Breaking News

मुलीच्या वाढदिवसाचा खर्च पत्रकाराने दिला कोविड विरोधी लढ्याला ११ हजार १११ रूपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीला

मुंबई: प्रतिनिधी
एका वृत्त वाहिनीचे राजकीय पत्रकार वैभव परब यांनी आपल्या मुलीचा कु. साईशाचा वाढदिवस आज अत्यंत साधेपणाने साजरा करतांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ११ हजार १११ रुपयांची मदत जमा केली आहे. परब यांनी मदतीचा हा धनादेश नुकताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्त केला.
कोरोना विषाणुविरुद्ध लढतांना राज्यातील व्यापारी, उद्योजक, कॉर्पोरेटर्स, स्वंयसेवी संस्था यांच्याप्रमाणेच अनेक बालयोद्धेही मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदतीची रक्कम जमा करत आहेत. आज साईशाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मदत करणाऱ्या बालयोद्ध्यात आणखी एकाची भर पडली.
साईशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आशिर्वाद- मुख्यमंत्री
मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी साईशाला वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा देतांना तिला आरोग्यसंपन्‍न दीर्घायु लाभो ही सदिच्छा व्यक्त केली आहे. माध्यम क्षेत्रातील प्रतिनिधी आज राज्यभरात वृत्तसंकलनाचे काम करत आहेत. लोकांपर्यंत माहिती पोहोचवत आहेत. हे ही एक प्रकारे कोरोनाविषाणुविरुद्ध लढणारे योद्धेच आहेत. आतापर्यंत राज्य शासनाला या सर्वांचे खुप चांगले सहकार्य लाभले आहे. त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. आज वैभव परब यांनी कोरोनाविरुद्ध लढतांना मदतीत माध्यम क्षेत्र ही मागे नाही हे दाखवून दिले असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
ज्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत जमा करावयाची आहे अशांसाठी माहिती-
इंग्रजीत-
Chief Minister’s Relief Fund-COVID 19
Savings Bank Account number 39239591720
State Bank of India,
Mumbai Main Branch,
Fort Mumbai 400023
Branch Code 00300
IFSC CODE- SBIN0000300
मराठीत-
मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19
बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720
स्टेट बँक ऑफ इंडिया,
मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023
शाखा कोड 00300
आयएफएससी कोड SBIN0000300
सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते. या खात्यात सढळ हाताने मदत करावी असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *