Breaking News

कोणताही गाजावाजा न करता विद्यार्थी- प्राध्यापकांकडून मदतकार्य खरे-ढेरे भोसले महाविद्यालयातल्यांचा उपक्रम

गुहागर: प्रतिनिधी
कोरोना लॉकडाऊनच्या काळात गरजूंना, कामगारांना मदत करण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था, खाजगी संस्था, राजकिय पक्षाचे नेते पुढे आलेत. मात्र कोणत्याही प्रसिध्दीचा किंवा साधी आठवण म्हणूनही स्वत:च्या कार्याची कुठचीही नोंद न ठेवता गुहागर तालुक्यातील गरजूंना, गरीब कामगारांना घरपोच वैद्यकीय आणि अन्नधान्याची मदत करण्याचे महत्वपूर्ण कार्य विद्यार्थी आणि प्राध्यांपकांकडून करण्यात येत आहे.
येथील खरे, ढेरे, भोसले महाविद्यालयातील एन. एस. एसचे आजा-माजी स्वयंसेवक विद्यार्थी आणि प्रा. अनिल सावंत , प्रा.युवराज पाटील, प्रा.अनिल हिरगोंड आणि एन. एस. एस विभाग प्रमुख असलेल्या प्राध्यापकांनी सुरुवातीला स्वत:च्या खिशातून निधी जमा करून या कामाला सुरुवात केली. मात्र जसजसा या मदतीची गरज असणाऱ्याची संख्या जास्त असल्याचे लक्षात यायला सुरुवात झाली. तसे या सर्वांनी स्थानिक भागातील दानशूर व्यक्तींनाही यात सहभागी होण्यास आवाहन करण्यास सुरुवात केली. त्यांच्या आवाहनाला अनेकांनी प्रतिसाद देण्यास सुरुवात केली.
या मंडळींकडे जमा झालेल्या रकमेतून गुहागर तालुक्यातील चिखली ५, गुहागर २, देवघर २, झोंबडी १, मधाळ २, गुहागर किर्तनवाडी २, पालशेत २५ अशी मिळून ३९ गरजू कुंटुबांना आर्थिक, अन्नधान्य, वैद्यकीय अशा स्वरूपात एकूण १८ हजार ८०० रुपयांची मदत केली. तरीही कोकणातील अनेक भागात गरजूंची संख्या बरीच असल्याने अशा गरजूंना मदत करण्यासाठी दानशूर व्यक्तींनी पुढाकार घ्यावा असे आवाहन या विद्यार्थी आणि प्राध्यापकांकडून करण्यात येत आहे. बँक डीटेल्स आणि फोन नंबर व त्या त्या प्राध्यापकांची नावं व नंबर दिले आहेत संपर्क करून खात्री व योग्य तपशील घेऊ शकता.

 Account Name – Dipesh Dinesh Gulekar

Bank of India

Account no. – 148610110000905

IFSC code – BKID0001486

Google pay, phone pay mobile banking & net banking – 9764087151

खरे ढेरे भोसले महाविद्यालय गुहागर

राष्ट्रीय सेवा योजना विभाग

प्रा .युवराज पाटील

मो.9011312787,

9511665324.

प्रा. अनिल हिरगोंड

मो. 9730901106.

प्रा. डॉ. ऋषिकेश गोळेकर

मो. 9423756774.

Check Also

राज्यात १९१ वेठबिगार कामगारांची मुक्तता

राज्यात वेठबिगारी निर्मुलनासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असून यात जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *