Breaking News

लोकशाहीर पठ्ठे बापुराव यांच्या कलादालनास ५ कोटींचा निधी द्या

गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठाच्या शाहीर अमरशेख अध्यासनातर्फे ‘लोकशाहीर पठ्ठे बापुराव’ यांच्या नावे सूरू करण्यात येणार्‍या कलादालनासाठी रुपये ५ कोटींचा निधी मंजुर करण्यात यावा, असे पत्र उच्च व तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे. 

मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमी अंतर्गत २००७ पासून शाहीर अमरशेख अध्यासन कार्यरत असू महाराष्ट्रातल्या अस्तंगत होत चाललेल्या लोककला प्रकारांचे जतन, संवर्धन आणि संशोधन या अध्यासनातर्फे सुरू आहे. शाहीर अमरशेख यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित चर्चासत्रावेळी त्यांच्या नावे एक भव्य असे कलादालन सुरू करण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला होता. त्यानुसार तसा प्रस्ताव विद्यापीठ प्रशासनाने तयार करुन तो शासनास सादर करावा, अशा सुचना  यावेळी दिल्या होत्या. अस्तंगत होत चाललेल्या लोककलांच्या जतन व संवर्धनाबरोबरच भावी पिढीपर्यंत या कला पोहचविण्यासाठी अशा प्रकारचे कलादालन निश्‍चितच मोलाची भूमिका बजावले यात शंका नाही.

विद्यापीठ प्रशासनाला देण्यात आलेल्या सुचनेनुसार प्रशासनाने सदर प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेने विभागाचा राज्यमंत्री म्हणुन माझ्याकडे सादर केला आहे. लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांची शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष पूर्ण झाल्याने त्यांच्या नावाने कलादालन सुरू करण्यासाठी आवश्यक रुपये ५ कोटींच्या निधीच्या प्रस्तावस आपण मंजुर द्यावी, अशी विनंती राज्यमंत्री वायकर यांनी मुख्यमंत्री यांना लेखी पत्राद्वारे केली आहे. 

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *