Breaking News

रिचा विरुद्ध रिचा बॅाक्स ऑफिसवर रंगणार अनोखा सामना

मुंबई : प्रतिनिधी

एकाच अभिनेत्याचे दोन सिनेमे एकाच शुक्रवारी प्रदर्शित होतात. तर कधी दोन अभिनेत्यांचे दोन चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत असल्याने ते कलाकार आमनेसामने उभे ठाकल्याचं चित्र पाहायला मिळतं. पण अभिनेत्रींच्या बाबतीत फार कमी प्रमाणात असं घडताना दिसतं. परंतु पहिल्यांदाच ग्लॅमरसोबतच नॅान ग्लॅमरस भूमिकाही अतिशय खुबीने वठवत लक्ष वेधूने घेण्यात यशस्वी ठरलेल्या रिचा चढ्ढाचंही नाव या यादीत सामील झालं असून ९ मार्च रोजी रीचाचे दोन सिनेमे प्रदर्शित होत आहेत.

नुकताच ‘फुक्रे रिटर्न’या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना रिचाचा भोली पंजाबन लुक पुन्हा दिसला होता. ९ मार्चला प्रदर्शित होणाऱ्या ‘दासदेव’ आणि ‘३ स्टोरीज’या दोन चित्रपटांमध्ये रीचाची आणखी दोन भिन्न रूपं दिसणार आहेत. तसं पाहिलं तर या दोन्ही चित्रपटात कुठेही साम्य नसल्याने दोघांची तुलना करणं चुकीचं ठरेल. दोन्ही चित्रपटांचे विषय भिन्न असले तरी रीचाचा कोणता सिनेमा प्रथम पाहावा हा प्रश्न तिच्या चाहत्यांना सतावल्याशिवाय राहणार नाही.

‘दासदेव’हा चित्रपट दिग्दर्शक सुधीर मिश्रांनी बनवला असून, शरत चंद्र चट्टोपाध्याय यांच्या ‘देवदास’वर आधारित असलेला हा मॅाडर्न देवदास आहे. या चित्रपटाचा मूळ गाभा प्रेक्षकांना भावणारा आहे. रीचासोबत या चित्रपटात राहुल भट्ट आणि आदिती राव हैदरी यांच्या भूमिका आहेत. एक्सेल एन्टरटेन्मेंटची निर्मिती असलेल्या ‘३ स्टोरीज’बाबत बोलायचं तर यात तीन समांतर कथा पाहायला मिळतील. मुंबईतील एका रहिवाशी कॅालनीत घडणाऱ्या या चित्रपटाच्या कथेत रीचासह रेणुका शहाणे, पुलकीत सम्राट आणि शरमन जोशी हे कलाकार आहेत. दोन महत्त्वपूर्ण चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार असल्याने रीचा थोडी नर्व्हस तर थोडी उत्साहीतही आहे. एखाद्या कलाकाराचे दोन चित्रपट एकाच दिवशी होणं असे प्रकार फार कमी वेळा घडतात, पण आपल्या दोन्ही चित्रपटांना समान न्याय मिळायला हवा असं रीचाचं म्हणणं आहे. आता रीचाचे चाहते कोणत्या सिनेमाला प्राधान्य देतात ते लवकरचं बघायला मिळेल.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *