्हणून २१ हजार रूपए रोख

मुंबईतील भांडूप येथील सिद्धी विनायक शिक्षण प्रसारक संस्थेच्या रमेश खानविलकर यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ही शाळा समाजातील ९० टक्के मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन शिक्षण देण्याचे कार्य करतेृ या शाळेत ५० टक्के आदिवासी तर ४० टक्के मागासवर्गीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शिक्षण संस्थेचे कार्य असेच सुरू रहावे आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी संघटनेच्यावतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते २१ हजार रूपए रोख आणि स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या पुरस्काराची विशेष बाब म्हणजे संघटनेचे अध्यक्ष भारत वानखेडे यांनी आपल्या वाढदिवसाचा उत्सव न करता ते पैसे या शाळेतील मुलांच्या शिक्षणाला सहकार्य म्हणून दिले आहेत.

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *