Breaking News

घातक शस्त्रे विकणाऱ्या फ्लिपकार्टवर बंदी घाला विरोधी पक्षनेते विखे पाटील यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी

ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर घातक शस्त्रांची विक्री होत असल्याचे औरंगाबाद शहरात नुकत्याच सापडलेल्या शस्त्र साठ्यांवरून स्पष्ट झाले. फ्लिपकार्टवर सरकारने तातडीने बंदी घालावीअशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

औरंगाबाद शहरात झालेल्या दंगलीनंतर शहर हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच फ्लिपकार्ट या ऑनलाईन वेबसाईटवरून तलवारीचाकूगुप्तीकुकरीजांबिया अशी सुमारे २८ शस्त्रांची खरेदी करण्यात आल्याचे उघड झाले आहे. पोलिसांना वेळीच याचा सुगावा लागला व पुढचा अनर्थ टळला असला तरी अशा प्रकारे खुलेआम शस्त्र खरेदी विक्रीचे व्यवहार होत असतील तर ते घातक आहे. त्यामुळे ऑनलाईन शस्त्र विक्री करणाऱ्या  वेबसाईट्सवर सरकारने तातडीने बंदी घालण्याची गरज असल्याची मागणी त्यांनी केली.

अलीकडच्या काळात ऑनलाईन शॉपिंगचे प्रमाण वाढलेले आहे. त्यात आता असे बेकायदेशीर व घातक व्यवहार होत असल्याचेही समोर आले आहे. औरंगाबादमध्ये हा शस्त्रसाठा कशासाठी मागवण्यात आला होतात्याचा दंगलीशी काही संबंध आहे काशस्त्र खरेदीत आणखी कोण-कोण गुंतले आहेतयाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *